Top 10 Tourist Places of Telangana in marathi : तेलंगणा राज्यातील दहा पर्यटन स्थळे तेलंगाना हे राज्य भारतातील प्रमुख राज्यांपैकी एक आहे. तेलंगणा हे भारतातील नवोदित 29 वे राज्य आहे. इतिहास आणि संस्कृतीने परिपूर्ण असलेले हे राज्य प्राचीन मंदिरांसाठी ओळखले जाते. तेलंगाना या राज्यामध्ये बरीच ऐतिहासिक आणि नैसर्गिक पर्यटन स्थळे आहेत. भारतातील बरेच पर्यटक या राज्याला भेट देण्यासाठी येत असतात. आजच्या या पोस्टमध्ये आपण तेलंगणा राज्यातील दहा पर्यटन स्थळे माहिती मराठी याविषयी माहिती (Top 10 Tourist Places of Telangana in marathi) जाणून घेणार आहोत.
Contents
तेलंगणा राज्यातील दहा पर्यटन स्थळे (Top 10 Tourist Places of Telangana in marathi)
राज्य | तेलंगणा |
राजधानी | हैदराबाद |
सर्वात मोठे शहर | हैदराबाद |
जिल्हे | 33 |
क्षेत्रफळ | 1,14,840 चौकिमी |
लोकसंख्या | 3,52,86,757 (2011) |
राज्यभाषा | तेलुगू, उर्दू |
10) मेहबूबनगर
मेहबूबनगर हे तेलंगाना मधील सर्वात आकर्षक आणि लोकप्रिय ठिकाण आहे. हैदराबादचे सहाव्या निजाम वीर महबूब अली खान यांच्या नावावरून हे नाव देण्यात आलेले आहे. या ठिकाणी आपल्याला फरहाबाद, खिलमरी, अलमपूर, गडवालमल्ल्याला, तिर्थम अशा अनेक ठिकाणांना भेट देता येईल. मेहबूबनगर हे ठिकाण हैदराबाद पासून साधारणता शंभर किलोमीटर इतके अंतरावर आहे.
9) किन्नर सानी वन्यजीव अभयारण्य
तेलंगणातील सर्वात सुंदर पर्यटन स्थळांमध्ये किन्नर सनी वन्यजीव अभयारण्याची गिनती केली जाते. या अभयारण्यात अनेक प्रकारचे पक्षी आणि प्राणी आढळून येतात. तेलंगणा मधील थम्मम जिल्ह्यामधील किन्नर सानी धरणा जवळ हे अभयारण्य आहे. हे अभयारण्य साधारणतः 635.4 चौरस किलोमीटर एवढे परिसरामध्ये विस्तारलेले आहे. या ठिकाणी पॅंथर, शिंकारा, चितळ, सांबर, वाघ, काळवीट असे अनेक प्रकारचे प्राणी आढळून येतात.
8) करीमनगर
करीमनगर कोटीलिंग ही सातवाहन साम्राज्याची पहिली राजधानी होती. करीमनगर हे ठिकाण एक लोकप्रिय पिकनिक स्पॉट म्हणून ओळखले जाते. करिमोदिनच्या नावावरूनच या शहराला करीमनगर हे नाव देण्यात आले. या ठिकाणी बरेच पर्यटन स्थळे आहेत. या ठिकाणी आपल्याला नागनूर किल्ला, धुल्ही कट्टा, रामगिरी किल्ला अशा अनेक ठिकाणांना भेट देत येईल. करीब नगर हे शहर हैदराबाद पासून 164 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.
7) खम्मम
हे ठिकाण तेलंगणा मधील सर्वात सुंदर आणि लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे. या शहराचे नाव एका टेकडीवर बांधलेल्या नरसिहाद्री मंदिराहून देण्यात आलेले आहे. वारंगल आणि नलगोंडा ही ठिकाणे एकत्र करून या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली होती. या जिल्ह्याच्या नावाने एक सण सुद्धा साजरा केला जातो.
6) पापीकोंडालू
हे दक्षिण भारतातील एक सुंदर पर्वत संचाल आहे. या ठिकाणी असणारे वातावरण अतिशय सुंदर आणि मनाला लोभावणारे आहे. जसजसे आपण या टेकडी जवळ जातो तसेच गोदावरी नदी अरुंद होत जाते. पापीकोंडालू हा शब्द पापडी आणि कोंढाणू या दोन नावावरून बनवलेला आहे. पापडी हा तेलुगु शब्द आहे याचा अर्थ स्त्रीच्या केसाचा मधला भाग म्हणजेच मांग होय. पापीकोंडालू या ठिकाणी असणारा नैसर्गिक देखावा पाहण्यासाठी बरेच पर्यटक घेत असतात
5) नलगोंडा
नलगोंडा हे ऐतिहासिक दृष्ट्या खूप महत्त्वाचे ठिकाण आहे. हे ठिकाण अनेक सत्ताधारी राजकारणाचे केंद्र राहिले आहे. याचा राजकीय इतिहास हा मौर्य राजघराण्यांच्या आगमनापासून सुरू होतो. नलगोंडा या शहरांमध्ये बरेच ऐतिहासिक पर्यटन स्थळे आहेत. या ठिकाणी मतमपल्ली, यादगिरी गुप्ता, वडापल्ली अशी अनेक ठिकाणी आहे.
4) मेदक
मेदक ठिकाण तेलंगणातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. मेदक या शहराची निगडित अतिशय मनोरंजक असा इतिहास सांगितला जातो. असे म्हटले जाते की या शहराचे मूळ नाव सिद्धपुरम असे होते. मेदक शहराच्या संरक्षणासाठी शहराभोवती एक किल्ला बांधला. हा किल्ला एका टेकडीच्या माथ्यावर बांधला गेला त्याला मेतृदुर्गं असे नाव देण्यात आले. व त्याला पुढे मेदक म्हणून ओळखले जाऊ लागले.
3) आदिलाबाद
आदिलाबाद हे तेलंगणातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. तेलंगणातील दुसरा सर्वात मोठा जिल्हा हा आदिलाबादचा आहे. आदिलाबाद मध्ये असणाऱ्या डोक्रा आणि पेंटिंग या हस्तकला जगप्रसिद्ध आहेत. आदिलाबाद येथे कॉर्टिकल धबधबा आणि नरसिंह स्वामी मंदिर अशी अनेक ठिकाणी आहेत.
2) वरंगल
वरंगल हे शहर तेलंगणातील पर्यटनाचे केंद्र म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी अनेक प्रसिद्ध मंदिरे आणि प्रभावी किल्ले आहेत. वरंगल या ठिकाणी असणारे सुंदर तलाव उत्कृष्ट मंदिरे आणि नैसर्गिक वातावरणामुळे हे ठिकाण पर्यटनाचे केंद्र म्हणून ओळखले जाते. येथे अनेक दर्शनीय स्थळे आहेत. या ठिकाणी आपल्याला हजार खांबाचे मंदिर, भद्रकाली मंदिर, वरंगल किल्ला, रामाप्पा मंदिर अशी अनेक ठिकाणी पाहायला मिळतील. तेलंगणा राज्यातील दहा पर्यटन स्थळे माहिती मराठी याविषयी माहिती (Top 10 Tourist Places of Telangana in marathi)
1) हैदराबाद
हैदराबाद हे शहर तेलंगणातील सर्वात सुंदर आणि आकर्षक ठिकाणांपैकी एक आहे. हैदराबाद शहरांमध्ये सुंदर स्मारकांपासून ते स्वादिष्ट बिर्याणी आणि पारंपारिक पदार्थापर्यंत खूप गोष्टी प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर या शहरांमध्ये अनेक मॉल्सही आहेत. या शहरांमध्ये मकबरे, राजवाडे, किल्ले आणि मशीदीच्या भव्य वास्तुकाला पाहायला मिळतील. हैदराबाद मध्ये रामोजी फिल्म सिटी, चारमिनार, गोलकोंडा किल्ला, भूषण सागर तलाव अशी प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत. तेलंगणा राज्यातील दहा पर्यटन स्थळे (Top 10 Tourist Places of Telangana)
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
तेलंगणाचे राज्य फुल
काकतीय रुद्रेश्वर मंदिर तेलंगणा
तेलंगणा हे भारताचे कितवे राज्य आहे?
तेलंगणा ची राजधानी
तेलंगणातील प्रमुख सण
तेलंगणा राज्याची निर्मिती केव्हा झाली होती?
निष्कर्ष
आजच्या या पोस्टमध्ये आपण तेलंगणा राज्यातील दहा पर्यटन स्थळे माहिती मराठी याविषयी माहिती (Top 10 Tourist Places of Telangana in marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.