मोर पक्षाविषयी माहिती | Peacock information in marathi

Peacock information in marathi : मोर हा पृथ्वीवरील सर्वात सुंदर पक्षांमधील एक पक्षी आहे. हा मध्यम आकाराचा एक रंगीन पक्षी आहे, जो तितर परिवाराशी (Pheasant) संबंधित आहे. मोराचे वैज्ञानिक नाव पावो क्रिस्टेट्स आहे. हा पक्षी आशिया खंडाचा मूळनिवासी आहे. आणि हा पक्षी मुख्यतः भारत, श्रीलंका आणि बर्मा या देशांमध्ये आढळतो. आजच्या या पोस्टमध्ये आपण मोर पक्षाविषयी माहिती (Peacock information in marathi) जाणून घेणार आहोत.

Peacock information in marathi
मोर पक्षाविषयी माहिती (Peacock information in marathi)

मोर पक्षाविषयी माहिती (Peacock information in marathi)

1) केवळ नर मोरालाच पिकॉक म्हणतात. मादी मोराला Peahen म्हणतात. मोराला सामूहिक रूपामध्ये Peaowl म्हणतात. आणि मोराच्या पिल्लांना Peachicks म्हणतात.

2) मोराच्या साधारणपणे तीन प्रमुख प्रजाती आहेत. ज्यामध्ये आशियातील दोन आणि आफ्रिकेमधील एक समाविष्ट आहे. निळा भारतीय मोर (Blue Indian Peacock) आणि हिरवा मोर (Green Peacock) या आशियन प्रजाती आहेत. तर कांगो मोर (African Congo Peacock) ही आफ्रिकन प्रजाती आहे.

3) मोर भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. 26 जानेवारी 1963 रोजी निळ्या मोर पक्ष्याला भारत सरकार द्वारे भारताचा राष्ट्रीय पक्षी (National Bird Of India)  म्हणून घोषित केले गेले.

4) मोर मुख्यता जमिनीवर राहणारा पक्षी आहे. मूळ हवेमध्ये उडू शकतो परंतु फक्त काही वेळा पर्यंतच. शिकाऱ्यायांपासून वाचण्याचा प्रयत्न करण्यासाठी मोर रात्री उंच झाडावर झोपतो.

5) मोर शेतामध्ये, जंगलामध्ये आणि उष्ण ठिकाणी राहतो. मोरांना अशा ठिकाणी राहायला आवडतं जिथे झाडांची उंची कमी असेल.

6) मोर हा जगातील सर्वात मोठा उडणाऱ्या पक्ष्यापैकी सुद्धा एक आहे. त्याच्या पंखाचा पिसारा 1.5 मीटर च्या आसपास असतो.

7) मोर पक्षाचा हवेमध्ये उडण्याचा वेग दहा मैल प्रतितास असतो.

8) मोर हा एक सर्वाहारी पक्षी आहे. जो मुख्य रूपामध्ये अन्नधान्य, गवत, फळे, बिया, फुलांच्या पाकळ्या, मुंग्या, कीटक, उंदीर, पाल, साप इत्यादी खातो.

9) जंगलामध्ये राहणाऱ्या मोरांचा जीवनकाळ शिकारी आणि कठोर वातावरणामुळे वीस वर्षांपर्यंत असतो. सुरक्षित ठिकाणी राहणाऱ्या मोरांचा जीवन काळ 50 वर्षापर्यंत असतो.

10) नर मोर आकाराने मादीपेक्षा दुप्पट मोठा असतो. मोराचे वजन चार ते सहा किलोपर्यंत असते. आणि मोरणी चे वजन 2.75 कीलोग्राम ते 4 कीलोग्रम पर्यंत असते.

मोर पक्षी माहिती मराठी (Mor pakshi mahiti marathi)

11) मोराची लांबी सहा ते सात फूट असते. आणि मोरनी ची लांबी 3 ते 3.5 फूट असते.

12) मोराच्या चोचीची ची लांबी एक इंच असते.

13) मोराच्या रंगीबेरंगी शेपटीला Train म्हणतात. ज्यामध्ये दीडशे पंख असतात.

14) मोराची शेपटी त्याच्या पूर्ण लांबीच्या 60 टक्के असते. 

15) नर मोराच्या डोक्यावर मुकुटा प्रमाणे सुंदर तुरा असतो. त्याचा रंग आणि आकार प्रजाती नुसार वेगवेगळा असतो.

16) नर मोर मादी मोराच्या तुलनेने अधिक सुंदर असतो.

17) मोराच्या पंखा साठी आपल्याला त्याची शिकार करावी लागत नाही, ते आपल्याला उष्ण हवामानामध्ये पडलेले आढळतात.

18) एका मुलाच्या पायामध्ये चार बोटे असतात. ज्या मधील तीन पुढे आणि एक पाठीमागच्या बाजूला असते. मोराची अशी संरचना मोराना झाडावर बसण्यासाठी सोपी बनवते.

19) मोर साधारणपणे 16 किलोमीटर प्रतितास इतक्या वेगाने धावू शकतो.

20) मोर हा एक समूहामध्ये राहणारा पक्षी आहे. हा एकटे राहणे पसंत करत नाही. त्यांच्या समूहाला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते.

मोर पक्षाविषयी माहिती (Peacock information in marathi)

21) प्रजनन काळात नर मोर पंख पसरवून मादीला आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात.

22) जन्माच्या वेळी मोराच्या पिल्लांचे वजन 103 ग्रॅम असते. जन्मापासूनच त्याची पिल्ले चालण्यामध्ये आणि खाण्यामध्ये सक्षम असतात.

23) मोर पक्षाचा प्रजनन काळ जानेवारी ते मार्च यांच्यामध्ये असतो. ते एका वेळेस तीन ते सहा अंडी देतात. अंडी उबवण्याचे काम मादी करते. 28 दिवसानंतर अंड्यामधून पिल्ले बाहेर येतात.

24) मोर सामान्यपणे आठ ते दहा मोरांच्या समूहामध्ये फिरतात.

25) मोरांची एक अजब प्रथा आहे. ती म्हणजे ते जमिनीवर घरटे बनवतात आणि उंच झाडावर बसतात.

26) मोर हा पक्षी 11 वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढू शकतो.

27) मोर हा पक्षी पाण्यामध्ये प्रवेश करत नाही म्हणजे त्याला पोहता येत नाही.

28) हिंदू धर्मामध्ये मोराला विशेष महत्त्व आहे. भगवान श्रीकृष्णाच्या मुकुटावर मोराचा पंख सजलेला असतो. आणि शंकराचे पुत्र कार्तिकेय यांचे वाहन सुद्धा मोर आहे.

29) मौर्य साम्राज्याचे राष्ट्रीय चिन्ह मोर होते.

30) प्राचीन काळामध्ये मोराच्या पंखाचा उपयोग लेखणीच्या रूपामध्ये केला जात होता. ज्याला शाईमध्ये बुडवून लिखाण केले जात होते.

मोर पक्षाविषयी माहिती (Peacock information in marathi)

31) प्रसिद्ध ग्रंथ बायबल मध्ये सुद्धा मोराचे वर्णन केले आहे.

32) विश्‍वविजेता सिकंदर सुद्धा मोरांचा खूप शौकीन होता. त्याच्यामुळेच मोर पूर्ण जगामध्ये पोहोचले आहेत. 

33) सापांना पकडण्याच्या आणि खाण्याच्या प्रवृत्तीमुळे गावातील लोक साधारणपणे मोर पाळतात. एकाप्रकारे मोर गावातील लोकांची रक्षा करतो.

34) मोराच्या सुंदर पंखांचा उपयोग पर्स, जाकेट आणि अनेक प्रकारच्या सजावटी सामानामध्ये केला जातो.

35) जंगलामध्ये मोरांना वाघापासून आणि जंगली जनावरांपासून धोका असतो. तर गावाजवळ राहणाऱ्या मोराना कुत्रा, मांजर आणि इतर जनावरांचा धोका असतो.

36) शिकार आणि राहाण्याच्या जागा यामुळे मोरांची संख्या हळूहळू कमी होत चालली आहे.

37) भारतामध्ये मोराला भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 नुसार पूर्णता संरक्षण दिले गेले आहे. याच्या शिकारीवर पूर्णता प्रतिबंद आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ):

मोराच्या आवाजाला काय म्हणतात?

केकारव

मोर काय खातो?

मोर हा एक सर्वाहारी पक्षी आहे. जो मुख्य रूपामध्ये अन्नधान्य, गवत, फळे, बिया, फुलांच्या पाकळ्या, मुंग्या, कीटक, उंदीर, पाल, साप इत्यादी खातो.

निष्कर्ष :

आजच्या या पोस्टमध्ये आपण मोर पक्षाविषयी माहिती (Peacock information in marathi) जाणून घेणार आहोत. मोर पक्षी माहिती मराठी (Mor pakshi mahiti marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Comment