Padmshri award information in marathi : पद्मश्री हा भारत सरकार द्वारे साधारणपणे फक्त भारतीय नागरिकांना दिला जाणारा एक पुरस्कार आहे. जो जीवनाच्या विविध क्षेत्रांमधील जसे की कला, शिक्षण, उद्योग, साहित्य, विज्ञान, खेळ, वैद्यकीय, समाजसेवा आणि सामाजिक कार्य इत्यादींसाठी विशेष योगदान करणाऱ्या व्यक्तीला दिला जातो. आजच्या या लेखामध्ये आपण पद्मश्री पुरस्कार माहिती मराठी (Padmshri award information in marathi) जाणून घेणार आहोत.
Contents
- 1 पद्मश्री पुरस्कार माहिती मराठी (Padmshri award information in marathi)
- 2 पद्मश्री पुरस्कार कोणाला दिला जातो?
- 3 पद्मश्री पुरस्काराचे स्वरूप काय आहे?
- 4 पद्मश्री पुरस्कारासाठी निवड कोण करते?
- 5 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
- 5.1 पद्मश्री पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली होती?
- 5.2 पद्मश्री पुरस्कार कोणाच्या हस्ते दिला जातो?
- 5.3 पद्मश्री पुरस्काराची घोषणा केव्हा केली जाते?
- 5.4 पद्मश्री पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण?
- 5.5 पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण व भारतरत्न हे चारही नागरी सन्मान मिळवणारे पहिले भारतीय कोण?
- 5.6 पद्मश्री पुरस्कार रक्कम
- 5.7 पद्मश्री पुरस्कार सर्वप्रथम कोणत्या खेळाडूला देण्यात आला?
- 5.8 सुधा मूर्ती यांना कोणत्या वर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?
- 5.9 भारत सरकारने नैना लाल किद्वाई यांना पद्मश्री पुरस्कार केव्हा दिला?
- 5.10 सन 2007 मध्ये भारत सरकारने नैना लाल किदवई यांना कोणता पुरस्कार दिला?
- 6 निष्कर्ष
पद्मश्री पुरस्कार माहिती मराठी (Padmshri award information in marathi)
पुरस्कार | पद्मश्री |
प्रकार | नागरी |
स्थापना | 1954 |
सन्मानकर्ते | भारत सरकार |
संकेतस्थळ | www.padmaawards.gov.in |
पद्मश्री हा पुरस्कार भारताच्या नागरि पुरस्कारामधील पदानुक्रमे चौथ्या क्रमांकाचा पुरस्कार आहे. त्याच्याआधी भारतरत्न पद्मविभूषण आणि पद्मभूषण यांचे स्थान आहे. पद्म आणि श्री हे शब्द देवनागरी भाषेतून घेतले गेले आहेत. आता तुम्ही म्हणाल की पद्मश्री पुरस्कार काय आहे?
पद्मश्री हा पुरस्कार देशाच्या सर्वोच्च नागरिकाचा एक सन्मान आहे. एखाद्या क्षेत्रामध्ये अलौकिक कार्य करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. सन 1954 मध्ये पद्मश्री आणि भारतरत्न पुरस्कार याला एकाचवेळी स्थापन केले गेले होते. ज्याच्या नंतर दरवर्षी 26 जानेवारी च्या प्रसंगी पद्मश्री पुरस्काराची घोषणा केली जाते.
पद्मश्री पुरस्काराला तीन भागांमध्ये विभागले गेले आहे : पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री. पद्मविभूषण असाधारण विशिष्ट सेवेसाठी, पद्मभूषण उच्च विशिष्ट सेवेसाठी आणि पद्मश्री विशिष्ट सेवेसाठी दिला जातो.
दरवर्षी दिल्या जाणाऱ्या नागरी “पद्म” पुरस्कारांसाठी नामांकनाची शिफारस करण्यासाठी भारताने आता सामान्य नागरिकांसाठी ऑनलाइन नामांकन मंच तयार केला आहे. यामध्ये आपण सुद्धा नावे सुचवू शकतो. 2021 पर्यंत 3225 लोकांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे.
पद्मश्री पुरस्कार कोणाला दिला जातो?
पद्मश्री हा पुरस्कार व्यक्तिगत काम करणाऱ्या लोकांना दिला जातो. म्हणजेच पद्मश्री हा पुरस्कार सरकारी कर्मचाऱ्यांना दिला जात नाही. पद्मश्री हा पुरस्कार कला, शिक्षण, उद्योग, साहित्य, विज्ञान, खेळ, वैद्यकीय, समाजसेवा आणि सामाजिक कार्य इत्यादी क्षेत्रांमधील विशेष योगदान करणाऱ्या व्यक्तीला दिला जातो.
पद्मश्री हा पुरस्कार एखाद्या व्यक्तीच्या मरणोत्तर दिला जात नाही. परंतु काही विशिष्ट केसेस मध्ये समिती सूट देते. पद्मश्री पुरस्काराचे नामांकन पद्मश्री पुरस्काराच्या समितीद्वारे केले केले जाते. आपण स्वतः सुद्धा पद्मश्री पुरस्कारासाठी नाव देऊ शकतो. परंतु पद्मश्री हा पुरस्कार फक्त भारतीय नागरिकांना दिला जातो. कोणत्याही विदेशी किंवा एनआरआय ला हा पुरस्कार दिला जात नाही.
पद्मश्री पुरस्काराचे स्वरूप काय आहे?
पद्मश्री पुरस्कारांमध्ये राष्ट्रपतिद्वारा स्वाक्षरी केलेले एक प्रमाणपत्र आणि एक पदक दिले जाते. या बरोबरच आपल्याला एक चिन्ह सुद्धा दिले जाते जे आपण राज्याच्या कोणत्याही कार्यक्रमांमध्ये घालू शकतो. पद्मश्री हा पुरस्कार केवळ त्याच व्यक्तीला दिला जातो जो या देशाचा सर्वात चांगला नागरिक म्हणून आपले कर्तव्य पाळत असेल.
पद्मश्री पुरस्कारासाठी निवड कोण करते?
पद्मश्री पुरस्काराची यादी पद्मश्री पुरस्कार समिती बनवते. ज्याचे अध्यक्ष कॅबिनेट सचिव आणि राष्ट्रपती चे सचिव असतात. या समितीसमोर सर्व नावे ठेवली जातात. आणि त्यानंतर या सर्व नावा विषयी आणि त्यांच्या कार्याविषयी चर्चा केली जाते. त्यांची गुणवत्ता पाहिल्यानंतर समिती पद्मश्री पुरस्कार आज या सूचीमध्ये त्या लोकांची नावे लिहिते.
जर तुमच्या कार्याची सुद्धा गुणवत्ता असाधारण असेल तर तुम्ही सुद्धा पद्मश्री पुरस्काराने सन्मानित होऊ शकता.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
पद्मश्री पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली होती?
पद्मश्री पुरस्कार कोणाच्या हस्ते दिला जातो?
पद्मश्री पुरस्काराची घोषणा केव्हा केली जाते?
पद्मश्री पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण?
पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण व भारतरत्न हे चारही नागरी सन्मान मिळवणारे पहिले भारतीय कोण?
पद्मश्री पुरस्कार रक्कम
पद्मश्री पुरस्कार सर्वप्रथम कोणत्या खेळाडूला देण्यात आला?
सुधा मूर्ती यांना कोणत्या वर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?
भारत सरकारने नैना लाल किद्वाई यांना पद्मश्री पुरस्कार केव्हा दिला?
सन 2007 मध्ये भारत सरकारने नैना लाल किदवई यांना कोणता पुरस्कार दिला?
निष्कर्ष
आशा आहे की पद्मश्री पुरस्कार माहिती मराठी (Padmshri award information in marathi) तुम्हाला नक्कीच आवडली असेल. जर तुम्हाला पद्मश्री पुरस्कार माहिती मराठी (Padmshri Puraskar marathi) ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.