Vishnupuri dam information in marathi : विष्णुपुरी हे धरण महाराष्ट्रातील प्रमुख धरणांपैकी एक आहे. हे धरण खास करून सिंचनासाठी उभा करण्यात आलेले आहे. या धरणाच्या जवळपासचा परिसर हा निसर्ग संपन्न वातावरणाने बहरून गेलेला आहे. जवळपासच्या भागातील बरेच पर्यटक या धरणाला भेट देण्यासाठी येत असतात. आजच्या या पोस्टमध्ये आपण विष्णुपुरी धरण माहिती मराठी (Vishnupuri dam information in marathi) जाणून घेणार आहोत.
विष्णुपुरी धरण माहिती मराठी (Vishnupuri dam information in marathi)
विष्णुपुरी हे धरण महाराष्ट्रातील मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यामध्ये असर्जन या गावाजवळ आहे. गोदावरी या नदीवर हा विष्णुपुरी धरण प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. गोदावरी नदीवर असलेल्या धरणाला आशिया खंडातील सर्वात मोठा उपसा जलसिंचन प्रकल्प म्हणून ओळखले जाते. या धरणाला शंकर सागर प्रकल्प म्हणून ही ओळखले जाते. त्याचबरोबर या धरणाला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीचे उदाहरण मानले जाते. नाथ सागर शिवाय त्यांनी नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी धरणाचे देखील स्वप्न पाहिले होते.
यांच्या आठवणी मध्येच या धरणाला शंकर सागर धरण म्हणून ओळखले जाते. विष्णुपुरी धरणामुळे नांदेड जिल्ह्यातील बराचसा परिसर हा निसर्ग संपन्न वातावरणाने भरून गेलेला आहे. विष्णुपुरी हे धरण 1988 साली बांधून पूर्ण झाले. याच धरणातून संपूर्ण नांदेड शहराला पाणीपुरवठा केला जातो. विष्णुपुरी हे धरण सर्वसाधारणपणे सिंचन उपाय प्रदान करण्यासाठी उभारण्यात आले होते. विष्णुपुरी धरणाच्या तांत्रिक माहितीबद्दल जाणून घ्यायचे झाल्यास विष्णुपुरी धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ही 80.79 दशलक्ष घनफूट आहे.
या धरणातील 10.26 दशलक्ष घनमीटर जलसाठा हा औद्योगिक विकास साठी वापरला जातो. विष्णुपुरी धरणाला एकूण 18 दरवाजे आहेत. या धरणामुळे 19,514 हेक्टर इतके क्षेत्र सिंचनाखाली आलेले आहे. पर्यटनाच्या दृष्टीने विचार केला तर विष्णुपुरी धरणाचा परिसर हा पर्यटकांना आकर्षित करणार आहे. विष्णुपुरी हे धरण नांदेड शहरापासून मात्र दहा किलोमीटर तर परभणी पासून 66 किलोमीटर इतके अंतरावर आहे.
विष्णुपुरी धरण हे नांदेड जिल्ह्यातील जलस्रोत व्यवस्थापनाचे एक महत्त्वाचे अंग आहे. या धरणामुळे स्थानिक पाणी टंचाईसाठी उपाययोजना होतात आणि कृषी क्षेत्रातील उत्पादनात सुधारणा होते.