क्षेत्रभेट म्हणजे काय | kshetrbhet Mhanje kay

kshetrbhet Mhanje kay : क्षेत्रभेट हा शब्द तुम्ही अनेक वेळा ऐकला असेल. तेव्हा तुम्हाला या विषयी जाणून घ्यायची इच्छा नक्कीच झाली असेल. आजच्या या लेखामध्ये आपण क्षेत्रभेट म्हणजे काय (kshetrbhet Mhanje kay) याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

kshetrbhet Mhanje kay
क्षेत्रभेट म्हणजे काय (kshetrbhet Mhanje kay)

क्षेत्रभेट म्हणजे काय (kshetrbhet Mhanje kay)

क्षेत्रभेट ही भूगोलाची एक महत्वाची अभ्यासपद्धती आहे. एखाद्या ठिकाणास प्रत्यक्ष भेट देऊन भौगोलिक, संकल्पनांची व घटकांची प्रत्यक्ष अनुभवाद्वारे माहिती मिळवणे म्हणजे क्षेत्रभेट होय.

क्षेत्रभेटीची पूर्वतयारी कशी करावी

क्षेत्रभेटीचा हेतू म्हणजेच उद्देश निश्चित करणे. उद्देशानुसार क्षेत्रभेटीसाठी ठिकाणाची निवड करणे.

काही ठिकाणांना भेट देण्यासाठी पूर्वपरवानगी आवश्यक असते अश्या ठिकाणांची परवानगी मिळवणे.

तेथे कोणकोणत्या बाबी पहायच्या आहेत त्यानुसार वेळापत्रक तयार करावे.

क्षेत्रभेटीदरम्यान माहिती मिळवण्यासाठी प्रश्नावली तयार करणे.
आवश्यक साहित्याची यादी करणे.

क्षेत्रभेटीसाठी आवश्यक साहित्य

क्षेत्रभेटीसाठी जाताना मार्ग नकाशा व निवडलेल्या ठिकाणाचा नकाशा आवश्यक आहे.

क्षेत्रभेटीदरम्यान मिळालेल्या माहितीची नोंद घेण्यासाठी वही, पेन, पेन्सिल तसेच मोजपट्टी घ्यावी.

विविध वस्तू, भूरूपे इत्यादींचे छायाचित्र काढण्यासाठी सोबत कॅमेरा घ्यावा.

स्थान निश्चितीसाठी होकायंत्र, दुरवरील दृश्ये पाहण्यासाठी दुर्बीण
क्षेत्रभेटीदरम्यान विविध नमुने उदा. माती, खडक ई. गोळा करण्यासाठी सोबत पिशवी घ्यावी.

सोबत प्रथमोपचाराची पेटी घ्यावी.

क्षेत्रभेटीची आवश्यकता का आहे किंवा क्षेत्रभेटीचे महत्व

क्षेत्रभेट ही भूगोलाची एक महत्वाची अभ्यासपद्धती आहे.
पाठ्य पुस्तकात शिकलेल्या भौगोलिक संकल्पना, घटक तसेच विविध भौगोलिक प्रक्रिया प्रत्यक्ष अनुभवाद्वारे शिकता येतात.
प्रत्येक प्रदेशाची स्वतंत्र भौगोलिक वैशिष्टये असतात. ती जाणून घेण्यासाठी क्षेत्रभेट उपयुक्त ठरते.

एखाद्या प्रदेशातील भौगोलिक परिस्थितीसह मानव आणि पर्यावरण यांचा सहसंबंध जाणून घेता येतो.

क्षेत्रभेटीसाठी निवडलेल्या क्षेत्राच्या भौगोलिक परिस्थितीबरोबरच सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक स्थितीचाही अभ्यास करता येतो.

क्षेत्रभेटीमुळे भूगोलाचा अभ्यास रंजक स्वरूपाचा होतो.

क्षेत्रभेटीदरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन कसे करावे?

क्षेत्रभेटीसाठी गेलेले ठिकाण स्वच्छ राहील याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे ती आपली नैतिक व सामाजिक जबाबदारी आहे.

क्षेत्रभेटीदरम्यान कचरा इतरत्र होणार नाही याची काळजी घेऊ.

झालेला कचरा गोळा करून तो तेथील कचरापेटीत टाकू.

आपल्यासोबत कचरा संकलित करण्यासाठी मोठ्या आकाराच्या पिशव्या घेऊ जेणेकरून क्षेत्रभेटीच्या ठिकाणी कचरापेटी उपलब्ध नसल्यास आपला कचरा या पिशव्यांत टाकून त्याची विल्हेवाट लावता येईल.

क्षेत्रभेटीदरम्यान तेथे परिसर स्वच्छतेबाबत जनजागृती करता येईल.

क्षेत्रभेट अहवाल लेखन आराखडा

प्रस्तावना : यामध्ये क्षेत्रभेटीचा उद्देश व संकल्पना लिहावी.

स्थान व मार्ग नकाशा : क्षेत्रभेटीचे स्थान उदा. ठिकाणचे नाव, जिल्हा व तालुका तसेच मार्ग नकाशा काढावा.

प्राकृतिक घटक : यात त्या ठिकाणी असणारे प्राकृतिक घटक
उदा. नदी, डोंगर, धबधबा, सागर किनारा इत्यादींची माहिती लिहावी.

आर्थिक घटक : क्षेत्रभेटीसाठी निवडलेला घटक जर आर्थिक व्यावसायिक असेल उदा. कारखाना, बाजारपेठ तर तेथील प्रमुख उत्पादन, व्यवसाय ई. अनुसरून लिहावे.

हवामान: त्या प्रदेशातील हवामान विषयक माहिती लिहावे उदा. तापमान, पर्जन्यमान.

मानवी व्यवसाय व वस्ती: तेथील प्रमुख व्यवसाय तसेच वस्त्यांचा आकृतिबंध, घरांचे प्रकार उदा. केंद्रित वस्ती, रेषाकार वस्ती तसेच कौलारू घरे इत्यादी.

भौगोलीक किंवा ऐतिहासिक महत्त्व : भेट दिलेल्या ठिकाणचे महत्व लिहावे. धरण असेल तर त्या पाण्याचे जलसिंचन, औद्योगीक व पिण्याच्या पाण्यासाठी महत्व.

निष्कर्ष : शेवटी निष्कर्ष काढला जातो यात तेथील पर्यावरणीय समस्या त्यावर उपाय इत्यादी.

या प्रकारे क्षेत्रभेटीच्या विविध ठिकाणास अनुसरून वरील मुद्यांमध्ये बदल करून अहवाल लेखन करावे.
उदा. साखर कारखाना, धरण, नदीक्षेत्र, बाजारपेठ, ग्रामीण भाग, औद्योगिक वसाहत ई. ठिकाणी क्षेत्रभेट.

सदर आराखडा वहीत लिहावा व त्याला अनुसरून एखाद्या ठिकाणचे अहवाल लेखन वहीत लिहावे.

क्षेत्रभेटीसाठी प्रश्नावली

  1. भेट देणाऱ्या वस्तूची स्थपणा कुठल्या वर्षी झाली?
  2. वास्तुवर काय कार्य व्हायचे व त्याची सध्याची स्थिती काय आहे?
  3. वास्तूच्या परिसरात त्यावेळी किती लोक रहायचे आणि आता किती लोक राहतात?
  4. क्षेत्रभेटीची जागा कशासाठी लोकप्रिय आहे?क्षेत्रभेटीच्या जागेचा इतिहास काय आहे?
  5. तिथल्या जागेची सरकारने काय काळजी घेतली आहे?
  6. क्षेत्रभेटीच्या जागेचा नकाशा बरोबर आहे का त्यात काय बदल हवे आहेत?

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

क्षेत्रभेट म्हणजे काय ?

एखाद्या ठिकाणास प्रत्यक्ष भेट देऊन भौगोलिक, संकल्पनांची व घटकांची प्रत्यक्ष अनुभवाद्वारे माहिती मिळवणे म्हणजे क्षेत्रभेट होय.

क्षेत्रभेटीदरम्यान क्षणचित्रे घेण्यासाठी कोणत्या साधनांचा वापर करतात?

क्षेत्रभेटीदरम्यान क्षणचित्रे घेण्यासाठी कॅमेरा या साधनांचा वापर करतात.

निष्कर्ष

आजच्या या लेखामध्ये आपण क्षेत्रभेट म्हणजे काय (kshetrbhet Mhanje kay) याविषयी माहिती जाणून घेतली. Field visit information in marathi ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

1 thought on “क्षेत्रभेट म्हणजे काय | kshetrbhet Mhanje kay”

Leave a Comment