सायकल ची माहिती मराठी | Cycle information in marathi

Cycle information in marathi : सायकल ची माहिती मराठी : सायकलचा इतिहास खूप जुना आहे. आजच्या काळात लोकांकडे कार-बाइक अशी स्वयंचलित वाहने आल्यामुळे सायकलचा उपयोग कमी झाला आहे. परंतु विसाव्या शतकातील लोक आपल्या आरोग्याचा विचार करणे सायकल कडे वळत आहेत. आजच्या या पोस्टमध्ये आपण सायकल ची माहिती मराठी (Cycle information in marathi), सायकलचा शोध कोणी लावला याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

Cycle information in marathi
सायकल ची माहिती मराठी (Cycle information in marathi)

सायकलचा शोध कोणी लावला (Cycle cha shodh koni lavla)

सायकल ची माहिती मराठी (Cycle information in marathi)

आज आपण सायकलच्या इतिहासाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. तर आता आपण पाहू की सर्वात शेवटी सायकलचा शोध कोणी लावला होता? आधुनिक सायकलचा शोध लावण्याचे पूर्ण श्रेय किर्कपैट्रिक मैकमिलन  (Kirkpatrick Macmillan) यांना जाते. ते एक लोहार होते.  त्यांनी हा शोध 1839 मध्ये स्कॉटलंडमध्ये लावला होता.

आधुनिक सायकलचा शोध लागण्या अगोदर, ज्या सायकल होत्या त्यांना पायाने ढकलून चालवले जात होते. परंतु आधुनिक सायकलचा शोध लागल्यामुळे सायकल पायाने चालवणे शक्य झाले. याचे श्रेय किर्कपैट्रिक मैकमिलन यांना जाते.

इसवी सन 1817 मध्ये बैरन फॉन ड्रेविस यांनी सर्वात पहिली सायकलची रूपरेखा तयार केली होती. ही सायकल त्यांनी लाकडाची बनवली होती. ज्याचे नाव होते ड्रेसियेन. ही सायकल जवळ जवळ 15 किमी प्रती तास इतक्या वेगाने चालत होती.  परंतु ही सायकल जास्त काळ अस्तित्वात राहिली नाही. या सायकल चा इतिहास 1830 ते 1842 यामध्ये मानला जातो.

सायकल चा इतिहास (History of cycle in marathi)

तसं पाहायला गेलं तर सायकलचा इतिहास खूप जुना नाही. परंतु हे एक असे साधन आहे ज्याला पूर्ण जगामध्ये सर्वात जास्त मागणी आहे. दरवर्षी जगभरामध्ये जास्त 10 कोटी पेक्षा जास्त सायकल विकल्या जातात.

सायकल चा इतिहास अठराव्या शतकाच्या शेवटी पासून सुरू झाला होता. 1816 मध्ये पॅरिस येथे सर्वात पहिली सायकल बनवली गेली होती. जिला हॉबी हॉर्स हे नाव दिले गेले होते. पायंडल चा शोध 1865 मध्ये लागला होता. ज्याचे श्रेय Lallement यांना जाते.

सायकलच्या इतिहासाची गोष्ट इथेच संपत नाही. लोकांमध्ये याची मागणी वाढत गेली. परंतु या सायकलच्या उपयोगा नंतर खूप थकवा येत होता. त्यामुळे लोकांचे जीवन सोपे होईल असे यंत्र बनवण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत होते.

अमेरिका, फ्रान्स आणि इंग्लंड सारख्या देशामध्ये यंत्र बनवणाऱ्या कारागिरांनी 1872 मध्ये सायकलचा इतिहास बदलणारा आकार दिला. यामध्ये लोखंडाच्या पट्टीचा वापर केला गेला होता. या सायकलला दोन चाके होती. त्याचे पुढचे चाक मोठे होते आणि पाठीमागील चाक लहान होते. पुढच्या चाकाचा व्यास 64 इंच आणि पाठीमागील चाकाचा व्यास 12 इंच होता.

भारतामध्ये सायकल स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष मुख्य साधन म्हणून वापरली जात होती. 1960 पासून ते 1990 पर्यंत भारतामध्ये क्वचित एखादा परिवार असेल ज्याच्याकडे सायकल नसेल. सायकलचा उपयोग प्राचीन काळामध्ये भाज्या आणि पिके बाजारामध्ये नेण्यासाठी केला जात होता. याबरोबरच दुधाचे वाटप करण्यासाठी सुद्धा केला जात होता. पोस्ट ऑफिस मधील पोस्टमन सायकल चाच वापर करत होते.

जसजसा काळ बदलत गेला तसा सायकलचा उपयोग कमी होऊ लागला. सायकल ची जागा गाडी आणि कार नी घेतली. 2015 नंतर सायकलच्या विक्रीमध्ये पुन्हा वाढ झाली. आजच्या धावपळीच्या युगामध्ये लोक आपल्या आरोग्यासाठी सायकलचा उपयोग वापर करू इच्छित आहेत.

जगभराचा विचार केला तर चीन या देशांमध्ये सर्वात जास्त सायकल चा उपयोग केला जातो. चीन नंतर दुसऱ्या क्रमांकावर भारत हा देश आहे.

आंतरराष्ट्रीय सायकल दिवस (International Cycle day)

2018 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाद्वारे अधिकृत रूपात आंतरराष्ट्रीय सायकल दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. आंतरराष्ट्रीय सायकल दिवस दरवर्षी 3 जून रोजी साजरा केला जातो. लोकांच्या मनामध्ये सायकलच्या प्रति उपयोग आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सायकल दिवस साजरा केला जातो.

सायकल चे मुख्य भाग (Parts of Cycle in Marathi)

  • हँडल
  • ब्रेक
  • पायंडल
  • टायर
  • ट्यूब
  • सीट
  • कॅरेज

सायकल विषयी काही रोचक तथ्य (Facts about cycle in Marathi)

1) जगभरामध्ये दरवर्षी 10 कोटीपेक्षा जास्त सायकल्स विकल्या जातात.

2) जगभरामध्ये सर्वात जास्त सायकलचा उपयोग चीन या देशांमध्ये केला जातो.

3) सायकलचा उपयोग करणाऱ्या देशांमध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो.

4) सायकल नीदरलैंड देशामध्ये सर्वात लोकप्रिय आहे.

5) सायकल चा इतिहास दोनशे पेक्षा अधिक वर्ष जुना आहे.

6) सायकल चालवणे आपल्या शरीरातील कॅलरीज बर्न होतात, ज्याचा आपल्या आरोग्याला फायदा होतो.

7) दरवर्षी 3 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय सायकल दिवस म्हणून साजरा केला जातो.

8) सायकल मुळे पर्यावरण प्रदूषण होत नाही.

9) सायकल चालवण्यासाठी पेट्रोल व डिझेल ची आवश्यकता नसते.

सायकल चालवण्याचे फायदे (Advantages of cycling in Marathi)

1) दररोज अर्धा तास किंवा एक तास सायकल चालवल्याने पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते.

2) जर दररोज सकाळी सायकल चालवली तर ते आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते.

3) सायकल चालवण्याचा सर्वात मोठा फायदा आपल्या रोगप्रतिकारक शक्ती ला होतो. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती च्या पेशी ऍक्टिव्ह होतात. आणि त्यामुळे आजाराचा धोका खूप कमी होतो.

4) ज्या लोकांना पायाचा त्रास आहे अशा लोकांनी दररोज तीस मिनिटे सायकल चालवावी. 

5) दररोज एक तास सायकल चालवल्याने आपला मेंदू खूप ऍक्टिव्ह राहतो. याबरोबरच मेंदूची शक्ती सुद्धा वाढण्यास मदत होते.

6) सायकल चालवल्याने कोणत्याही प्रकारचा खर्च होत नाही. यामुळे पैशाची बचत होते.

निष्कर्ष :

आजच्या या पोस्टमध्ये आपण सायकल ची माहिती मराठी (Cycle information in marathi) जाणून घेतली. सायकलचा शोध कोणी लावला (Cycle cha shodh koni lavla) ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Comment