Dronacharya award information in marathi : जेव्हा कोणत्याही प्रसिद्ध खेळाडू चा विषय येतो तेव्हा हा मुद्दा सर्वात पुढे येतो तो म्हणजे त्या खेळाडू चा प्रशिक्षक. प्रशिक्षक हा तोच माणूस असतो जो एका सर्वसामान्य माणसाला एक प्रसिद्ध खेळाडू बनवतो. भारतामध्ये प्रशिक्षकाच्या योगदानाला द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित केले जाते. आणि त्यांच्यामुळेच आपल्या भारत देशाला अनेक खेळांमध्ये पदके मिळत आहेत. आजच्या या पोस्टमध्ये आपण द्रोणाचार्य पुरस्कार माहिती मराठी (Dronacharya award information in marathi) जाणून घेणार आहोत.
Contents
द्रोणाचार्य पुरस्कार माहिती मराठी (Dronacharya award information in marathi)
पुरस्कार | द्रोणाचार्य पुरस्कार |
प्रकार | नागरिक पुरस्कार |
स्थापना | 1985 |
प्रदाता | भारत सरकार |
रोख बक्षीस | 15 लाख |
खेळ आणि खेळांमधील उत्कृष्ट प्रशिक्षणासाठी द्रोणाचार्य पुरस्कार दिला जातो. हा भारत देशातील खेळाच्या प्रशिक्षकाला दिलेला सन्मान आहे. द्रोणाचार्य पुरस्काराचे नाव महाभारतातील गुरु द्रोण यांच्या नावावरून ठेवले गेले आहे, ज्यांना द्रोणाचार्य असे सुद्धा म्हटले जाते. महाभारतामध्ये द्रोणाचार्य कौरव आणि पांडव यांच्या राजकुमारांना सैन्याचे प्रशिक्षण देत होते. खेळ मंत्रालयाद्वारे दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.
द्रोणाचार्य पुरस्कार कोणाला दिला जातो?
द्रोणाचार्य पुरस्कार मैदानामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूच्या प्रशिक्षकाला दिला जाणारा एक पुरस्कार आहे. हा पुरस्कार दरवर्षी खेळ मंत्रालयाद्वारे दिला जातो. ज्यामध्ये दरवर्षी फक्त पाच प्रशिक्षकांची निवड केली जाते. आणि या प्रशिक्षकांची निवड एका मंत्रालयाच्या समिती द्वारे केली जाते. ऑलिंपिक, पैराऑलिंपिक, अशियाई, वर्ल्ड कप, क्रिकेट आणि अनेक स्वदेशी खेळांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या प्रशिक्षकांना हा पुरस्कार दिला जातो.
द्रोणाचार्य पुरस्काराचे स्वरूप काय आहे?
1985 मध्ये द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात झाली. भारत सरकारद्वारे द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्याला एक कांस्यपदक आणि प्रमाणपत्राबरोबरच 15 लाख रुपये बक्षीस दिले जाते. औपचारिक पोशाख सुद्धा या मध्ये दिला जातो.
द्रोणाचार्य पुरस्कार कोणाकडून दिला जातो?
द्रोणाचार्य पुरस्कार विजेतेत्याला हा पुरस्कार मिनिस्त्री ऑफ युथ अफेअरस अंड स्पोर्टस (Ministry of youth affairs and sports – MYAS) यांच्याद्वारे दिला जातो. नॅशनल स्पोर्ट फेडरेशन, इंडियन ओलंपिक असोसिएशन, स्पोर्टस अथोरिटी ऑफ इंडिया ओन्ली राज्य सरकार या प्रशिक्षकांची द्रोणाचार्य पुरस्कारासाठी निवड करत असतात.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
द्रोणाचार्य पुरस्कार कोणाच्या सन्मानार्थ दिला जातो?
द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली होती?
द्रोणाचार्य पुरस्कार केव्हा दिला जातो?
पहिला द्रोणाचार्य पुरस्कार कोणाला दिला गेला होता?
द्रोणाचार्य पुरस्काराची रक्कम किती असते?
निष्कर्ष
आजच्या या पोस्टमध्ये आपण द्रोणाचार्य पुरस्कार माहिती मराठी (Dronacharya award information in marathi) जाणून घेतली. द्रोणाचार्य पुरस्कार माहिती मराठी (Dronacharya purskar mahiti Marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.