सातू म्हणजे काय | Satu Mhanje kay

Satu Mhanje kay : तृणधान्यांपैकी सर्वाधिक प्रसारित झालेले व जगातील जवळजवळ सर्व देशांत पिकविले जाणारे सातूचे पीक फार पूर्वीपासून ज्ञात आहे.सुमारे पाच हजार वर्षांपेक्षा ही जुने सातूचे अवशेष मेसोपोटेमियामध्ये सापडले आहेत. तेच बहुधा सातूचे मूलस्थान असावे. तेथून त्याचा प्रसार ॲबिसिनिया, यूरोप, चीन आणि इतर देशांत झाला असावा. आजच्या या लेखात आपण सातू म्हणजे काय (Satu Mhanje kay) याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

Satu Mhanje kay
सातू म्हणजे काय (Satu Mhanje kay)

सातू म्हणजे काय (Satu Mhanje kay)

यज्ञ आहुतीसाठी पण ऋषीमुनी सातू चा त्या काळात उपयोग करायचे म्हणजेच प्राचीन काळापासून याचा उपयोग आहारात केला जातो. सातू गव्हासारखा दिसायला असणारा पण थोडा वेगळा आहे. सातू हा भारतात उत्तरप्रदेश, बिहार या भागात जास्त तसेच गुजरात, राजस्थान, ओडिशा येथे पण पिक घेतले जाते.

सातू वनस्पती सरळ वाढणारी आणि काटक खोडाची असते.उंची साधारणपणे 0.6 – 1.2 मी., गव्हासारखी दिसणारी, पानांची संख्या कमी, पाने एकाच्यावर एक सरळ रेषेत असणारी आणि ध्वजपर्ण ओंबीच्या जवळ असते. ओंबी 5 ते 6·25 सेंमी. लांब आणि घट्ट असते. ओंबीमध्ये दाण्यांच्या सहा रांगा किंवा दोन रांगा असतात. तसेच ओंब्या प्रशुकयुक्त किंवा प्रशुकविरहित असतात.

पूर्वी सातू पिकाची लागवड दाण्यासाठी करीत असत व त्याच्या पिठापासून खाद्यपदार्थ बनवीत असत. आजही उत्तर भारतातील राजस्थान व उत्तरप्रदेश या राज्यांत बहुसंख्य गरीब लोक सातूचा आहारात उपयोग करतात. कधी कधी गव्हामध्ये सातूचे धान्य मिसळून एकत्र दळून पिठात भेसळ करतात.

सातू हे धान्य एक दिव्य औषध आहे. यव (संस्कृत), जौ (हिंदी), जब (बंगाली), नस (भूतान) आणि बाली (इंग्रजी) अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या जवाचे सत्त्व एकाच वेळी पाचक आणि पोषक आहे.

सातू चे फायदे (Advantages of sati in marathi)

सातू हा थंड, जठराग्नी प्रदीप्त करणारा, हलका, कफ व पित्तनाशक, रुक्ष, बलवर्धक, वायुवर्धक, शरीराचा रंग टिकवणारा आहे. तसेच सातू हा कफ, घशाचे रोग, त्वचेचे रोग, पितृ, मेद, सर्दी, दमा, रक्तविकार, इत्यादी रोगांत गुणकारी आहे.

लघवी साफ होण्यासाठी व विद्यार्थांसाठी सातू अत्यंत फायदेशीर आहे.

ज्यांना अति स्थूलता, मेद, जास्त चरबी चा त्रास असेल त्यांनी सातूच्या चपाती/भाकरी सोबत ताक / मेथीची भाजी हा आहार चालू करावा त्यांना नक्की फायदा होईल.

मधुमेह असणाऱ्या लोकांना सातूच्या पिठाची चपाती किवा भाकरी अधिक चांगली असते. यामुळे शरीरातील शुगरचे प्रमाण वाढत नाही.

सातूची चपाती रुचकर, मधुर, हलकी, बलवर्धक, वीर्यवर्धक, व वायुकारक असते.

सातू चे औषधी गुणधर्म

सातू व मुगाचे पाणी एकत्र करून प्यायलाने आतड्यातील दाह शांत होतो व अतिसार हि कमी करता येतो.

भाजलेल्या सातूचे पीठ थंड पाण्यात कालवून त्यात तूप घालून प्यायलाने तृष्णा, दाह, आणि रक्तपित्त हे विकार दूर होतात.

सातू जाळून तिळाच्या तेलात खलून लेप केल्याने भाजलेल्या जखमा बऱ्या होतात.

भाजलेल्या सातूचे पीठ आणि जेष्ठमधाचे चूर्ण धुतलेल्या तुपात मिसळून त्याचा लेप लावल्याने त्वचारोग बरा होतो.

सातू, तीळ, आणि साखर समप्रमाणात घेऊन त्याचे चूर्ण बनवावे व हे चूर्ण मधातून घेतल्याने गर्भपाताचे भय नाहीसे होते.

सातूचे पीठ व साखर समप्रमाणात घेतल्याने वारंवार होणाऱ्या गर्भपाताला प्रतिबंध बसतो.

निष्कर्ष

आजच्या या लेखात आपण सातू म्हणजे काय (Satu Mhanje kay) याविषयी माहिती जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

स्त्रोत : मराठी विश्वकोश

Leave a Comment