Marathi

गरुड पक्षाविषयी माहिती | Eagle information in marathi

Eagle information in marathi : गरुड हा पक्षी शक्ती, स्वातंत्र आणि श्रेष्ठता याचे जिवंत प्रतीक म्हणून पूर्ण जगामध्ये ओळखला जातो. हा एक मोठ्या आकाराचा शिकारी पक्षी आहे जो Accipitridae कुटुंबातील सदस्य आहे. साधारणपणे गरूड पक्षाचे चार प्रकार पडतात. आजच्या या पोस्टमध्ये आपण गरुड पक्षाविषयी माहिती (Eagle information in marathi) जाणून घेणार आहोत.

Eagle information in marathi
गरुड पक्षाविषयी माहिती (Eagle information in marathi)

गरुड पक्षाविषयी माहिती (Eagle information in marathi)

1) जगभरामध्ये गरुड पक्षाच्या 60 पेक्षा अधिक प्रजाती आढळतात.

2) गरुड पक्षाच्या अधिकांश प्रजाती युरेशिया आणि आफ्रिकामध्ये आढळतात. या क्षेत्राच्या बाहेर फक्त 14 प्रजाती आहेत: उत्तर अमेरिकेमध्ये 2, दक्षिण अमेरिकेमध्ये 9 आणि ऑस्ट्रेलिया मध्ये 3.

3) गरुड पक्षांच्या प्रजाती नुसार त्यांचे आयुष्यमान 14 ते 35 वर्ष यामध्ये असते.

4) वातावरणानुसार गरुड पक्षाची लांबी वजन आणि आकार यामध्ये विविधता आढळून येते. जंगलामध्ये राहणाऱ्या गरूड पक्षाचे पंख कमी विस्ताराचे असतात. आणि मैदानी आणि मोकळ्या क्षेत्रांमध्ये राहणाऱ्या गरुडाचे पंख जास्त विस्तारित असतात.

5) व्यस्क या नर गरुडाचे वजन जवळजवळ 4.1 किलोग्रॅम असते.

6) गरुड पक्षाची सर्वात लहान प्रजाती दक्षिण निकोबार मधील  serpent eagle (Spilornis klossi) आहे. जीचे वजन 450 ग्रॅम आणि लांबी 40 सेंटीमीटर आहे.

7) लांबी आणि पंखाच्या विस्ताराच्या आधारावर Philippine eagle (Pithecophaga jefferyi) जगातील गरुडा ची सर्वात मोठी प्रजाती मानली जाते. Steller’s sea eagle आणि harpy eagle वजन आणि आकाराच्या मानाने सर्वात मोठी प्रजाती मानली जाते.

8) जगातील सर्वात जास्त वजन असलेला गरुड स्टेलर हा समुद्री गरुड (Steller’s sea eagle) आहे. ज्याचे वजन नऊ किलोपर्यंत असते.

9) गरुड पक्षाच्या सर्व ज्ञात प्रजातींपैकी मादी नराच्या तुलनेत आकाराने मोठी असते.

10) गरुडा ची मादी घरटे बनवण्यासाठी साहित्य गोळा करण्याचे काम करते.

गरुड पक्षी माहिती मराठी (Garud pakshi mahiti marathi)

11) गरुड हा दिनचर पक्षी आहे. याचा अर्थ की तो दिवसा दरम्यानची सर्वात जास्त सक्रिय असतो आणि संध्याकाळी झोपतो.

12) गरूड पक्षाचे डोळे वजनाने त्याच्या मेंदू पेक्षा मोठे असतात.

13) गरुड एकाप्रकारे डोळे बंद करून सुद्धा पाहू शकतो. कारण त्याच्या पापणीवर एक पडदा असतो. आणि ते आपल्या डोळ्याच्या सुरक्षेसाठी ते तो पडदा बंद करतात. परंतु त्याची मुख्य पापणी उघडी असते.

14) गरुड पक्षी सामान्यपणे एकटा राहतो. परंतु थंडीच्या वातावरणामध्ये जेव्हा अन्नाचा तुटवडा भासतो तेव्हा ते समूहामध्ये आढळून येतात.

15) गरुड पक्षाची दृष्टी मानवाच्या तुलनेमध्ये चार ते आठ पटीने चांगली असते. आणि त्यांच्या दृष्टीचे क्षेत्र सुद्धा व्यापक असते. गरुड 3.2 किलोमीटर दूर असलेला ससा सुद्धा पाहू शकतो. गरूड पक्षाचे डोळे मानवाच्या डोळ्याच्या आकाराचे असतात.

16) गरुड आपले डोळे जास्त प्रमाणात फिरवू शकत नाही. परंतु घुबडप्रमाणे तो आपले डोके 270 अंशा मध्ये फिरवू शकतो.

17) गरुड सूर्यप्रकाशा मधील अतिनील किरणे सुद्धा पाहू शकतो.

18) गरुड पक्षाची चोच मानवाच्या केस आणि नखा प्रमाणे तुटल्यानंतर सुद्धा परत येऊ शकते. असं यामध्ये आढळणाऱ्या केरातीन मुळे शक्य होते.

19) काही गरुड पक्षी आहाराच्या शोधामध्ये शेकडो किलोमीटर लांब जाऊ शकतात.

20) काही गरूड पक्षाचे पंख लहान आणि शेपूट लांब असते. त्यामुळे गरुड पक्षाला जंगलामध्ये शिकार करण्यासाठी फायदा होतो.

गरुड पक्षाविषयी माहिती (Eagle information in marathi)

21) गरुड मांसाहारी असतो. याचाच अर्थ ते फक्त मांस सेवन करतात. ते आपले भोजन शिकार करूनच मिळवतात. त्यांच्या आहारामध्ये मासा, ससा, उंदीर आणि कधीकधी हळू गतीने उडणारे पक्षी, साप, मुंगूस सामील असतात. गरुड पक्षाच्या काही प्रजाती आधीच मेलेले मासे आणि जनावर सुद्धा खातात.

22) गरुड पक्षाला दररोज खाण्याची आवश्यकता नसते. त्याच्याकडे एक विशेष पाचक अंग Crop असतो. गरुड पक्षी यामध्ये मोठ्या प्रमाणावर भोजन संग्रहित करून ठेवू शकतो. हे भोजन तो अशा वेळी वापरतो, ज्यावेळी त्याला भोजन उपलब्ध होत नाही.

23) साधारणपणे गरुडपक्षी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करत नाही. तो प्रत्येक वर्षी एकाच घरट्याचा उपयोग करतो. साधारणपणे गरुड पक्षी प्रवास करेल की नाही हे यावर अवलंबून असते की त्याचे वय काय आहे, आणि तो कोणत्या ठिकाणी निवास करत आहे आणि तेथे किती भोजन उपलब्ध आहे.

24) गरुड पक्षी साधारणपणे उंच झाडावर आपले घरटे बनवतो. गरुडाच्या घरट्याला Eyries म्हणतात. नर आणि मादी दोघे मिळून घरटे बनवतात. गरुड पक्षाच्या घरट्याचा आकार खूप मोठा असतो.

25) स्कँडिनेव्हिया मध्ये काही गरुड पक्ष्यांची घरटी इतकी मोठी असतात की त्यांच्या वजनाने झाड मोडते.

26) गरुड पक्षाच्या अनेक प्रजाती एक ते तीन अंडी देतात. नर आणि मादी दोघेही अंडी उबवतात. परंतु मादीच्या तुलनेने नर यामध्ये जास्त वेळ व्यस्त असतो.

27) गरुड पक्षाच्या अंड्यामधून पिल्ले बाहेर येण्यासाठी 35 दिवसाचा वेळ लागतो. गरुडाच्या पिल्लाला Eaglet म्हणतात.

28) गरुड पक्षाची पिल्ले खूप वेगाने विकसित होतात. जन्माच्या सहा आठवड्यानंतर त्यांचे वजन तीन ते चार किलोपर्यंत होते.

29) गरुड पक्षाचा पिल्लांना आपली नखे वाढवण्यासाठी खूप दिवस लागतात.

30) गोल्डन ईगल 320 किलोमीटर प्रति तास या वेगाने हवेमध्ये उडू शकतो.

गरुड पक्षी माहिती (Garud pakshi mahiti marathi)

31) कोणत्याही हवेमध्ये उडणाऱ्या पक्षा मध्ये सर्वात जास्त वजन उचलून उडणाऱ्या पक्षाचा रेकॉर्ड Bald Eagle च्या नावावर आहे. त्याने 6.8 किलोच्या हरणाच्या पिल्लाला घेऊन हवेमध्ये उड्डाण केले होते.

32) गरुड पक्षी द्वारे केलेली सर्वात मोठी शिकार Duiker हरिणाची होती, ज्याचे वजन 37 किलो ग्रॅम होते.

33) गरुड पक्षाच्या दोन्ही पंखामध्ये मिळून 7000 पिसे असतात.

34) अनेक देशांमध्ये गरुड पक्षाला सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. यामुळेच काही देशांच्या ध्वजामध्ये याला स्थान दिले आहे.

35) गरुड पक्षाचा उपयोग अनेक वेळा पोलिस आणि सैन्य यांनी केला आहे.

36) समुद्री गरुड पक्षाचे मुख्य आहार मासे असते.

37) बुटेड गरुडाचे पंख (Booted Eagle) पायाच्या खाली सुद्धा वाढतात, आणि ते पायाची बोटे झाकतात.

38) साप गरुड (Snake Eagles) हे साधारणपणे सापाची शिकार करतात.

39) हरपी गरुड (Harpy Eagle) हे सर्वात मोठे गरुड आहेत, जे उष्णकटिबंधीय जंगलांमध्ये आढळतात.

निष्कर्ष :

आजच्या या पोस्टमध्ये आपण गरुड पक्षाविषयी माहिती (Eagle information in marathi) जाणून घेतली. गरुड पक्षी माहिती मराठी (Garud pakshi mahiti marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Related Posts

Peacock information in marathi

मोर पक्षाविषयी माहिती | Peacock information in marathi

Peacock information in marathi : मोर हा पृथ्वीवरील सर्वात सुंदर पक्षांमधील एक पक्षी आहे. हा मध्यम आकाराचा एक रंगीन पक्षी आहे, जो तितर परिवाराशी (Pheasant) संबंधित आहे. मोराचे…

Indian states information in marathi

भारतातील राज्यांची माहिती | Indian states information in marathi

Indian states information in marathi : आपला भारत देश 29 घटक राज्ये आणि 7 केंद्रशासित प्रदेश मिळून बनलेला आहे. हे आपल्याला तर माहीतच आहे. पण भारतातील अनेक राज्यांची आपल्याला माहिती…

Top 10 highest tea producing states in India in marathi

भारतातील सर्वात जास्त चहा उत्पादन करणारी राज्ये | Top 10 highest tea producing states in India in marathi

Top 10 highest tea producing states in India in marathi : मित्रांनो 2021 च्या एका अहवालानुसार चहा उत्पादनांमध्ये आपला भारत देश देशानंतर दुसऱ्या क्रमांकावर येतो. आपल्या भारत देशाने…

10 birds information in marathi

दहा पक्षांविषयी माहिती | 10 birds information in marathi

10 birds information in marathi : मित्रांनो जगभरामध्ये अनेक प्रकारचे पक्षी आढळतात. ज्यांचे विषयी आपल्याला खूपच थोडी माहिती माहीत असते. आणि अनेक लोकांना या पक्षांविषयी माहिती जाणून घेण्याची…

Butterfly information in marathi

फुलपाखरा विषयी माहिती | Butterfly information in marathi

Butterfly information in marathi : फुलपाखरू हा एक कीटक वर्गामध्ये मोडला जाणारा जीव आहे. जो आपल्याला विविध रंगांमध्ये आढळून येतो. आणि आपण त्याच्याकडे आकर्षित होतो. हा सुंदर कीटक…

Cycle information in marathi

सायकल ची माहिती मराठी | Cycle information in marathi

Cycle information in marathi : सायकल ची माहिती मराठी : सायकलचा इतिहास खूप जुना आहे. आजच्या काळात लोकांकडे कार-बाइक अशी स्वयंचलित वाहने आल्यामुळे सायकलचा उपयोग कमी झाला आहे….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *