पळस झाडाची माहिती | Palash tree information in marathi

Palash tree information in marathi : मित्रांनो रामायणात देखील पळसाच्या वनाचा व त्याच्या फुलांचा उल्लेख केलेला आढळून येतो. शेकडो अशी कवी आहेत ज्यांनी त्यांच्या रचनांमध्ये पळसाला स्थान दिले आहे. पळस या झाडाला नावे बहुतेक त्याच्या फुलांवरून पडली गेली आहेत. पळस या वृक्षाला इंग्रजीमध्ये Flame of Forest तेरे संस्कृत भाषेमध्ये किंशुक, रक्तपुष्पक असेही म्हणतात. आजच्या या पोस्टमध्ये आपण पळस झाडाची माहिती (Palash tree information in marathi) जाणून घेणार आहोत. 

Palash tree information in marathi
पळस झाडाची माहिती (Palash tree information in marathi)

पळस झाडाची माहिती (Palash tree information in marathi)

हिंदी भाषेमध्ये पळस या वृक्षाला पलाश असेसुद्धा म्हटले जाते. फुल झाडांपैकी सुमारे 12 ते 15 मीटर उंच वाढणाऱ्या या मध्यम आकारमानाच्या पानझडी वृक्ष याचा प्रसार भारतात 1240 मीटर उंचीपर्यंत थोडेसे प्रदेश सोडले तर सर्वत्र आढळतो. महाराष्ट्रातील पानझडी वनांमध्ये पळस हा वृक्ष साधारणपणे आढळून येतो. याशिवाय ब्रह्मदेश, श्रीलंका, पाकिस्तान येथे हा वृक्ष आढळून येतो. 

उघड्या गवताळ रानात याचे शुद्ध समूह आढळतात. पळस या वृक्षाच्या वंशामध्ये 30 जाती आढळतात. यापैकी आपल्या भारत देशामध्ये फक्त तीन जाती आढळतात. ती म्हणजे केशरी किंवा लाल पळस, पिवळा पळस आणि पांढरा पळस. यापैकी केशरी व पिवळा पळस मुबलक प्रमाणात आढळतो. तर पांढरा पळस लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. 

पांढरा पळस हा तंत्र विद्या मध्ये वापरला जातो असा समज आहे. आणि कदाचित याच कारणामुळे किंवा अतिरिक्त तोडीमुळे आपल्याला तो जंगलामध्ये पाहावयास मिळतो. पांढरा पळस हा एक चमत्कारी वृक्ष मानला जातो. हे वृक्ष दुर्मिळ प्रजातीचे आहेत. तज्ञांच्या मते पांढरा पळस या वृक्षाची मध्यप्रदेश मध्ये फक्त दोन झाडे आहेत. या झाडाच्या विविध अंगांचा उपयोग तंत्र मंत्र मध्ये केला जातो असा एक अंधविश्वास रूढ झाला आहे. आणि यामुळे हा वृक्ष लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. 

पिवळा पळस हा फार दुर्मिळ आहे. पांढरा आणि पिवळा पळस हा फार क्वचित प्रमाणात आढळतो. आणि यामुळे उत्सुकतेपोटी या झाडांची मुळापासून तोड होते. संपूर्ण जगामध्ये फक्त भारतातच आपणास हा पळस आढळून येतो. हिमालय किंवा राजस्थानच्या वाळवंटामध्ये हा पळस आढळत नाही. पिवळ्या पळसाबद्दल अंधश्रद्धा देखील आहे. गुप्तधन शोधण्यासाठी या फुलाचा उपयोग केला जातो असा समज आहे. आणि यामुळेच जादूटोणा करणाऱ्यांना नेहमीच या झाडाची ओढ असते. ही जरी अंधश्रद्धा असली तरीही या झाडाचे आकर्षण सगळ्यांनाच असते. अतिशय दुर्मिळ असणाऱ्या या पिवळ्या पळसाचे संवर्धन व संरक्षण होणे गरजेचे आहे. 

आता आपण पळसाच्या झाडाविषयी सामान्य माहिती (Palash tree information in marathi) जाणून घेतली.

पळसाचे झाड कसे असते?

पळसाच्या खोडाचा घेर हा सुमारे दीड ते दोन मीटर इतका असतो. त्यावर 30 साल ही राखाडी निळसर व भुरकट किंवा फिकट तपकिरी रंगाची असते. तिच्या खोडावरील लहान-मोठ्या खाचामधून किंवा भेगांमधून लाल रस पाझरतो. आणि सुकल्यावर त्याचा विशिष्ट गोंद बनतो. 

पळसाची पाने संयुक्त, एक आड एक, उपपर्नयुक्त असतात. यावरूनच त्रिपत्रक हे संस्कृत नाव आणि मराठी मध्ये पळसाला पाने तीनच ही म्हण सुरू झाली आहे. पळसाच्या झाडाची पाने लांब देठाची असून, दले मोठी चिवट, कठीण वरून काहीशी चकचकीत आणि खालून पांढरी असतात. थंडीच्या अखेरीस पळसाला फुले येण्यास सुरुवात होते. परंतु सह्याद्री आणि कोकणामध्ये हे झाड अनेक वेळा नोव्हेंबर महिन्यामध्ये फुलायला सुरुवात करते. 

लाल रंगाच्या विविध छटा मधली ही पळसाची फुले काही प्रमाणात वाकडी वळलेली असतात. पळसाच्या झाडाच्या फुलाच्या पाकळ्या या 6 ते 7 सेंटीमीटर असतात. फुलाच्या तळाशी पाच मकर ग्रंथी म्हणजेच नेकट्रीज असतात. यामध्ये तयार होणारा मधुरस प्यायला पक्षी, खारी, भुंगे गर्दी करतात. माकड पळसाच्या झाडाची कोवळी पाने आणि शेंगा पण खातो. 

पळसाच्या पानांचा उपयोग 

  • मध्यप्रदेशातील एका वनवासी समाजामध्ये पाणीया नावाची एक विशेष भाकरी केली जाते. ही भाकरी बनवण्यासाठी पोळपाटावर किंवा समान पृष्ठभागावर पळसाची पाने अंथरली जातात. आणि मग त्यावर लाटण्याने पोळी लाटली जाते. मग लाटलेल्या पोळीला दोन्ही बाजूंनी पळसाची पाने व्यवस्थित लावली जातात. मग याला गायीच्या शेना पासून बनवलेल्या गोवरऱ्यावर भाजले जाते. पळसाच्या पानांचा धुर आणि गोवर्यां यांच्या धुरा वरील या भाकरी म्हणजेच पाणीया चांगल्या चवदार होतात. 
  • पळसाच्या पानांचा पत्रावळी व द्रोण जेवणाकरिता वापरण्याची जुनी पद्धत आहे. पळसाच्या पानांच्या पत्रावळी वर गरमागरम अन्न वाढली की त्या अन्नाबरोबर पळसाचेही औषधी गुणधर्म पोटात जावेत असा उद्देश आहे. 
  • पळसा चा पाला हा जनावरांना आणि हत्तींना खायला घालतात. 
  • बंगालमध्ये पळसाची पाने बिडी बांधण्यासाठी वापरतात. 
  • पडसे व खोकला यावर गुणकारी औषध म्हणून पळसाचा सौम्य काढा घेतला जातो. 
  • किडनीच्या विकारावर पळस हा अतिशय उपयुक्त आहे. 
  • किडनीच्या विकारांवर पळसाची फुले शिजवून ते पाणी उपयुक्त आहे. 

निष्कर्ष 

आजच्या या पोस्टमध्ये आपण पळस झाडाची माहिती (Palash tree information in marathi) जाणून घेतली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. 

Leave a Comment