दहा पक्षांविषयी माहिती | 10 birds information in marathi

10 birds information in marathi : मित्रांनो जगभरामध्ये अनेक प्रकारचे पक्षी आढळतात. ज्यांचे विषयी आपल्याला खूपच थोडी माहिती माहीत असते. आणि अनेक लोकांना या पक्षांविषयी माहिती जाणून घेण्याची इच्छा असते. आजच्या या पोस्टमध्ये आपण दहा पक्षांविषयी माहिती (10 birds information in marathi) जाणून घेणार आहोत. 

10 birds information in marathi
दहा पक्षांविषयी माहिती (10 birds information in marathi)

दहा पक्षांविषयी माहिती (10 birds information in marathi)

1) कावळा या पक्षाविषयी माहिती (Crow information in marathi)

जगभरामध्ये कावळ्याच्या जवळजवळ 40 प्रजाती आढळतात. प्रजाती नुसार कावळ्याचा आकार वेगवेगळा असतो. अमेरिकन कावळा (American Crow) 45 सेंटिमीटर आणि फिश कावळा (Fish Crow) 48 सेंटिमीटर असतो. काळा कावळा (Raven) आकारा मध्ये खूप मोठा असतो तो जवळजवळ 69 सेंटीमीटर असतो. 

भारतामध्ये कावळ्याच्या सहा प्रजाती आढळतात. परंतु यामधील छोटा घरगुती कावळा (House crow), जंगली कावळा (Jungle Crow) आणि काळा कावळा (Raven) सर्वात जास्त आढळतो. कावळ्याचे वजन तीनशे ते सोळाशे ग्रॅम असते. 

कावळ्याच्या राहण्याच्या आधारावर हे ठरते कि तो किती वर्ष जगेल. जंगलामध्ये राहणारा कावळा पंधरा ते वीस वर्षे जगतो. आणि देखरेखीखाली राहणारा कावळा तीस वर्षापर्यंत जिवंत राहू शकतो. जंगलामध्ये राहणारे जुने कावळे सतरा वर्षे जगत होते. आणि मनुष्याच्या देखरेखीखाली जगणारा एक न्यूयॉर्कमधील कावळा 59 वर्षे जिवंत होता. जगातील सर्वात छोटी कावळ्याची प्रजाती मेक्सिकोमधील Dwarf Jay आहे. ज्याची लांबी वीस ते तेवीस सेंटीमीटर आणि वजन 41 ग्रॅम असते. जगातील कावळ्याची सर्वात मोठी प्रजाती Thick Billed Raven आहे, जी इथिओपिया मध्ये आढळते. त्याची लांबी 65 सेंटीमीटर आणि वजन 1.5 किलो असते. 

कावळ्यांच्या समूहाला Murder म्हणतात. कावळा हा सर्वाहारी पक्षी आहे. तो आपल्या आहारामध्ये एक हजारपेक्षा अधिक खाद्य पदार्थ खाऊ शकतो. ज्यामध्ये लहान-लहान किडे, मांस पासून ते फुला पर्यंत आणि बिया पासून ते मृत आणि सडलेले जीव या पर्यंत. जेव्हा कावळ्यांना मनुष्य किंवा इतर कोणत्याही जीवापासून धोका जाणवतो तेव्हा ते ओरडुन इतर कावळ्यांना एकत्र करतात. 

2) हंस पक्षाविषयी माहिती (Swan information in marathi)

हंस पक्षी हा एक जलीय परिवारातील (Waterfowl family) सर्वात मोठा सदस्य आहेत. जगभरामध्ये हंस पक्षाच्या सहा विविध प्रजाती आढळतात. ज्यामध्ये 1)ब्लैक-नेक्ड स्वान (Black-necked Swan) 2) ब्लैक स्वान (Black Swan) 3) म्यूट स्वान (Mute Swan) 4) ट्रम्पेटर स्वान (Trumpeter Swan) 5) टुंड्रा स्वान (Tundra Swan), 6) हूपर हंस (Whooper Swan)

हंस पक्षाची कोस्कोरोबा हंस (Coscoroba Swan) नावाची सुद्धा एक प्रजाती आहे. परंतु आता या प्रजातीला हंस मानले जात नाही. हंस हा पक्षी बदकाच्या रूपाशी संबंधित आहे. 

हंस हा पक्षी उत्तर आणि दक्षिण गोलार्धात च्या भूमध्य रेषेच्या दोन्ही किनाऱ्यावर आढळतो. उत्तरी हंस पक्षी (Northern Swan) पांढऱ्या रंगाचे असतात आणि त्यांची चोच नारंगी रंगाची असते. दक्षिण हंस पक्षाचा रंग पांढरा आणि काळ्या रंगाचा मिश्रण असतो. त्याची चोच लाल, नारंगी किंवा काळ्या रंगाची असते. 

हंस हा पक्षी पूर येणाऱ्या गवताच्या मैदानामध्ये, तलावामध्ये नदी आणि नाल्यांमध्ये आढळतो. हंस हा पक्षी साधारणपणे समशीतोष्ण वातावरणामध्ये आढळतो. उष्णकटिबंधीय वातावरणामध्ये हा पक्षी आढळत नाही.  हंस हा पक्षी आफ्रिका आणि अंटार्टिका खंडावर आढळत नाही. 

3) मोर पक्षाविषयी माहिती (Peacock information in marathi)

केवळ नर मोरालाच पिकॉक म्हणतात. मादी मोराला Peahen म्हणतात. मोराला सामूहिक रूपामध्ये Peaowl म्हणतात. आणि मोराच्या पिल्लांना Peachicks म्हणतात. मोराच्या साधारणपणे तीन प्रमुख प्रजाती आहेत. ज्यामध्ये आशियातील दोन आणि आफ्रिकेमधील एक समाविष्ट आहे. निळा भारतीय मोर (Blue Indian Peacock) आणि हिरवा मोर (Green Peacock) या आशियन प्रजाती आहेत. तर कांगो मोर (African Congo Peacock) ही आफ्रिकन प्रजाती आहे. 

मोर भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. 26 जानेवारी 1963 रोजी निळ्या मोर पक्ष्याला भारत सरकार द्वारे भारताचा राष्ट्रीय पक्षी (National Bird Of India)  म्हणून घोषित केले गेले. मोर मुख्यता जमिनीवर राहणारा पक्षी आहे. मूळ हवेमध्ये उडू शकतो परंतु फक्त काही वेळा पर्यंतच. शिकाऱ्यायांपासून वाचण्याचा प्रयत्न करण्यासाठी मोर रात्री उंच झाडावर झोपतो. 

मोर शेतामध्ये, जंगलामध्ये आणि उष्ण ठिकाणी राहतो. मोरांना अशा ठिकाणी राहायला आवडतं जिथे झाडांची उंची कमी असेल. मोर हा जगातील सर्वात मोठा उडणाऱ्या पक्ष्यापैकी सुद्धा एक आहे. त्याच्या पंखाचा पिसारा 1.5 मीटर च्या आसपास असतो.  

मोर पक्षाचा हवेमध्ये उडण्याचा वेग दहा मैल प्रतितास असतो. मोर हा एक सर्वाहारी पक्षी आहे. जो मुख्य रूपामध्ये अन्नधान्य, गवत, फळे, बिया, फुलांच्या पाकळ्या, मुंग्या, कीटक, उंदीर, पाल, साप इत्यादी खातो. 

4) गरुड पक्षाविषयी माहिती (Eagle information in marathi)

जगभरामध्ये गरुड पक्षाच्या 60 पेक्षा अधिक प्रजाती आढळतात. गरुड पक्षाच्या अधिकांश प्रजाती युरेशिया आणि आफ्रिकामध्ये आढळतात. या क्षेत्राच्या बाहेर फक्त 14 प्रजाती आहेत: उत्तर अमेरिकेमध्ये 2, दक्षिण अमेरिकेमध्ये 9 आणि ऑस्ट्रेलिया मध्ये 3. 

गरुड पक्षांच्या प्रजाती नुसार त्यांचे आयुष्यमान 14 ते 35 वर्ष यामध्ये असते. वातावरणानुसार गरुड पक्षाची लांबी वजन आणि आकार यामध्ये विविधता आढळून येते. जंगलामध्ये राहणाऱ्या गरूड पक्षाचे पंख कमी विस्ताराचे असतात. आणि मैदानी आणि मोकळ्या क्षेत्रांमध्ये राहणाऱ्या गरुडाचे पंख जास्त विस्तारित असतात. 

व्यस्क या नर गरुडाचे वजन जवळजवळ 4.1 किलोग्रॅम असते. गरुड पक्षाची सर्वात लहान प्रजाती दक्षिण निकोबार मधील  serpent eagle (Spilornis klossi) आहे. जीचे वजन 450 ग्रॅम आणि लांबी 40 सेंटीमीटर आहे. 

लांबी आणि पंखाच्या विस्ताराच्या आधारावर Philippine eagle (Pithecophaga jefferyi) जगातील गरुडा ची सर्वात मोठी प्रजाती मानली जाते. Steller’s sea eagle आणि harpy eagle वजन आणि आकाराच्या मानाने सर्वात मोठी प्रजाती मानली जाते. जगातील सर्वात जास्त वजन असलेला गरुड स्टेलर हा समुद्री गरुड (Steller’s sea eagle) आहे. ज्याचे वजन नऊ किलोपर्यंत असते. 

5) कबुतरा विषयी माहिती (Pigeon information in marathi)

कबुतर हा पक्षी पूर्ण जगामध्ये आढळतो, एका निष्कर्षानुसार कबुतराची जगामध्ये 40 करोड इतकी लोकसंख्या आहे. कबूतर आणि मानवाचे नाते खूप जुने आहे, मेसोपोटामिया काळाच्या काही अवशेषांमध्ये याची पुष्टी झाली की आजपासून जवळ जवळ पाच हजार वर्षांपूर्वी कबूतर मनुष्य जवळ राहत होते. काही विद्वानांचे असे सुद्धा म्हणणे आहे की दहा हजार वर्षांपूर्वी सुद्धा कबूतर आणि माणूस एकत्र रहात होते. 

कबूतर सहा हजार फूट उंचीपर्यंत सुद्धा उडू शकते. कबुतराची हवेमध्ये उडण्याची गती 160 किलोमीटर प्रतितास इतकी असते. 

कबुतराची ऐकण्याची क्षमता खूप चांगली असते. ते मानवाच्या तुलनेने कमी वारंवारता असणारा आवाज सुद्धा ऐकू शकतात. आणि त्यामुळे दूरवरील वादळ आणि ज्वालामुखी यांचा त्यांना लगेच अंदाज येतो. कबुतराची पाहण्याची क्षमता सुद्धा असाधारण असते, ते 26 मैल दूर अंतरावरील वस्तू सुद्धा सहज ओळखू शकतात. 

साधारणपणे हे तीन ते पाच वर्षापर्यंत जगतात. परंतु अनेक वेळेस यापेक्षा जास्त वयापर्यंत सुद्धा ते जिवंत राहतात. जर त्यांची व्यवस्थित काळजी घेतली गेली तर ते पंधरा ते वीस वर्षे सुद्धा जिवंत राहू शकतात. हे त्यांच्या खाण्यावर आणि पर्यावरणावर अवलंबून राहते. आत्तापर्यंतचा सर्वात जास्त जगणारा कबूतर पंचवीस वर्षाचा आहे. 

कबूतर हा पक्षी आपला रस्ता कधीच विसरत नाही. हा पक्षी दोन हजार किलोमीटर लांब जाऊन सुद्धा परत त्याच रस्त्याने तो परत येऊ शकतो. म्हणतात की सूर्याच्या किरणांमुळे आणि गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे त्याला योग्य दिशा समजते. ऑक्‍सफर्ड युनिव्हर्सिटीच्या एका अभ्यासानुसार हे सुद्धा सिद्ध झाले आहे की मानवाने बनवलेले लँडमार्क किंवा मानवनिर्मित रस्त्यांचा सुद्धा ते वापर करतात. 

6) शिंजीर पक्षाबद्दल माहिती (Sunbird information in marathi)

शिंजिर हा पक्षी एक लहान आणि सडपातळ पक्षी आहे ज्याच्या 16 वेगवेळ्या प्रजातींमध्ये 145 प्रजाती आहेत. हा पक्षी साधारणपणे आफ्रिका आशिया आणि ऑस्ट्रेलियामधील रेन फॉरेस्ट मध्ये आढळतो.

शिंजीर पक्षी म्हणजेच सुवर्ण पक्षाच्या आहारामध्ये फुले लहान झाडे आणि फळे असतात. शिंजीर पक्षाच्या काही प्रजाती लहान कीटकांची शिकार सुद्धा करतात. शिंजीर पक्षाची नर प्रजाती आपल्या जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी आपले पंख पसरून शेपटी हलवते. शिंजीर पक्षी हा एका वेळेस एक ते चार अंडी घालतो. 

शिंजीर पक्षाची मादी प्रजाती डहाळे, कोळीचे जाळे, कागद आणि पानांपासून पर्स च्या आकाराचे घरटे बनवते. आणि नर प्रजाती तिच्या घरट्याचा आणि प्रदेशाचा बचाव करते. शिंजीर पक्षी म्हणजेच सुवर्ण पक्षाचे शास्त्रीय नाव Cinnyris Asiaticus आहे. 

शिंजीर पक्षाच्या जगभरात वेगवेगळ्या प्रजाती आढळतात. हा पक्षी नेहमी उष्णकटिबंधीय आणि मोकळ्या जंगलांमध्ये राहतो. हा पक्षी प्रामुख्याने आफ्रिका, दक्षिण आशिया आणि मध्य पूर्वेचे काही भाग आणि ऑस्ट्रेलियाच्या झाडांमध्ये आढळतो. विषुववृत्तीय भागात या प्रजातींची विविधता सर्वाधिक आहे. सुवर्ण पक्षी ही एक अतिशय जुळवून घेणारी प्रजाती आहे. जंगली तसेच शहरी भागातही ती आपल्याला आढळून येईल. हा पक्षी जास्त करून मानवनिर्मित ठिकाणी राहतो. म्हणजेच वृक्षारोपण, बाग इत्यादी. 

7) पेंग्विन विषयी माहिती (Penguin information in marathi)

पेंग्विन एक पक्षी आहे परंतु तो हवेमध्ये उडू शकत नाही. पेंग्विन पक्षाच्या जवळजवळ 17 प्रजाती आहेत परंतु त्यामधील 13 प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. पेंग्विन पक्षी दक्षिण आफ्रिका, अंटार्टिका, चिली, न्युझीलँड, अर्जेंटिना आणि ऑस्ट्रेलिया मध्ये आढळतो. 

पेंग्विन पक्षी बर्फाळ प्रदेशात सुद्धा आढळतो. पेंग्विन पक्षी कमीत कमी वीस मिनिटे आपला श्वास रोखून धरू शकतो. दरवर्षी 25 एप्रिल हा दिवस जागतिक पेंग्विन दिवस (World penguin day) म्हणून साजरा केला जातो. 

पेंग्विन या पक्षाला दात नसतात. परंतु तो आपली शिकार खाण्यासाठी आपल्या चोचीचा उपयोग करतो. पेंग्विन एक मांसाहारी पक्षी आहे. आणि हा पक्षी आपले संपूर्ण अन्न समुद्रापासून मिळवतो. पेंग्विन पक्षी सामान्यपणे आपल्या आहारात झिंगा, खेकडे आणि मासे खातो. आणि तो आपल्या आहारासोबत दगड सुद्धा खातो. कारण दगड त्याच्या अन्नाला पचण्यासाठी मदत करतात. पेंग्विन पक्षी पाण्यामध्ये पोहु सुद्धा शकतो. पेंग्विन पक्षी पाण्यामध्ये जवळजवळ 900 फूट खोल पर्यंत पोहू शकतो. 

8) बदका विषयी माहिती (Duck information in marathi)

बदक आपल्या जीवनातील अधिकांश वेळ पाण्यामध्ये राहण्यामध्ये घालवते. हा पक्षी तलाव, नदी इत्यादी मध्ये आढळतो. बदक हा सर्वहारी पक्षी आहे. म्हणजेच तो झाडे, फळे, फुले इत्यादी बरोबरच किडे आणि मासे सुद्धा खाऊ शकतो. जगभरामध्ये आतापर्यंत बदकाच्या जवळजवळ 40 प्रजाती सापडल्या आहेत. आणि या सर्वामधील सर्वात लोकप्रिय प्रजाती White Pelin आहे. 

बदकाच्या डोळ्यावर तीन पापण्या असतात. बदकाचा जीवन काळ जवळजवळ 10 वर्षांचा असतो. साधारणपणे एक स्वास्थ्य बदक 8 ते 10 वर्षे जिवंत राहते. बदकाच्या अशा सुद्धा काही प्रजाती आहेत, ज्या अंटार्टिका सारख्या बर्फाळ प्रदेशामध्ये सुद्धा राहतात. 

एक बदक एका वर्षामध्ये 300 पेक्षा जास्त अंडी देऊ शकते. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार हंस आणि बदक एकाच प्रजातीचे पक्षी आहेत. परंतु बदक हंस च्या शारीरिक रूपा पेक्षा लहान आहे. बदकाचे पंख निसर्गाने असे बनवले आहेत की ते पाण्यामध्ये राहून सुद्धा भिजत नाहीत. जगाच्या काही देशांमध्ये बदकाचे पालन मोठ्या प्रमाणावर केले जात आहे. कारण बदकाचे अंडे कोंबडीच्या अंड्यापेक्षा जास्त पौष्टिक आणि गुणकारी असते. 

9) सुतार पक्षी विषयी माहिती (Woodpecker information in marathi)

या पक्षाच्या 200 पेक्षा अधिक प्रजाती जगभरामध्ये आढळतात. सुतार पक्षाच्या काही प्रजाती अशिया आफ्रिका युरोप आणि साऊथ अमेरिका मध्ये आढळतात. हा पक्षी आकारामध्ये वेगवेगळा असतो. ऑस्ट्रेलिया आणि ध्रुवीय प्रदेशांमध्ये हा पक्षी आढळत नाही. भारतामध्ये आढळणारा सुतार पक्षी झाडावरती राहणार्‍या मुंग्या आणि त्यांची अंडी खातो. बुलबुल पक्षाच्या आकाराचा सुतार पक्षी भारतामध्ये आढळतो. 

सुतार पक्ष्याची चोच खूप मजबूत, टोकदार असते. चोच ही एका हातोड्या प्रमाणे असते. सुतार पक्षी आपल्या चोची च्या मदतीने झाडाची साल तोडू शकतो. सुतार पक्षी चोचीने एकाच जागी वारंवार मारतो. ज्यामुळे ती साल लवकर तुटते. जेव्हा हा पक्षी आपली चोच झाडाच्या सालीवर मारतो तेव्हा त्याचा आवाज खुप दूर वर ऐकू येतो. आणि हा पक्क्षी झाडामधील किडे खातो.  

सुतार पक्षी एका सेकंदामध्ये 20 वेळा चोच मारतो. तरीही त्याच्या चोचीला काहीही होत नाही. जगातील सर्वात लहान सुतार पक्षाचे नाव ब्रेस्टेड पिकलेट आहे. हा पक्षी साधारणपणे तीन ते चार इंचाचा आहे. परंतु याच्या काही प्रजाती मोठ्या आकाराच्या सुद्धा असतात, ज्यांचा आकार 10 ते 15 इंच असतो.  

सर्वात मोठ्या आकाराचा सुतार पक्षी आशियामध्ये आढळतो. ज्याला ग्रे स्लेटी सुतार पक्षी म्हणतात. हा साधारणपणे 20 इंच इतका असतो. हा पक्षी बागेमध्ये घरटे बनवतो. सुतार पक्षी जंगलामध्ये कमी प्रमाणात आढळतो. याचे कारण आहे त्या झाडाच्या सालीमध्ये त्याला किडे मिळणे. जुन्या झाडांवर सुद्धा हा आपले घरटे बनवतो. 

मादी आणि नर सुतार पक्षी यामध्ये अंतर खूप कमी असते. म्हणजेच आपण फक्त त्याच्या रंगावरून त्यांना ओळखू शकतो. नर पक्षाचे डोके काळ्या रंगाचे असते. परंतु माझा पक्षाचे डोके पांढऱ्या रंगाचे असते. परंतु सुतार पक्षाच्या काही विविध प्रजातीचा रंग वेगवेगळा असतो. सुतार पक्षाचे मुख्य भोजन झाडाच्या साली मध्ये आढळणारे किडे असतात. हा पक्षी अनेक प्रकारच्या बिया सुद्धा खातो. 

10) पोपट पक्षाविषयी माहिती (parrot information in marathi)

पोपट पक्षी एक विश्वासघाती पक्षी म्हणून ओळखला जातो. कारण आपण याला कितीही काळापर्यंत पाळीव ठेवले तरीही, जेव्हा आपण त्याला पिंजऱ्याच्या बाहेर सोडतो तेव्हा तो मालकाकडे पलटून बघत सुद्धा नाही. पोपट हा एकमेव असा पक्षी आहे जो पायाचा उपयोग करून आपल्या चोची पर्यंत अन्न नेऊ शकतो. पोपट पक्षी आपल्या प्रमाणे त्यांच्या पिल्लांची नावे ठेवतो. आणि ती नावे जीवन भरासाठी असतात. 

जगातील सर्वात मोठा पोपट दक्षिण अमेरिका मध्ये आढळतो. ज्याचं नाव Hyacinth Macaw Parrot आहे. ज्याची लांबी जवळजवळ 1 मीटर आहे. जगातील सर्वात वजनदार पोपट न्यूझीलंडमध्ये आढळतो. ज्याचं नाव काकापो (Kakapo) आहे. ज्याचे वजन दोन ते चार किलो ग्रॅम असते. जगातील सर्वात लहान पोपट Buff Faced Pygmy Parrot आहे असे. जो इंडोनेशिया आणि पापुआ न्यू गिनी मध्ये आढळतो. ज्याचे वजन फक्त 11.5 ग्रॅम असते. 

काकापो हा जगातील एकमेव असा पोपट आहे जो उडू शकत नाही. हे त्याच्या मोठ्या शरीरामुळे शक्य नाही. जगातील सर्वात जास्त शिकलेला पोपट ह Puck नावाचा पोपट आहे. हा शब्दकोशातील 1728 शब्द वाचू शकतो. जे एक विश्व रेकॉर्ड आहे. जगभरामध्ये पोपट पक्षाच्या जवळजवळ 393 प्रजाती आढळतात. पोपट हा पक्षी दक्षिण आणि मध्य अमेरिका, आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया सहित सर्व उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये आढळतो. 

निष्कर्ष 

आजच्या या पोस्टमध्ये आपण दहा पक्षांविषयी माहिती (10 birds information in marathi) जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा. 

1 thought on “दहा पक्षांविषयी माहिती | 10 birds information in marathi”

Leave a Comment