Minerals information in marathi : खनिज हा भौतिक पदार्थ आहे जो खाणीतून काढला जातो. लोह, अभ्रक, कोळसा, बॉक्साईट मीठ, जस्त, चुनखडी इत्यादी काही उपयुक्त खनिजांची नावे आहेत. आजच्या या लेखामध्ये आपण खनिजे म्हणजे काय (Minerals information in marathi) याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.
Contents
खनिजे म्हणजे काय (Minerals information in marathi)
खाणीत सापडणाऱ्या उपयुक्त पदार्थाला खनिज असे म्हणतात. काही व्याख्यांनुसार, खनिज हा एक पदार्थ आहे जो क्रिस्टलीय आहे आणि भौगोलिक परिस्थितीच्या परिणामी तयार होतो. खाणीतून मिळणारी खनिजे शुद्ध मिळत नाहीत, ती प्रथम धुतली जातात, मातीचे कण व इतर विद्राव्य व अविघटनशील संयुगे धुतल्यानंतर मिळणाऱ्या पाण्यात मिसळतात, हे पाणी शेवटी पाण्यात मिसळते, त्यामुळे नैसर्गिक पाण्याचा प्रवाह दूषित होतो.
इंटरनॅशनल मिनरलॉजिकल असोसिएशन (IMA) ही खनिज प्रजातींच्या व्याख्या आणि नामकरणासाठी मान्यताप्राप्त मानक संस्था आहे.
- विष्णुपुरी धरण माहिती मराठी (Vishnupuri dam information in marathi)
- भारतातील राष्ट्रीय उद्याने माहिती मराठी (National Parks Of India Information in Marathi)
खनिजांचा अर्थ काय आहे (Minerals meaning in Marathi)
इंग्लिश भाषेत खनिज शब्दाचा पहिला ज्ञात वापर 15 व्या शतकात झाला. हा शब्द मध्ययुगीन लॅटिनमधून आला आहे.
खनिज ही संकल्पना खडकापासून वेगळी आहे, जी मोठ्या प्रमाणातील घन भूगर्भीय सामग्री आहे जी तुलनेने मोठ्या प्रमाणात एकसमान आहे. एका खडकामध्ये एका प्रकारच्या खनिजांचा समावेश असू शकतो, किंवा दोन किंवा अधिक वेगवेगळ्या प्रकारच्या खनिजांचा एकत्रित समावेश असू शकतो.
खनिजांचे वर्गीकरण
गुणधर्मानुसार खनिजांचे तीन प्रकारे वर्गीकरण केले जाते.
धातू खनिजे : लोह खनिजे, तांबे, जस्त, सोने, चांदी, मॅग्नेशिअम, बॉक्साईड, क्रोमियम, युरेनियम इ. धातू भूगर्भात अशुद्ध स्वरूपात सापडतात. त्यावर प्रक्रिया करून शुद्ध धातू मिळवतात.
अधातू खनिजे : अभ्रक, ग्रॅफाईट, गंधक, हिरा इ. अधातू खनिजे आहेत.
ऊर्जा साधनसंपत्ती : कोळसा, खनिज तेल नैसर्गिक वायू, आण्विक ऊर्जा यांचा ऊर्जा साधनसंपत्तीत समावेश होतो.
प्रमुख खनिजांची नावे (Minerals name in Marathi)
- लोह
- तांबे
- बॉक्साइट
- हिरा
- टायटानियम डायऑक्साइड
- झिंक
- कोबाल्ट
- निकेल
- युरेनियम
- चुनखडी
खनिजे आणि पर्यावरण
खनिजे पृथ्वीच्या उथळ आणि वरच्या भागात सापडत असल्यामुळे जंगलातील विस्तीर्ण प्रदेशातील झाडे तोडावी लागतात. त्यामुळे जंगलाचे प्रचंड प्रमाणात नुकसान होते. खाणकामाचा धोका जंगलप्रदेश, संरक्षित प्रदेश, त्यांजवळील वन्यजीव अभयारण्ये व राष्ट्रीय उद्याने यांना संभवतो. परिणामी वन्यजीव, उपयुक्त वनस्पती यांच्या प्रजाती नष्ट होतात. याचा विपरित परिणाम नैसर्गिक चक्रावर होतो.
खाणकामामुळे झालेल्या पर्यावरणाचे झालेले नुकसान कायमचे आणि भरून न काढता येण्याजोगे असते. खाणकामामुळे परिसरातील जलस्रोतांवर निश्चितच दुष्परिणाम होतात. प्रकल्पासाठी जवळच्या नदी, तलावांतून मोठय़ा प्रमाणावर पाणी उपसले जाते. अनेक वेळा दूषित पाणी प्रक्रिया न करता सोडले जाते. खेरीज डोंगर फोडल्याने, वनस्पतींचे आवरण नाहीसे झाल्याने जमिनीची धूप होते व परिसराची पाणी अडवण्याची व जिरवण्याची क्षमता घटते. परिणामी प्रदेश कोरडा होत जातो. जंगलांतील पानगळ होणाऱ्या झाडांची जागा कमी पाण्यात निभाव धरणाऱ्या खुरट्या वनस्पती घेतात.
खनिजांचे उपयोग कोणते (Uses of minerals in Marathi)
- लोह खनिजांचा उपयोग कृषी अवजारे, वाहनांचे सुट्टे भाग, इमारती बांधकामे इ. करण्यासाठी होतो.
- मॅगनीज चा उपयोग उच्च प्रतीचे पोलाद तयार करण्यासाठी होतो.
- बॉक्साईड पासून अॅल्युमिनियम धातू मिळवला जातो.
- युरेनियम, थोरियम यांचा उपयोग अणुऊर्जा निर्मितीसाठी केला जातो.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
खनिजे म्हणजे काय? खनिजे कशाला म्हणतात?
समुद्रातून कोणती खनिजे मिळतात?
भारतातील खनिजांचे साठे असणारी राज्ये?
मोठ्या प्रमाणावर कोळसा क्षेत्र असलेल्या दोन राज्यांची नावे सांगा?
अरबी समुद्रातील खनिज तेल क्षेत्राचे नाव काय?
भारतात खनिज तेलाच्या खाणी कोठे आहेत?
सारांश
मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण खनिजे म्हणजे काय (Minerals information in marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. खनिजे माहिती मराठी (Khanije mahiti Marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.