भारतातील राज्यांची माहिती | Indian states information in marathi

Indian states information in marathi : आपला भारत देश 29 घटक राज्ये आणि 7 केंद्रशासित प्रदेश मिळून बनलेला आहे. हे आपल्याला तर माहीतच आहे. पण भारतातील अनेक राज्यांची आपल्याला माहिती नसते. आजच्या या लेखात आपण भारतातील राज्यांची माहिती (Indian states information in marathi) जाणून घेणार आहोत. 

Indian states information in marathi
भारतातील राज्यांची माहिती (Indian states information in marathi)

भारतातील राज्यांची माहिती (Indian states information in marathi)

पश्चिम बंगाल राज्याविषयी माहिती (West Bengal information in marathi)

पश्चिम बंगालचे नाव ऐकताच आपल्याला तीन गोष्टी नक्की आठवतात. हावडा ब्रिज, बंगालचा टायगर आणि बंगालचा प्रसिद्ध रसगुल्ला. भारताच्या पूर्व भागामध्ये स्थित पश्चिम बंगालची राजधानी कोलकत्ता आहे. ज्याला पूर्वी कलकत्ता या नावाने ओळखले जात होते. आजच्या या पोस्टमध्ये आपण पश्चिम बंगाल राज्याविषयी माहिती (West Bengal information in marathi) जाणून घेणार आहोत. 

पश्चिम बंगाल मध्य काळापासून व्यापारासाठी समृद्ध केंद्र बनले आहे. पंधराव्या शतकाच्या शेवटी येथे युरोपीय व्यापाऱ्यांचे आगमन झाले होते. आणि अठराव्या शतकाच्या शेवटपर्यंत बंगाल इंग्रजांच्या ताब्यात गेले होते. आणि अशा पद्धतीने ब्रिटिश साम्राज्याची सुरुवात बंगाल पासून झाली होती. 

स्वातंत्र्यानंतर बंगाल ला दोन भागांमध्ये विभागले गेले होते. पूर्वीचा बंगाल बांगलादेश बंगला आणि पश्चिम बंगाल भारतामध्ये जोडला गेला. पश्चिम बंगाल राज्याची तीनचतुर्थांश लोकसंख्या गावांमध्ये राहते. या राज्याची अर्थव्यवस्था कृषीवर आधारित आहे. पश्चिम बंगाल मधील चार मधील तीन व्यक्ती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीत्या शेतीशी जोडलेले आहेत. 

पूर्ण भारत देशामध्ये सर्वात जास्त तागाचे उत्पादन पश्चिम बंगाल राज्यांमध्ये केले जाते. याशिवाय येथे चहा सुद्धा प्रमुख उत्पादन आहे. पश्चिम बंगाल राज्याच्या प्रमुख पिकांमध्ये आले, पान, तंबाखू,गहू आणि मका आहे. याशिवाय भारतामध्ये तांदूळ उत्पादक राज्यांमध्ये सुद्धा याचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की क्षेत्रफळाने इतके लहान असून सुद्धा देशाच्या एकूण 14 टक्के तांदूळ या राज्यांमधून येतो. 

फक्त शेतीच नाही तर येथे खनिज संपदा सुद्धा खूप समृद्ध आहे. पश्चिम बंगाल राज्यामध्ये मॅगनीज, पेट्रोल, कोळसा, लोह, अभ्रक यासारखी किमती खनिजे आढळतात. जर उद्योगधंद्यांचा विचार केला तर येते स्टील उत्पादन, ऑटोमोबाईल उत्पादन, टेक्स्टाईल्स इत्यादींचे उद्योगधंदे आहेत. 

पर्यटनासाठी सुद्धा पश्चिम बंगाल खूप प्रसिद्ध आहे. बंगालच्या खाडी पासून ते हिमालयापर्यंत पसरलेल्या पश्चिम बंगाल मध्ये पाहण्यासाठी खूप ठिकाणी आहेत. हिरवेगार जंगल, पर्वत, समुद्रकिनारा किंवा धार्मिक स्थळे या राज्यामध्ये सर्वकाही आहे. 

चहाच्या बागांसाठी प्रसिद्ध हिल स्टेशन दार्जीलिंग पश्चिम बंगाल राज्यामध्ये स्थित आहे. याशिवाय कलिम्पोंग आणि कुर्सेओंग यांसारखी हिल स्टेशन सुद्धा पर्यटकांना आकर्षित करतात. 

सिटी ऑफ जॉय या नावाने ओळखले जाणारे प्रसिद्ध शहर कोलकत्ता मध्ये भारताची पहिली मेट्रो ट्रेन चालली होती. येथे मेट्रो सुरुवात 1984 मध्ये झाली होती. कोलकत्ता मध्ये पर्यटनासाठी खूप सारी ठिकाणे आहेत. जसे की विक्टोरिया मेमोरियल, दक्षिणेश्वर काली मंदिर, हावड़ा ब्रिज, बिड़ला तारामंडल, साइंस सिटी इत्यादी. साल्ट लेक स्टेडियम जगातील दुसरे सर्वात मोठे फुटबॉल स्टेडियम पश्चिम बंगाल राज्य मध्ये आहे. पश्चिम बंगाल भारतातील त्या शहरांपैकी एक आहे जेथील लोकांना फुटबॉल खूप आवडतो. 

कोलकत्ता मधील ईडन गार्डन स्टेडियम बसण्याच्या क्षमतेनुसार भारतातील सर्वात मोठे आणि जगातील तिसरे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे. दुर्गा पुजा पश्चिम बंगाल मधील सर्वात प्रमुख सण आहे. याशिवाय येते रथयात्रा आणि ईद सुद्धा खूप आनंदाने साजरे केले जातात. पश्चिम बंगाल भारतातील एकमेव असे राज्य आहे ज्याने 4 नोबेल विजेता आणि 1 ऑस्कर विजेता भारताला दिलेला आहे. 

बंगालच्या भूमीने आपल्याला स्वामी विवेकानंद, सुभाषचंद्र बोस, रवींद्रनाथ टागोर, रामकृष्ण परमहंस, राजा राम मोहन रॉय, खुदीराम बोस, सौरभ गांगुली दिले आहेत. ज्यांनी आपल्या कामाच्या जोरावर भारताचे नाव उंचावले आहे. बंगालमधील लोक भात आणि मासे खाण्याला खूप पसंद करतात. बंगाली मिठाई प्रमाणे बंगाली भाषा सुद्धा खूप गोड आहे. 

13 व्या शतकामध्ये पश्चिम बंगाल राज्यावर इस्लामी शासक राज्य करत होते. पश्चिम बंगाल राज्याच्या 65 टक्के भूभागावर धान्याची शेती केली जाते. 

दिल्ली विषयी माहिती (Delhi information in marathi)

Delhi information in marathi : दिल्ली भारतातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक शहर आहे, म्हटलं जातं ना ‘दिल्ली दील वालो की है’. येथे अनेक महाविद्यालय आहेत ज्यामुळे विद्यार्थी दिल्लीला शिक्षणासाठी पसंद करतात. याबरोबरच दिल्ली ही आपल्या भारत देशाची राजधानी आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण दिल्ली विषयी माहिती (Delhi information in marathi) जाणून घेणार आहोत. 

मुंबई शहर नंतर दिल्ली भारतातील सर्वात मोठे व्यापारी महानगर मानले जाते. दिल्ली शहराची स्थापना डिसेंबर 1991 मध्ये झाली होती. पूर्वी पांडवांची राजधानी म्हणून इंद्रप्रस्त या रूपामध्ये दिल्लीचा उल्लेख केला जात होता.  भारतातील सर्वात मोठी जामा मज्जित दिल्ली मध्ये स्थित आहे. दिल्लीमध्ये स्थित टायलेट म्युझियम पूर्ण जगामध्ये सर्वात अनोखे म्युझियम मानले जाते. 

1 नोव्हेंबर 1956 मध्ये दिल्ली या शहराला एक केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आले आहेत. जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असणारे हे दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. पहिल्या क्रमांकावर टोकियो आहे. दिल्लीत मेट्रो ट्रेन मध्ये कोणत्याही प्रकारचा कचऱ्याचा डबा नसतानासुद्धा कचरा केला जात नाही. एका काळामध्ये दिल्ली शहर दरवाज्यानी भरलेले होते. म्हणजेच येथे 14 गेट होते. परंतु या 14 मधील आता फक्त पाच गेट आहेत. अजमेर गेट, काश्मिरी गेट, लाहोरी गेट, दिल्ली गेट आणि तूर्कमान गेट. सहाव्या शतकामध्ये दिल्लीचा शोध लागला होता असं काही लोकांचे म्हणणे आहे. 

दिल्लीमध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये इंग्लिश, हिंदी, ऊर्दू आणि पंजाबी भाषा बोलली जाते. दिल्ली शहराचा जवळजवळ वीस टक्के भाग हिरवळीने झाकलेला आहे. भारताची राजधानी दिल्ली क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे शहर आहे. ज्याचे क्षेत्रफळ जवळजवळ 1484 चौरस किलोमीटर आहे. दिल्लीमध्ये लक्ष्मीनारायण मंदिर स्तिथ आहे. या मंदिराचे उद्घाटन महात्मा गांधी यांनी केले होते. या मंदिराला बिडला मंदिर या नावाने ओळखले जाते. 

दिल्लीमध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये इंग्लिश, हिंदी, ऊर्दू आणि पंजाबी भाषा बोलली जाते. दिल्ली शहराचा जवळजवळ वीस टक्के भाग हिरवळीने झाकलेला आहे. भारताची राजधानी दिल्ली क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे शहर आहे. ज्याचे क्षेत्रफळ जवळजवळ 1484 चौरस किलोमीटर आहे. 

दिल्लीमध्ये लक्ष्मीनारायण मंदिर स्तिथ आहे. या मंदिराचे उद्घाटन महात्मा गांधी यांनी केले होते. या मंदिराला बिडला मंदिर या नावाने ओळखले जाते. दिल्लीमध्ये स्थित कमल मंदिर पाहण्यासाठी जवळ-जवळ आठ हजार विदेशी पर्यटक दररोज येतात. 

दिल्लीमध्ये महाराजा जयसिंह द्वारे स्थापित जंतर-मंतर नावाची एक खगोलीय वेधशाळा सुद्धा आहे. जगातील सर्वात उंच मिनार कुतुब मिनार दिल्ली मध्ये स्थित आहे. दिल्ली शहरामध्ये सायकलला खूप महत्व दिले जाते. येथे आपल्याला सहजपणे सायकल भाड्याने मिळेल. दिल्लीमध्ये स्थित खारी बावली नावाचा मसाल्यांचा बाजार अशियातील सर्वात मोठा मसाल्यांचा बाजार आहे. अनेक लोकांना वाटते की नवी दिल्ली आणि दिल्ली एकच आहे, परंतु हे दोन्ही पूर्णपणे वेगळे आहेत. तुम्हाला सांगू इच्छितो की नवी दिल्ली भारताची राजधानी आहे, आणि ती दिल्लीचा भाग आहे. 

सिक्किम राज्य विषयी माहिती (Sikkim information in marathi)

सन 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले, परंतु भारतामध्ये अशी ही काही राज्ये आहेत जी स्वातंत्र्यानंतर बनली. त्यामध्ये सिक्कीम सुद्धा सामील आहे. सिक्कीम भारताचा हिस्सा सन 1975 मध्ये बनले. सिक्किम मध्ये दरवर्षी मार्च ते मे महिन्याच्या मध्ये आंतरराष्ट्रीय पुष्पमहोत्सव आयोजित केला जातो. या छोट्याशा राज्यांमध्ये 600 प्रकारची वेगवेगळी फुले मिळतात. आणि 240 प्रकारची वेगवेगळी झाडे आहेत. सिक्कीम हे राज्य प्राकृतिक रूपाने भारतातील सर्वात समृद्ध राज्य आहे. 

सिक्किम भारतातील सर्वात सुंदर राज्यांपैकी एक राज्य आहे. हे भारतातील एकमेव असे राज्य आहे जेथे राहणारे स्थानिक लोक वेगवेगळ्या देशाचे मूळनिवासी आहेत. होय सिक्कीम मध्ये राहणारे जास्त करून लोक नेपाळी मुलखाचे आहेत. ज्याप्रमाणे सिक्कीम राज्याची प्राकृतिक रचना खूप सुंदर आहे त्याप्रमाणेच येथे अनेक पक्ष्यांच्या प्रजाती सुद्धा आढळतात. सिक्कीम पक्षांसाठी स्वर्गा प्रमाणे आहे. सिक्कीम राज्यामध्ये पक्षांच्या 552 प्रजाती आढळतात, तर कीटकांच्या 690 प्रजाती आढळतात. 

ज्याप्रमाणे उत्तर भारतामध्ये गंगा नदी ला एक पवित्र नदी मानली जाते, त्याप्रमाणेच सिक्कीम राज्यामध्ये भूम चू पवित्र जल आहे. सिक्कीम राज्य मध्ये नेहमी तापमान खूप कमी असते. असे असूनही येथे गरम पाण्याचे स्त्रोत आढळतात. ज्यामध्ये आपण आंघोळ करून स्वतःला ताजेतवाने करू शकतो. 

थंका पेंटिंग सिक्कीममधील स्थानिक कला आहे. जी बौद्ध संस्कृतीशी जोडलेली आहे.सिक्कीम भारतातील एकमेव असे राज्य आहे, जेथील मंदिर, मस्जिद, चर्च आणि गुरुद्वार यांची देखरेख एक वेगळे मंत्रालय करते. जवळजवळ दोनशे धार्मिक स्थळांची देखरेख येथे मंत्रालय करते. 

सिद्धेश्वर धाम शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. हे मंदिर नामची च्या जवळील सोलोफोक या पर्वतावर स्थित आहे. या मंदिरामध्ये शंकराची 108 फूट लांबीची प्रतिमा आहे. हे मंदिर सिक्किम मधील प्रमुख पर्यटन केंद्र आहे. नेपाळी ही सिक्किम मध्ये सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे. येथील अधिकृत भाषा इंग्रजी आहे. सिक्कीम राज्यामध्ये अनेक स्थानिक भाषा सुद्धा बोलल्या जातात. हिंदी बोलणारे लोक सुद्धा सिक्कीम मध्ये राहतात. 

सिक्कीम राज्यामध्ये 28 पर्वत, 80 पेक्षा जास्त हिमनद्या आणि पाच गरम पाण्याचे झरे आहेत. 2011 च्या जनगणनेनुसार पुरुषांचा साक्षरता दर 87% आणि महिलांचा साक्षरता दर 76 टक्के होता. सिक्किम मध्ये स्वच्छता सर्वांची जबाबदारी आहे. सिक्कीम राज्याला भारत सरकार कडून सन 2010 मध्ये सर्वात स्वच्छ राज्याचा पुरस्कार मिळाला होता.

सिक्किम एक कृषीप्रधान राज्य आहे. येथे जास्त करून लोक पारंपरिक पद्धतीने शेती करतात. येथील शेतकरी संत्री, सफरचंद, चहा यासारख्या पिकांची शेती करतात. या राज्याच्या दक्षिण भागांमध्ये भाताची शेती केली जाते.सिक्किम मध्ये तसं पाहायला गेलं तर अनेक मंदिरे आणि मठ आहेत. परंतु येथील लोक पूजा फक्त बाबा हरभजन यांची करतात. बाबा हरभजन यांना नाथुला येथील हीरो या नावाने सुद्धा ओळखले जाते. त्यांनी आपल्या प्राणाची बाजी लावून चिनी सैनिकांना रोखले होते, आणि अनेक सैनिकांचा जीव वाचवला होता.

सिक्किम राज्य मधील लोक भारतातील सर्व हिंदू सण जसे की दिपावली, दसरा साजरा करतात.हिमालया मध्ये स्थित सिक्किम राज्यातील जगातील तिसरे सर्वात उंच पर्वत कांचनजंगा आहे. 

मणिपूर राज्य विषयी माहिती (Manipur information in marathi)

मणिपूर भारताच्या शेजारील म्यानमारच्या सीमेला लागून असलेले एक आकर्षित उत्तर-पूर्व राज्य आहे. मणिपूरची राजधानी इंफाळ आहे, आणि मणिपूरला दक्षिण आशियाचे प्रवेशद्वार असे सुद्धा मानले जाते. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मणिपूरला भारताचा दागिना असे सुद्धा म्हटले होते. आजच्या या पोस्टमध्ये आपण मणिपूर राज्य विषयी माहिती (Manipur information in marathi) जाणून घेणार आहोत. 

मणिपूरमधील लोकांचे जीवन साधारणपणे स्वस्थ आणि शाकाहारी असते. त्यांच्या आहारामध्ये साधारणपणे भात, मासे आणि ऋतुमानानुसार असणाऱ्या भाज्या असतात. स्वस्थ आणि शाकाहारी भोजन करणारे मणिपूरमधील लोक आपल्या भोजनामध्ये मसाल्यांचा वापर खूप करतात. 

मणिपुरी भाषेमध्ये इमा शब्दाचा शाब्दिक अर्थ इंग्रजी शब्द मदर म्हणजे आई आहे. येथे इमा किथेल वूमन मार्केट नावाचा एक बाजार आहे जो पूर्णपणे महिलांद्वारे चालवला जातो. हा बाजार पाचशे वर्षापेक्षा जुना आहे. येथील महिला खूप काळापासून वाणिज्य, सामाजिक, राजनीतिक गोष्टींमध्ये सर्वात पुढे आहेत. मणिपूर राज्यांमध्ये स्थित इम्फाळ हे ऐतिहासिक स्थळ खूप लांब काळापासून एक महत्त्वपूर्ण व्यापारी केंद्र बनले आहे. या बाजारामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी जसे की फॅशनेबल कपडे, भाज्या, मसाले इत्यादी मिळतात. 

मणिपूर राज्य संस्कृती आणि परंपरांचे एक केंद्र आहे. आणि यामुळे मणिपुरी लोकांची वेशभूषा आणि कपड्यांची शैली त्यांच्या संस्कृतीला प्रेरित असते. मनिपुर या शब्दाचा अर्थ रत्नांची भूमी असा होतो. मणिपूर राज्याची स्थापना 21 जानेवारी 1972 ला झाली होती. मणिपूर राज्यामध्ये नऊ जिल्हे आहेत. 

मणिपूर राज्याचे क्षेत्रफळ 22327 चौरस किलोमीटर आहे. मणिपूर एकमेव असे ठिकाण आहे जेथे ब्राउ-एंटिलर्ड हरिण आढळते. मणिपूर राज्यातील रस्त्यांची एकूण लांबी 12618 किलोमीटर आहे. चूडाचांदपुर, बशिनूपुर, इंफाल, सेनापति, चंदेल, तामेंगलोंग ही मणिपूर राज्यातील सर्वात मोठी शहरे आहेत. 

मक्का आणि तांदूळ हे मणिपूर राज्यातील प्रमुख पिके आहेत. मणिपूर आणि बराक या मणिपूर राज्यातील प्रमुख नद्या आहेत. मणिपुर राज्याची राजकीय भाषा मणिपुरी आहे. नागपूर राज्याचा राज्य पक्षी ‘मिसेज हृाम्स फीशेन्ट’ हा आहे. 

मणिपूर राज्याच्या उत्तर भागामध्ये नागालँड आणि दक्षिण भागांमध्ये मिजोरम स्थित आहे. मणिपूरच्या पश्चिम आणि पूर्व भागामध्ये आसाम आणि म्यानमार स्थित आहेत. आपल्या वनवासाच्या काळामध्ये पांडवांनी मणिपुर मध्ये भ्रमण केले आहे असे सांगितले जाते. 21 जानेवारी 1972 मध्ये मणिपूर राज्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला होता. 

मणिपूर राज्य मध्ये तीन प्रमुख प्रजाती राहतात. मीतई, नागा आणि कुकी – चीन. मणिपूर राज्यातील लोकांना अनेक नावांनी बोलावले जाते.  जसे की मिति, पीरी मिति, मैती आणि मिति इत्यादी. मणिपूर राज्यातील लोकांना कला आणि संस्कृतीचे खूप वेड आहे. येथे तुम्हाला एकही अशी मुलगी सापडणार नाही जिला गाणे किंवा डान्स येत नाही. 

तेलंगणा राज्य विषयी माहिती (Telangana information in marathi)

तेलंगणा भारताच्या 29 राज्यांपैकी एक राज्य आहे जे दक्षिण भारतामध्ये स्थित आहे. तेलंगणा राज्याच्या सीमा महाराष्ट्राच्या उत्तर आणि पश्चिमेला, छत्तीसगडच्या उत्तरेला, कर्नाटकाच्या पश्चिमेला आणि आंध्रप्रदेशच्या पूर्व आणि दक्षिणेला लागतात. विलगीकरणसाठी आंदोलन केल्यानंतर 2 जून 2014 ला तेलंगणा राज्याला एका वेगळ्या राज्याचा दर्जा मिळाला आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण तेलंगणा राज्य विषयी माहिती (Telangana information in marathi) जाणून घेणार आहोत. 

सोळाव्या आणि सतराव्या शतकाच्या दरम्यान या क्षेत्रावर मुघलांचे शासन होते. अठराव्या शतकामध्ये आणि ब्रिटिश राज्याच्या काळात तेलंगणा वर हैदराबादच्या निजामाचे शासन होते. 

तेलंगणा राज्याच्या सीमा पाच राज्यांना लागतात. त्यामध्ये छत्तीसगड, ओडिसा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र ही राज्ये आहेत. तेलंगणा हे क्षेत्र मुख्यता गोदावरी आणि कृष्णा या नद्यांवर मध्ये वसलेले आहे. कृष्णा नदीचा 69 टक्के भाग आणि गोदावरी नदी चा 79 टक्के भाग तेलंगणाच्या क्षेत्राने व्यापलेला आहे. दक्षिण भारतामध्ये गोदावरी नदीला एक पवित्र नदी मानले जाते. यालाच दक्षिणगंगा असेही म्हणतात. 

मेहबूब नगर तेलंगणा मधील सर्वात मोठा जिल्हा आहे. आणि रंगा रेड्डी लोकसंख्येच्या हिशोबाने तेलंगणा मधील सर्वात मोठा जिल्हा आहे. तेलंगणा राज्याची लोकसंख्या जवळ जवळ चार कोटी आहे. ज्यामध्ये जवळ-जवळ 84 टक्के लोकसंख्या हिंदू धर्माची, तेरा टक्के लोकसंख्या मुस्लिम धर्माची आणि इतर लोकसंख्या शीख आणि अन्य धर्माची आहे. 

तेलंगणा राज्याची राज्यभाषा तेलगु आणि उर्दू आहे. भारतातील प्रमुख नद्या गोदावरी आणि कृष्णा या तेलंगणा राज्यातील सर्वात मोठ्या नद्या आहेत. भारतातील सर्व राज्यांच्या यादीमध्ये तेलंगणा 12 व्या क्रमांकावरील सर्वात मोठे राज्य आहे. 

तेलंगणा मधील सर्वात मोठे शहर हैदराबाद आहे. याशिवाय वारंगल, ख्म्मम, करीमनगर आणि निजामाबाद ही तेलंगणा मधील प्रमुख नगरे आहेत. Blue Jay (निळकंठ पक्षी) हा तेलंगणा राज्याचा राज्य पक्षी आहे. 

तेलंगणा राज्यातील लोक कृषी प्रेमी आहेत. येथे तांदूळ, ऊस, कापूस आणि तंबाखूची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. तेलंगणा राज्यातील भद्राचलम जिल्हा मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. भद्राचलम येथे स्थित श्री सिता रामचंद्र मंदिर येथील प्रसिद्ध मंदिर आहे. याच्या दर्शनासाठी दररोज मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. तेलंगणा राज्य अनेक प्रकारच्या प्राकृतिक सौंदर्याने भरलेले आहे. जे पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येतात. 

सारांश 

आजच्या या लेखामध्ये आपण भारतातील राज्यांची माहिती (Indian states information in marathi) जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. 

Leave a Comment