पाच खेळाडूंची माहिती | 5 Sports players information in marathi

5 Sports players information in marathi : आपल्या भारत देशामध्ये अनेक प्रकारचे खेळ खेळले जातात. याच खेळाच्या मदतीने अनेक खेळाडूंनी आपल्या भारत देशाचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले आहे. ज्यांच्यामुळे आपल्या भारत देशाला एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. आजच्या लेखामध्ये आपण भारतातील पाच खेळाडूंची माहिती (5 sports players information in marathi) जाणून घेणार आहोत.

5 sports players information in marathi
भारतातील पाच खेळाडूंची माहिती (5 sports players information in marathi)

भारतातील पाच खेळाडूंची माहिती (5 sports players information in marathi)

सचिन तेंडुलकर 

क्रिकेटविश्वात डॉन ब्रॅडमन याच्यानंतर जागतिक स्तरावर सर्वोत्तम मानला जाणारा माजी भारतीय क्रिकेटपटू आहे. सचिनला भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला. हा सन्मान त्यांना त्याच्या क्रिकेट मधील निवृत्तीच्या दिवशी जाहीर झाला. भारतीय वायुसेना दलाने त्याला ग्रुप कॅप्टन हा गौरवात्मक हुद्दा प्रदान केलेला आहे. 

सचिन तेंडुलकरचा जन्म 24 एप्रिल 1973 मध्ये मुंबईमध्ये एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात झाला. सचिनच्या कुटुंबीयांचे आवडते संगीत दिग्दर्शक सचिन देव बर्मन ह्यांच्या नावावरून त्याचे सचिन असे नाव ठेवण्यात आले. सचिन त्याचे वडील रमेश तेंडुलकर ह्यांच्या दुसऱ्या पत्नीचा मुलगा आहे.

सचिनने आपले पहिले एकदिवसीय सामन्यांमधील शतक सप्टेंबर 9, इ.स. 1914 साली कोलंबो, श्रीलंका येथे, ऑस्ट्रेलियाविरुद्ध नोंदवले. त्याला पहिले आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतक नोंदवण्यासाठी 79 सामने वाट पहावी लागली. सचिन हा एकमेव असा खेळाडू आहे की ज्याने रणजी चषक, दुलिप चषक आणि इराणी चषकाच्या आपल्या पहिल्या सामन्यांमध्ये शतक झळकावले.

विराट कोहली

हा भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आणि भारतीय राष्ट्रीय संघाचा कर्णधार आहे. उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या कोहलीचा अनेकवेळा जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून उल्लेख केला गेला आहे.  इएसपीएनच्या जगातील सर्वात जास्त विख्यात ॲथलीट्सच्या 2016 च्या यादीत कोहलीचे नाव आठव्या क्रमांकावर आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाकडून तो खेळतो, आणि 2013 पासून तो संघाचा कर्णधार आहे. 

विराट कोहलीचा जन्म 5 नोव्हेंबर, 1988 रोजी दिल्लीतील उत्तम नगर मध्ये राहणाऱ्या एका पंजाबी कुटुंबात झाला. त्याचे वडील प्रेम कोहली व्यवसायाने एक वकील होते व आई सरोज कोहली ही गृहिणी आहे. त्याच्या मोठ्या भावाचे नाव विकास तर मोठ्या बहिणीचे नाव भावना आहे. त्याच्या कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, तीन वर्षांचा असल्यापासून कोहली त्याची क्रिकेट बॅट उचलून ती फिरवत वडिलांना गोलंदाजी करण्यास सांगत असे.

मार्च 2013 मध्ये, कोहलीने ‘विराट कोहली फाऊंडेशन’ नावाने गरीबांना मदत करणारी संस्था सुरू केली. वंचित मुलांना मदत करणे आणि चॅरिटीसाठी पैसा गोळा करणे हे संस्थेचे मुळ उद्देश आहेत.

महेंद्रसिंह धोनी

महेन्द्रसिंग धोनीचा जन्म 7 जुलै 1981 रोजी राची, बिहार येथे झाला. महेन्द्र आपल्या परिचितांमध्ये एम. एस. डी. माही ह्या टोपणनावानं ओळखला जात असे. महेन्द्र लहान असतांना त्याचे आई वडील उत्तराखंड येथून राचीला स्थलांतरित झाले. त्याचे वडील-पान सिंग ‘मेकॉन’मध्ये ज्युनिअर मॅनेजमेंटमधील पदावर कार्यरत होते.धोनीला जयंती गुप्ता ही बहीण आणि नरेंद्र धोनी हा भाऊ आहे. शाळेत असताना महेन्द्र बॅडमिंटन आणि फूटबॉल खेळत असे. शाळेच्या फूटबॉल संघाचा तो गोलकीपर होता. शाळेच्या फूटबॉल प्रशिक्षकांनी त्याला स्थानीय क्रिकेट क्लब मध्ये क्रिकेट खेळण्यास पाठविले.

महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीतून निवृत्ती जाहीर केल्याच्या दिवशी लोक आश्चर्यचकित झाले. 15 ऑगस्ट 2020 चा तो दिवस होता, या दिवशी महेंद्रसिंग धोनीने आपल्या 16 वर्षाच्या क्रिकेट कारकिर्दीतून कायमचे निवृत्ती घेतली. या घोषणेसह सोशल मीडियावर त्याच्या कोट्यावधी चाहत्यांनीही त्यांच्या व्यथा मांडल्या आणि बर्‍याच मोठ्या लोकांकडूनही त्यांना या वेळेच्या शुभेच्छा दिल्या.

पी.व्ही. सिंधू

ही एक भारतीय बॅडमिंटनपटू आहे. ती भारतातील सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक मानली जाते. सिंधूने ऑलिम्पिक आणि बी.डब्लू.एफ. सर्किट स्पर्धेसह विविध स्पर्धांमध्ये पदके जिंकली आहेत. यामध्ये जागतिक चॅम्पियनशिपमधील सुवर्णपदकाचाही समावेश आहे. बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियन बनणारी ती पहिली आणि एकमेव भारतीय आहे. तसेच ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सलग दोन पदके जिंकणारी भारतातील दुसरी वैयक्तिक ऍथलीट आहे. 2 एप्रिल 2017 मध्ये तिने तिच्या कारकिर्दीतील उच्च असलेला जागतिक क्रमवारीत दुसरा क्रमांक पटकावला.

पुसरला वेंकट सिंधू हिचा जन्म हैदराबाद येथील पी. व्ही. रमन आणि पी. विजया यांच्या घरी झाला. तिचे वडील रमण हे भारतीय रेल्वेचे कर्मचारी आहेत जे मूळ तेलंगणचे आहेत तर आई विजया यांचा जन्म विजयवाडा, आंध्र प्रदेश येथील आहे. तिचे आई-वडील दोघेही राष्ट्रीय स्तरावरील व्हॉलीबॉल खेळाडू आहेत. तिचे वडील हे भारतीय व्हॉलीबॉल संघाचे सदस्य होते आणि त्यांनी 1986 च्या सोलआशियाई खेळांमध्ये कांस्यपदक जिंकले होते. त्यांना या खेळातील योगदानाबद्दल 2000 मध्ये अर्जुन पुरस्कार मिळाला होता.

सायना नेहवाल

ही एक भारतीय बॅडमिंटनपटू आहे. ऑलिंपिक खेळात उपांत्यपूर्व फेरी गाठणारी तसेच जागतिक ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धा जिंकणारी सायना ही पहिली भारतीय महिला आहे. जुन 2009 मध्ये झालेल्या इंडोनेशियन खुल्या स्पर्धांमध्ये अजिंक्यपद पटकावणारी सायना ही पहिलीच भारतीय महिला खेळाडू आहे.

डॉ. हरवीर सिंह नेहवाल आणि उषा रानी नेहवाल यांची दुसरी मुलगी सायना नेहवाल हरियाना (हिसार मध्ये) जन्मली. तिला  चंद्रशेह नावाची एक मोठी बहीण आहे. कृषी क्षेत्रात  पीएचडी असलेले त्यांचे वडील, चौधरी चरण सिंह हरियाणा कृषी विद्यापीठात कार्यरत आहेत.

सायना नेहवाल यांना भारत सरकारकडून 4 पुरस्कार मिळाले आहेत. 2009 मध्ये त्यांनी बॅडमिंटनसाठी अर्जुन पुरस्कार जिंकला. एक वर्षानंतर 2010 मध्ये त्यांनी पद्मश्री आणि राजीव गांधी खेल रत्न जिंकले, जो भारतातील सर्वात मोठा क्रीडा सन्मान आहे. खेळात उल्लेखनीय कामगिरीसाठी तिला 2016 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.

सारांश

आजच्या या लेखामध्ये आपण भारतातील पाच खेळाडूंची माहिती (5 sports players information in marathi) जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा.

1 thought on “पाच खेळाडूंची माहिती | 5 Sports players information in marathi”

Leave a Comment