Marathi

भारतातील सर्वात जास्त चहा उत्पादन करणारी राज्ये | Top 10 highest tea producing states in India in marathi

Top 10 highest tea producing states in India in marathi : मित्रांनो 2021 च्या एका अहवालानुसार चहा उत्पादनांमध्ये आपला भारत देश देशानंतर दुसऱ्या क्रमांकावर येतो. आपल्या भारत देशाने एका वर्षामध्ये 134 कोटी किलोग्रॅम चहाचे उत्पादन करून हा विक्रम नोंदवला आहे. परंतु मित्रांनो भारताच्या या चहा उत्पादनामध्ये अनेक राज्यांचा मोलाचा वाटा आहे. आपल्या भारत देशातून अनेक वेगवेगळ्या देशांमध्ये चहा निर्यात केला जातो. आजच्या या पोस्टमध्ये आपण भारतातील सर्वात जास्त चहा उत्पादन करणाऱ्या राज्य विषयी माहिती (Top 10 highest tea producing states in India in marathi) जाणून घेणार आहोत. 

Top 10 highest tea producing states in India in marathi
भारतातील सर्वात जास्त चहा उत्पादन करणाऱ्या राज्य विषयी माहिती (Top 10 highest tea producing states in India in marathi)

भारतातील सर्वात जास्त चहा उत्पादन करणाऱ्या राज्य विषयी माहिती (Top 10 highest tea producing states in India in marathi)

10) नागालँड 

मित्रांनो नागालँड राज्याविषयी तुम्ही नक्कीच ऐकले असेल. कारण पर्यटनाच्या दृष्टीने हे भारतातील एक महत्त्वाचे राज्य म्हणून ओळखले जाते. हे राज्य फक्त पर्यटनासाठी च नाही तर चहाच्या मळ्यांसाठी सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. जर आपण येथील एका वर्षाच्या चहा उत्पादनाचा विचार केला तर तो पाच ते बारा लाख किलोग्रॅम इतका आहे. आणि ज्यामुळे या राज्याला भारतातील सर्वात जास्त चहा उत्पादन करणाऱ्या राज्यांमधील दहाव्या क्रमांकाचे राज्य म्हणून ओळखले जाते. 

जर येथील चहाचा विचार केला तर तर तो चहा खूप स्वादिष्ट आहे असे मानले जाते. या चहाची गुणवत्ता सुद्धा सर्वात चांगली आहे असे मानले जाते. असे म्हणतात की जेव्हा एखादा माणूस नागालँड च्या चहाच्या मळ्यांमध्ये पाय ठेवतो तेव्हा तो चहाच्या वासाने मंत्रमुग्ध होऊन जातो. यावरून तुम्हाला समजून जाईल की येथील चहा किती प्रसिद्ध आहे. 

9) सिक्कीम 

चहा उत्पादनामध्ये सिक्कीम राज्य भारतातील सर्वात जास्त चहा उत्पादन करणाऱ्या राज्यांमध्ये नवव्या क्रमांकावर येते. हे राज्य दरवर्षी सरासरी पाच लाख किलो ग्रॅम चहाचे उत्पादन करते. सिक्कीम राज्यामध्ये सर्वात जास्त चहाच्या बागा आढळतात. 

आणि येथे सर्वात चांगल्या पद्धतीचा चहा उत्पादन केला जातो. येथील हवामान आणि प्राकृतिक रचना यामुळे सिक्कीम राज्य चहा उत्पादनामध्ये अग्रेसर आहे. सिक्कीम राज्यातील चहाला भारत देशातूनच नाही तर अनेक विदेशातून सुद्धा मागणी आहे. 

8) हिमाचल प्रदेश 

ब्लॅक टी आणि ग्रीन टी विषयी तुम्ही कधीतरी नक्कीच ऐकले असेल. ब्लॅक टी आणि ग्रीन टी चे उत्पादन हिमाचल प्रदेश मध्ये सर्वात मोठ्या प्रमाणावर केले जाते. आणि या दोन्ही प्रकारच्या चहाना पूर्ण भारतामध्ये खूप पसंद केले जाते. सन 1857 मध्ये लंडनमध्ये त्याच्या स्वादामुळे या चहा ला सुवर्ण पदक मिळाले होते. हिमाचल प्रदेश दरवर्षी आठ ते नऊ लाख किलोग्राम चहाचे उत्पादन करतो. येथील जास्त प्रमाणात चहा कांगडा व्हॅली येथे उत्पादन केला जातो. मित्रांनो एका काळात कांगडा व्हॅली मध्ये 17 ते 18 लाख किलो चहाचे उत्पादन घेतले जात होते. 

परंतु सध्या सात ते आठ लाख किलो चहा येथे उत्पादित केला जातो. याचे कारण आहे 1905 मध्ये आलेला येथील भूकंप. या भूकंपामुळे येथील चहाचा मळा आणि अनेक उद्योगधंदे बंद पडले आहेत. 

7) त्रिपुरा 

मित्रांनो त्रिपुरा भारतातील सर्वात जास्त चहा उत्पादन करणाऱ्या राज्यांमध्ये सातव्या क्रमांकावर आहे. त्रिपुरामध्ये आजच्या काळात चालत असलेल्या पायलट प्रोजेक्‍ट मुळे येथील चहा उत्पादन मोठ्या प्रमाणात वृद्धिंगत होत आहे. या राज्यांमध्ये दरवर्षी आठ ते नऊ लाख किलोग्रॅम चहाचे उत्पादन घेतले जाते परंतु तरीही या राज्याला Traditional Tea Growing State म्हटले जाते. 

येथे 2500 पेक्षा पेक्षा जास्त लहान चहा उत्पादक आहेत. साधारणपणे त्रिपुरा राज्यामध्ये सीटीसी चहाचे उत्पादन केले जाते. येथे ग्रीन टी चे सुद्धा काही प्रमाणात उत्पादन केले जाते. 

6) अरुणाचल प्रदेश 

भूतान म्यानमार आणि चीन यांच्या सीमेला लागून असलेला अरुणाचल प्रदेश आपल्या सौंदर्यामुळे सर्वांना आपल्याकडे आकर्षित करून घेतो. या राज्याला उगवत्या सूर्याची भूमी असेसुद्धा म्हटले जाते. परंतु तुम्हाला माहित आहे का अरुणाचलप्रदेश चहा उत्पादनासाठी सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. चहा उत्पादनामध्ये अरुणाचल प्रदेश राज्य भारतामध्ये सहाव्या क्रमांकावर आहे. अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये दरवर्षी अकरा ते बारा लाख किलोग्रॅम चहाचे उत्पादन केले जाते. 

गेल्या काही वर्षांपासून येथील राज्य सरकार येथील चहाचे उत्पादन वाढविण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. ज्यामुळे अरुणाचल प्रदेश त्रिपुरा राज्यापेक्षा वरती गेला आहे. अरुणाचल प्रदेश मधील चहाच्या गुणवत्तेमुळे फक्त भारतातच नाही तर परदेशात सुद्धा या चहाला खूप मागणी आहे. 

5) कर्नाटक 

सर्वात कमी गर्दी असलेले समुद्रकिनारे आणि आपल्या आकर्षक सौंदर्यामुळे ओळखले जाणारे कर्नाटक राज्य भारतातील सर्वात जास्त चहा उत्पादन करणाऱ्या राज्यांमध्ये पाचव्या क्रमांकावर येते. कर्नाटक राज्यातील चहा फक्त कर्नाटक राज्यातच नाही तर इतर राज्यात सुद्धा खूप पसंत केला जातो. 

कर्नाटक मध्ये सर्वात मोठ्या प्रमाणावर चहा उत्पादन करण्यासाठी कूर्ग आणि कोडाकु या प्रदेशातील 2 लाख पेक्षा जास्त एकर जमिनीचा वापर केला जातो. जेथे साधारणपणे दरवर्षी सहा लाख किलोग्रॅम चहाचे उत्पादन घेतले जाते. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की कर्नाटक राज्यामध्ये चहा बरोबरच कॉफी चे सुद्धा उत्पादन खूप मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. 

4) केरळ 

तुम्हाला तर माहीतच आहे की आपल्या भारतातील केरळ राज्याला Spice Capital म्हणून ओळखले जाते. कारण इथे फक्त भारतातीलच नाही तर पूर्ण जगातील सर्वात जास्त प्रमाणात मसाले उगवले जातात. जे आपल्या अन्नाला स्वादिष्ट बनवतात. परंतु केरळमध्ये मसाल्यांशिवाय चहाचे सुद्धा सर्वात मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले जाते. म्हणूनच भारतातील चहा उत्पादनामध्ये केरळ राज्य चौथ्या क्रमांकावर आहे. 

येथे जवळजवळ पाच लाख एकर जमिनीवर सरासरी एका वर्षांमध्ये 56 लाख किलोग्रॅम चहाचे उत्पादन केले जाते. आणि त्यामुळे हे राज्य फक्त केरळ राज्यातील नव्हे तर पूर्ण भारतातील अनेक राज्यांची गरज पूर्ण करते. केरळ राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर चहाची शेती केली जाते. कारण या जिल्ह्याचे वातावरण चहासाठी खूप पूरक आहे. 

3) तमिळनाडू 

तमिळनाडू राज्य सुद्धा भारतातील त्या राज्यांमध्ये सामील आहे ज्या राज्यांमध्ये सर्वात जास्त प्रमाणात चहाचे उत्पादन घेतले जाते. जेव्हा तमिळनाडूच्या चहा ची गोष्ट येते तेव्हा बाजारपेठेमध्ये या चहाला खूप मागणी आढळून येते. याचे कारण आहे या चहाचा स्वाद.

तमिळनाडूमध्ये दरवर्षी 160 लाख किलोग्राम चहाचे उत्पादन घेतले जाते. जे की पश्चिम बंगाल आणि आसाम या राज्यांपेक्षा पेक्षा खूप कमी आहे. परंतु इतके उत्पादन तमिळनाडू राज्याला भारतातील सर्वात जास्त चहा उत्पादन करणाऱ्या राज्यांमधील तिसऱ्या क्रमांकाचे राज्य बनवते. इतक्या मोठ्या प्रमाणावर चहाचे उत्पादन करण्यासाठी या राज्यांमध्ये सत्तर हजार एकर जमिनीचा वापर केला जातो. या राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर चहाची शेती केली जाते. 

2) पश्चिम बंगाल 

पश्चिम बंगाल राज्याला भारतातील सर्वात मोठा चहा उत्पादक राज्य मानले जाते. कारण येथील शेतकरी खूप मोठ्या प्रमाणावर चहाची शेती करतात. हे राज्य फक्त भारतातीलच नाही तर पूर्ण जगभरातील लोकांची चहाची गरज पूर्ण करते. 

पश्चिम बंगाल राज्यातील लहान-लहान शेतकरी खूप मोठ्या प्रमाणावर येथे चहाचे उत्पादन करतात. पश्चिम बंगालमध्ये दरवर्षी सरासरी 140 हजार हेक्‍टर जमिनी मध्ये जवळजवळ त्यात 33 कोटी किलोग्रॅम चहाचे उत्पादन केले जाते. आणि हे उत्पादन पश्चिम बंगाल राज्याला भारतातील सर्वात जास्त चहा उत्पादन करणाऱ्या राज्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर ठेवते. 

1) आसाम 

भारतातील आसाम राज्य सुद्धा चहा उत्पादन करणाऱ्या राज्यांमध्ये सर्वात प्रसिद्ध राज्य आहे. आसाम राज्य भारतात गेल्या काही काळापासून सर्वात जास्त प्रमाणात चहाचे उत्पादन करत आहे. इतर राज्यांप्रमाणेच आसाम राज्यात सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर चहाची शेती केली जाते. असे मानले जाते की आसाम चा चहा फक्त भारतातच नाही तर पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे.

त्यामुळे भारताशिवाय इतर देशात सुद्धा आसामच्या चहाला खूप मागणी आहे. आसाम राज्यामध्ये दरवर्षी तीन लाख आठ हजार हेक्‍टर जमिनी मध्ये जवळजवळ 65 लाख किलोग्रम चहाचे उत्पादन घेतले जाते. हे राज्य भारतातील एकूण चहा उत्पादनामध्ये 52 टक्के चहाचे उत्पादन करते. 

भारतातील सर्वात जास्त चहा उत्पादन करणारी राज्ये  (Top 10 highest tea producing states in India in marathi) 

  1. आसाम
  2. पश्चिम बंगाल
  3. तमिळनाडू
  4. केरळ
  5. कर्नाटक
  6. अरुणाचल प्रदेश
  7. त्रिपुरा
  8. हिमाचल प्रदेश
  9. सिक्कीम
  10. नागालँड

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

जगातील सर्वाधिक चहा उत्पादन करणारा देश कोणता?

भारत 

चहाचे उत्पादन कोणकोणत्या राज्यात होते?

आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, हिमाचल प्रदेश इत्यादी.

चहा उत्पादनात अग्रेसर राज्य 

आसाम 

निष्कर्ष 

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण भारतातील सर्वात जास्त चहा उत्पादन करणाऱ्या राज्य विषयी माहिती (Top 10 highest tea producing states in India in marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. आशा करतो तुम्हाला ही माहिती आवडली असेल. आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या पोस्टमध्ये तोपर्यंत धन्यवाद. 

Related Posts

10 birds information in marathi

दहा पक्षांविषयी माहिती | 10 birds information in marathi

10 birds information in marathi : मित्रांनो जगभरामध्ये अनेक प्रकारचे पक्षी आढळतात. ज्यांचे विषयी आपल्याला खूपच थोडी माहिती माहीत असते. आणि अनेक लोकांना या पक्षांविषयी माहिती जाणून घेण्याची…

Butterfly information in marathi

फुलपाखरा विषयी माहिती | Butterfly information in marathi

Butterfly information in marathi : फुलपाखरू हा एक कीटक वर्गामध्ये मोडला जाणारा जीव आहे. जो आपल्याला विविध रंगांमध्ये आढळून येतो. आणि आपण त्याच्याकडे आकर्षित होतो. हा सुंदर कीटक…

Cycle information in marathi

सायकल ची माहिती मराठी | Cycle information in marathi

Cycle information in marathi : सायकल ची माहिती मराठी : सायकलचा इतिहास खूप जुना आहे. आजच्या काळात लोकांकडे कार-बाइक अशी स्वयंचलित वाहने आल्यामुळे सायकलचा उपयोग कमी झाला आहे….

Mosquito information in marathi

डासा विषयी माहिती | Mosquito information in marathi

Mosquito information in marathi : mosquito म्हणजेच डास. डास हा एक छोटासा जीव आहे, जो नेहमी आपल्या आसपास उडताना आपल्याला दिसतो. हा कीटक मानवाचे रक्त पिण्यासाठी ओळखला जातो….

Crocodile information in marathi

मगर विषयी माहिती | Crocodile information in marathi

Crocodile information in marathi : मगर हा एक पाणी आणि जमिनीवर आढळणारा धोकादायक जीव आहे. हा पृथ्वीवरील प्राचीन जीवा पैकी एक स्तनधारी आणि सरीसृप या श्रेणीमध्ये येणारा जीव…

bangalore information in marathi

बेंगलोर विषयी माहिती | Bangalore information in Marathi

bangalore information in marathi : आज काल जर पण कोणालाही विचारलं की कॉलेज संपल्यानंतर तू काय करणार आहेस? तर तो सहज सांगेल की मला नोकरी करायची आहे आणि…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *