चेन्नई शहराविषयी माहिती मराठी | Chennai information in marathi

Chennai information in marathi : चेन्नई भारतातील निवडक सुंदर शहरांपैकी एक शहर आहे. येथील समुद्र किनाऱ्यांचा अनुभव घेण्यासाठी येथे दरवर्षी लाखो पर्यटक येत असतात. येथील प्राकृतिक आकर्षण मानसिक शांती देते असे मानले जाते. तसं पाहायला गेलं तर या शहराचा एक वेगळाच इतिहास आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण चेन्नई शहराविषयी माहिती मराठी (Chennai information in marathi) जाणून घेणार आहोत.

Chennai information in marathi
चेन्नई शहराविषयी माहिती मराठी (Chennai information in marathi)

चेन्नई शहराविषयी माहिती मराठी (Chennai information in marathi)

शहर चेन्नई
राज्यतमिळनाडू
लोकसंख्या 46,46,632 (2011)
पूर्वीचे नावमद्रास
स्थापना1639
भाषा तमिळ
चेन्नई शहराविषयी माहिती मराठी (Chennai information in marathi)

1) खूप कमी लोकांना माहीत असेल की चेन्नई हे नाव या शहराला 1996 मध्ये मिळाले आहे. यापूर्वी या शहराचे नाव मद्रास असे होते. मद्रास शब्दाची उत्पत्ती येथील मासेमारी करणाऱ्या गावामुळे म्हणजेच मद्रास पट्टीनम पासून झाली आहे. असेही मानले जाते की मद्रास शहराचे नाव मद्रासन नावाच्या एका मच्छिमाराच्या नावापासून घेतले आहे.

2) चेन्नई भारताचे डेट्रॉईट म्हणूनही ओळखले जाते, येथे अनेक मोठमोठ्या ब्रँड च्या गाड्या तयार केल्या जातात. ज्यामुळे हे एक महत्त्वपूर्ण ऑटोमोबाईल हब मानले जाते. येथील समुद्र किनारे, नद्या या खास भौगोलिक स्थितीमुळे विदेशी कंपन्या येथे आकर्षित होतात.

3) चेन्नई येथे जागतिक बँकेचे कार्यालय आहे. हे कार्यालय साडेतीन एकर परिसरात पसरले आहे.

4) बुहारी हॉटेल्सची प्रसिद्ध साखळी चेन्नईमध्ये 1951 पासून अस्तित्वात आहे आणि चिकन 65 या लोकप्रिय चिकन डिशचा उगम या हॉटेलच्या स्वयंपाकघरातून झाला असे मानले जाते. हे हॉटेल प्रदीर्घ काळापासून खाद्यप्रेमींसाठी आवडते पदार्थ देत आहे.

5) खूप कमी लोकांना माहित असेल की चेन्नईमध्ये एक मोठा वटवृक्ष आहे, ज्याची गणना जगातील सर्वात जुन्या वटवृक्षांमध्ये केली जाते. मिळालेल्या माहितीनुसार, या झाडाचे वय सुमारे 450 वर्ष आहे.

6) चेन्नई भारतीय राज्य तमिळनाडू ची राजधानी आहे.

7) 2011च्या लोकसंख्येनुसार चेन्नई शहर भारतातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर आहे. हे शहर जगाच्या लोकसंख्येनुसार 36 वे सर्वात मोठे शहर आहे.

8) चेन्नईमधील मरिना बीच जगामध्ये पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे.

9) चेन्नई शहर भारताची सांस्कृतिक आणि संगीता ची राजधानी आहे. चेन्नई शहर शास्त्रीय नृत्य संगीत आणि मंदिरांसाठी खूप प्रसिद्ध आहे.

10) इंग्लंड चे प्रसिद्ध क्रिकेट खेळाडू नासिर हुसैन याचा जन्म चेन्नई मध्ये झाला होता.

चेन्नई माहिती मराठी (Chennai mahiti marathi)

11) चेन्नईमधील मुख्य भाषा तमिळ आहे. शिक्षण आणि अन्य अधिकारी व्यवसाय आणि नोकरी मध्ये इंग्रजी भाषेचा वापर करतात.

12) चेन्नई सुपर किंग आयपीएल च्या इतिहासा मधील सर्वात यशस्वी संघ मानला जातो.

13) चेन्नई मधील सर्वात प्रसिद्ध मंदिर कांचीपुरम येथे स्थित आहे. एकम्बरेश्वर मंदिर हे त्याचे नाव आहे. हे मंदिर भगवान शंकराला समर्पित आहे. या मंदिराची निर्मिती 1680 मध्ये केली गेली होती.

14) चेन्नई भारतातील पहिले शहर आहे तेथे सर्वात मोठे वायफाय नेटवर्क आहे.

15) चेन्नई सेंट्रल कारागृह हे भारतातील सर्वात जुने कारागृह आहे.

16) चेन्नई हे स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत स्मार्ट सिटी म्हणून विकसित होणाऱ्या 100 भारतीय शहरांपैकी एक आहे.

17) भारतातील सर्वात मोठ्या कृत्रिम बंदरांपैकी एक असलेले चेन्नई पोर्ट आणि एन्नोर पोर्ट या दोन प्रमुख बंदरांनी शहराला सेवा दिली जाते.

18) 2020 पर्यंत चेन्नईची अंदाजे लोकसंख्या सुमारे 10 दशलक्ष आहे.

19) चेन्नईला ‘दक्षिण भारताचे प्रवेशद्वार म्हणूनही ओळखले जाते.

20) चेन्नई हे भारतातील एकमेव शहर आहे ज्यावर महायुद्धात हल्ला झाला होता.

चेन्नई विषयी रोचक तथ्य (Facts about Chennai in Marathi)

21) इतिहासामध्ये पहिल्या शतकापासून चेन्नईच्या आसपासचा परिसर प्रशासकीय, लष्करी आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरलेला आहे.

22) अनेक दक्षिण भारतीय सत्तांनी, विशेषतः पल्लव, चेर, चोळ, पांड्य आणि विजयनगर या सत्तांनी चेन्नईवर राज्य केले आहे.

23) इ.स. 2004 मध्ये हिंदी महासागरात निर्माण झालेल्या त्सुनामीने चेन्नईच्या किनाऱ्याला धडक दिली. या सुनमीामध्ये अनेक व्यक्तींचा मृत्यू झाला. तसेच या सुनामीमुळे चेन्नईची किनारपट्टी कायमस्वरूपी बदलली.

24) चेन्नईचे चार मोठे भाग आहेत : उत्तर, मध्य, दक्षिण आणि पश्चिम. उत्तर चेन्नई मुख्यत: औद्योगिक भाग आहे. मध्य चेन्नई हा चेन्नईचा मुख्य व्यवसायिक भाग असून महत्त्वाचा असणारा पॅरि कॉर्नर येथे वसला आहे.

25) चेन्नई शहर औष्णिक विषुववृत्तावर असून येथील हवामान विषुववृत्तीय हवामान आहे. समुद्रकिनाऱ्यावर असल्यामुळे चेन्नईतील तापमानात मोठे फरक होत नाहीत. जवळजवळ संपूर्ण वर्ष येथील हवा उष्ण आणि दमट असते.

26) चेन्नईची प्रशासनव्यवस्था चेन्नई महानगरपालिका चालवते. चेन्नई नगरपालिकेची स्थापना 9 सप्टेंबर इ.स. 1688 मध्ये झाली.

27) आशियातील सर्वात मोठी रेल्वे कोच निर्मिती कारखाना, इंटिग्रल कोच बिल्डिंग फॅक्टरी, भारत सरकारने चेन्नईजवळील पेरंबूर येथे स्थापित केली आहे.

28) इथल्या उद्योगांमध्ये सुती वस्त्र उद्योग, रसायन उद्योग, कागद व कागदावर बनविलेले उद्योग, मुद्रण उपकरणे व संबंधित उद्योग, चामड्याचे, डिझेल इंजिन, मोटार वाहन, सायकली, सिमेंट, साखर, मॅचमेकिंग, रेल्वे कॅनिंग उद्योग इ. प्रमुख आहेत. या व्यतिरिक्त, विविध प्रकारचे उद्योग व सरकार चालवणारे कारखाने चेन्नईमध्ये आहेत. त्यापैकी इंटिग्रल कोच फॅक्टरी, हिंदुस्तान टेलिप्रिन्टर, चेन्नई रिफायनरी आणि चेन्नई फर्टिलायझर इ. पेट्रो-केमिकल सामग्रीची निर्मिती मद्रास पेट्रोकेमिकल्समध्ये केली जाते.

29) प्रत्येक डिसेंबरमध्ये चेन्नईमध्ये पाच आठवड्यांच्या संगीत हंगामाचे आयोजन केले जाते. हे आयोजन 1927 साली सुरू झालेल्या “मद्रास संगीत प्रबोधनी”ची स्थापना साजरा करण्यासाठी केले जाते. यामध्ये शहरातील आणि आजुबाजूचे शेकडो कलाकार पारंपरिक कर्नाटिक संगीताचे कलाविष्कार (कुचेरी) सादर करतात.

30) “चेन्नई संगमम्” या नावाने ओळखला जाणारा कलामहोत्सव प्रत्येक जानेवारीमध्ये चेन्नईमध्ये आयोजित होतो. यामध्ये तमिळनाडू राज्याच्या विविध कलाप्रकारांचे सादरीकरण केले जाते.

31) चेन्नई तमिळनाडू राज्यात उगम पावलेल्या “भरतनाट्यम” शास्त्रीय नृत्यासाठी प्रसिद्ध आहे.

32) चेन्नई हा “कॉलीवूड्” या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मोठ्या तमिळ चित्रपट सृष्टीचा तळ आहे. या चित्रपटांच्या गीतांचा चेन्नईच्या संगीतावर मोठा प्रभाव आहे.

33) चेन्नईमध्ये साजऱ्या होणाऱ्या सणांमध्ये जानेवारीच्या पाच दिवस साजरा होणारा “पोंगल” हा सण सर्वांत महत्त्वाचा मानला जातो. दिवाळी, ईद-उल-फित्र आणि नाताळ यांसारखे जवळपास सर्व प्रमुख धार्मिक सण चेन्नईमध्ये साजरे केले जातात.

34) चेन्नईची भारतातील तिसरी सर्वात मोठी स्थलांतरित लोकसंख्या 2009 मध्ये 3.5 दशलक्ष होती, 2011 मध्ये 8.5 दशलक्ष आणि 2018 पर्यंत 1.5 कोटींहून अधिक होण्याची शक्यता आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

चेन्नई पाहाण्यासारखी ठिकाणे

मरीना बीच
एमजी फिल्म सिटी
मरुंडेश्वर मंदिर
कोली हिल्स

चेन्नई कोठे आहे?

चेन्नई तमिळनाडू राज्यात आहे.

निष्कर्ष

आजच्या या पोस्टमध्ये आपण चेन्नई शहराविषयी माहिती मराठी (Chennai information in marathi) जाणून घेतली. चेन्नई माहिती मराठी (Chennai mahiti marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Comment