भारतातील राष्ट्रीय उद्याने माहिती मराठी | National Parks Of India Information in Marathi

National Parks Of India Information in Marathi : भारतदेश हा जगातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक वारसा लाभलेल्या देशांपैकी एक आहे. भारतातील राष्ट्रीय उद्याने, वन्यजीव अभयारण्य, पर्यावरणाचा प्रसार किंवा विकास करण्यासाठी संरचीत क्षेत्र आहे. साधारणता भारतातील 23.81% भूभाग हा जंगलांनी व्यापलेला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भारत देशाने आपली राष्ट्रीय उद्याने वाढवलेली आहेत. आजच्या या पोस्टमध्ये आपण भारतातील राष्ट्रीय उद्याने माहिती मराठी (National Parks Of India Information in Marathi) जाणून घेणार आहोत.

National Parks Of India Information in Marathi
भारतातील राष्ट्रीय उद्याने माहिती मराठी (National Parks Of India Information in Marathi)

भारतातील राष्ट्रीय उद्याने माहिती मराठी (National Parks Of India Information in Marathi)

  • हेमीस राष्ट्रीय उद्यान
  • मरुभूमी राष्ट्रीय उद्यान
  • गंगोत्री राष्ट्रीय उद्यान
  • नमदाफा राष्ट्रीय उद्यान 
  • खंगचेंदजोंग राष्ट्रीय उद्यान
  • गुरु घाशीदास राष्ट्रीय उद्यान
  • गिर वन राष्ट्रीय उद्यान
  • सुंदरबन राष्ट्रीय उद्यान 
  • जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान 
  • इंद्रावती राष्ट्रीय उद्यान 

इंद्रावती राष्ट्रीय उद्यान 

भारतातील सर्वात मोठ्या राष्ट्रीय उद्यानांमध्ये इंद्रावती हे उद्यान दहाव्या क्रमांकावर येते. इंद्रावती उद्यान हे भारताच्या छत्तीसगड राज्यातील बीजापूर या जिल्ह्यात आहे. या उद्यानामध्ये उष्णकटिबंधीय आणि कोरड्या पानझडी प्रकारातील झाडे आढळून येतात. इंद्रावती राष्ट्रीय उद्यान हे साधारणतः 1258.4 चौरस किलोमीटर इतक्या क्षेत्रावर विस्तारले आहे. इंद्रावती राष्ट्रीय उद्यानाची स्थापना ही इसवी सन 1975 साली करण्यात आली.

जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान 

क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात मोठ्या राष्ट्रीय उद्यानांमध्ये जिम कॉर्बेट या उद्यानाचा नववा क्रमांक लागतो. भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान म्हणून याची ओळख आहे. हे उद्यान भारताच्या उत्तराखंड राज्यातील नैनिताल जिल्ह्यामध्ये रामनगर या शहराजवळ आहे. 1936 मध्ये बंगाल वाघाच्या संरक्षणासाठी या उद्यानाची स्थापना करण्यात आली. जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान हे साधारणतः 1318.5 चौरस किलोमीटर इतक्या क्षेत्रावर पसरलेले आहे.

सुंदरबन राष्ट्रीय उद्यान 

सुंदरबन राष्ट्रीय उद्यान हे भारतातील सर्वात मोठ्या उद्यानांमध्ये आठव्या क्रमांकावर येते. हे उद्यान भारतातील प्रमुख उद्यानांपैकी एक आहे. भारतातील पश्चिम बंगाल राज्यामध्ये हे उद्यान आहे. जगातील सर्वात जास्त वाघांची संख्या ही याच उद्यानामध्ये आढळून येते. या ठिकाणचे नैसर्गिक वातावरण येथे असणारे वन्यप्राणी आणि पक्षांमुळे या उद्यानाची जागतिक वारसा स्थळ म्हणून निवड झालेली आहे. त्याचबरोबर सुंदरबन हे जगातील सर्वात मोठे खारफुटीचे जंगल आहे. सुंदरबन राष्ट्रीय उद्यानाचे एकूण क्षेत्रफळ 1330.12 चौरस किलोमीटर इतके आहे. भारतातील राष्ट्रीय उद्याने माहिती मराठी (National Parks Of India Information in Marathi)

गिर वन राष्ट्रीय उद्यान 

गिर वन राष्ट्रीय उद्यान हे भारतातील सर्वात मोठ्या उद्यानांमध्ये सातव्या क्रमांकावर येते. हे उद्यान भारताच्या गुजरात मधील तलाला या तालुक्यात आहे. साधारणता एक हजार चारशे चोवीस चौरस किलोमीटर क्षेत्रावर हे उद्यान पसरलेले आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सिंह, सांभर आणि बिबट्या हे प्राणी आढळून येतात. गिर वन राष्ट्रीय उद्यानाची स्थापना ही इसवी सन 1965 साली करण्यात आली आहे. 

गुरु घाशीदास राष्ट्रीय उद्यान 

भारतातील सर्वात गुरु घाशीदास राष्ट्रीय उद्यान  गुरु घाशीदास राष्ट्रीय उद्यान सहाव्या क्रमांकावर येते. गुरु घाशीदास हे उद्यान भारताच्या छत्तीसगड राज्यातील कोरिया या जिल्ह्यामध्ये आहे. हे राष्ट्रीय उद्यान वाघांसाठी प्रसिद्ध आहे. गुरु घाशीदास राष्ट्रीय उद्यानाचे एकूण क्षेत्रफळ 440.71 चौरस किलोमीटर इतके आहे. 

खंगचेंदजोंग राष्ट्रीय उद्यान 

खंगचेंदजोंग राष्ट्रीय उद्यान हे भारतातील सर्वात मोठ्या उद्यानांमध्ये पाचव्या क्रमांकावर येते. उत्तर भारतातील सिक्कीम राज्यांमध्ये हिमालय पर्वतांच्या मध्यभागी हे उद्यान आहे. या राष्ट्रीय उद्यानाला युनेस्को च्या जागतिक वारसा स्थळांची यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. खंगचेंदजोंग राष्ट्रीय उद्यानचे एकूण क्षेत्रफळ 784 चौरस किलोमीटर आहे. इसवी सन 1977 मध्ये या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना करण्यात आली. 

नमदाफा राष्ट्रीय उद्यान 

भारतातील सर्वात मोठ्या राष्ट्रीय उद्यानांमध्ये नमदाफा राष्ट्रीय उद्यान हे चौथ्या क्रमांकावर येते. नमदाफा राष्ट्रीय उद्यान हे भारताच्या अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये आहे. हे नॅशनल पार्क भारतातील सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. भारतातील अनेक वन्यजीव आणि निसर्गप्रेमी पर्यटक या उद्यानाला भेट देण्यासाठी येत असतात. नमदाफा हे साधारणतः 985.23 चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरलेले आहे. इसवी सन 1974 मध्ये या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना करण्यात आली. वेगवेगळ्या वनस्पतींसाठी आणि प्राण्यांसाठी हे उद्यान ओळखले जाते.

गंगोत्री राष्ट्रीय उद्यान 

गंगोत्री राष्ट्रीय उद्यान हे भारतातील सर्वात मोठ्या उद्यानांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर येते. भारताच्या उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी या जिल्ह्यांमध्ये हे उद्यान आहे. गंगोत्री राष्ट्रीय उद्यान हे भारतातील प्रमुख उद्यानांपैकी एक आहे. हे उद्यान साधारणतः 2390 चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरलेले आहे. इसवी सन 1989 मध्ये गंगोत्री या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना करण्यात आली. दरवर्षी हजारो पर्यटक या उद्यानाला भेट देण्यासाठी येत असतात.

मरुभूमी राष्ट्रीय उद्यान 

क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात मोठ्या उद्यानांमध्ये मरुभूमी राष्ट्रीय उद्यान हे दुसऱ्या क्रमांकावर येते. हे उद्यान भारताच्या राजस्थानमधील जैसलमेर या शहराजवळ आहे. या उद्यानाला डेजर्ट नॅशनल पार्क म्हणून ही ओळखले जाते. मरुभूमी राष्ट्रीय उद्यान हे साधारणतः 3162 चौरस किलोमीटर इतक्या क्षेत्रावर विस्तारलेले आहे. हे प्रसिद्ध उद्यान ग्रेट इंडियन बस्टर साठी प्रसिद्ध आहे. इसवी सन 1981 मध्ये या उद्यानाची स्थापना करण्यात आली.

हेमीस राष्ट्रीय उद्यान 

हेमीस भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे. हेमीस राष्ट्रीय उद्यान हे भारताच्या लडाख केंद्रशासित प्रदेशात आहे. हे उद्यान हिम बिबट्यांबरोबर अनेक संकटात सापडलेल्या सस्तन प्राण्यांचे घर आहे. त्याचबरोबर हेमीस हे भारतातील सर्वात उंचीवरील राष्ट्रीय उद्यान आहे. हेमीस राष्ट्रीय उद्यान हे साधारणतः चार हजार चारशे चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरलेले आहे. इसवी सन 1981 मध्ये हेमीस च्या उद्यानाची स्थापना करण्यात आली.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते

हेमिस राष्ट्रीय उद्यान भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे.

भारतात किती अभयारण्य आहे?

भारतामधे 103 राष्ट्रीय उद्याने आणि 565 अभयारण्ये आहेत.

अभयारण्य चा उपयोग काय?

अभयारण्यात प्राण्यांची शिकार करण्यास पूर्णपणे बंदी घातली जाते, त्यांना अभय दिले जाते, त्यांचे संरक्षण व संवर्धन करण्यात येते.

निष्कर्ष

आजच्या या पोस्टमध्ये आपण भारतातील राष्ट्रीय उद्याने माहिती मराठी (National Parks Of India Information in Marathi) जाणून घेतली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

व्हायरल गोष्टी

Leave a Comment