स्नॅपचॅट ॲप विषयी माहिती | Snapchat information in marathi

Snapchat information in marathi : स्नॅपचॅट ॲप बद्दल तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. कारण आजच्या काळात हे एक प्रसिद्ध ॲप बनलेले आहे. याचा अंदाज तुम्ही यावरून लावू शकता की आता बॉलीवूड पासून ते अनेक मोठमोठे सेलिब्रिटी याचा वापर करत आहेत. आणि आपले व्हिडिओ लोकांपर्यंत शेअर करत आहेत. आजच्या या पोस्टमध्ये आपण स्नॅपचॅट ॲप विषयी माहिती (Snapchat information in marathi) जाणून घेणार आहोत.

Snapchat information in marathi

स्नॅपचॅट ॲप विषयी माहिती (Snapchat information in marathi)

आता आपण स्नॅपचॅट काय आहे हे जाणून घेऊ या. तर मित्रांनो स्नॅपचॅट हे एक सोशल नेटवर्किंग ॲप आहे. फेसबूक, ट्विटर, व्हाट्सअप, यूट्यूब, इंस्टाग्राम यांसारख्या नेटवर्किंग ॲप प्रमाणेच हेसुद्धा एक ॲप आहे. तुम्हाला तर माहीतच आहे की यांसारख्या ॲपचा वापर आपण वेगवेगळ्या प्रकारे करतो. त्याचप्रमाणे स्नॅपचॅट ॲप चा वापर करून आपण फोटो आणि व्हिडिओ एकमेकांना पाठवू शकतो.

परंतु स्नॅपचॅट हे ॲप इतर सोशल नेटवर्किंग ॲप सारखे नाही. कारण या मधून जो फोटो किंवा व्हिडिओ आपण दुसऱ्याला पाठवतो तो फोटो किंवा व्हिडिओ ठराविक काळानंतर तिथून निघून जातो. याबरोबरच यामध्ये अनेक मजेशीर पर्याय आहेत.  यामध्ये आपण इंस्टाग्राम प्रमाणेच स्नॅप स्टोरी (Snap story) टाकू शकतो. आणि हि स्टोरी सुद्धा चोवीस तासानंतर निघून जाते.

स्नॅपचॅट चा इतिहास (Snapchat history in marathi)

आता आपण जाणून घेऊया की स्नॅपचॅट ची सुरुवात कशी झाली. स्नॅपचॅट या ॲप ला Evan Spiegel, Bobby Murphy आणि Reggie Brown या तीन मित्रांनी 2011 मध्ये आयओएस युजर्ससाठी सुरू केले होते. हे तिघेही मित्र स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटी मध्ये शिकत होते. फोटो पाठवल्यानंतर तो स्वयंचलितपणे निघून जाणे ही आयडिया Reggie Brown याला आवडली.

त्यानंतर त्याने ही आयडिया Evan Spiegel याला सांगितली. कारण त्याला बिजनेस विषयी चांगला अनुभव होता. काही काळानंतर या दोन मित्रांनी Bobby Murphy याला आपल्या टीम मध्ये सामील करून घेतले. कारण तो एक ॲप डेव्हलपर होता. यानंतर या तिघांनी मिळून काही महिने काम करून 6 जुलै 2011 मध्ये स्नॅपचॅट या ॲपला Pikabu नावाने लॉन्च केले.

याच्या काही काळानंतर Evan आणि Murphy यांनी Brown याला आपल्या कंपनी मधून काढून टाकले. आणि त्यानंतर सप्टेंबर 2011 मध्ये याचे Pikabu हे नाव बदलून स्नॅपचॅट ठेवले गेले.

स्नॅपचॅट वर अकाउंट कसे उघडावे?

  • सर्वात पहिल्यांदा आपल्याला प्लेस्टोर वरती जाऊन किंवा स्नॅपचॅट च्या ऑफिशिअल वेबसाईट वरून स्नॅपचॅट हे ॲप डाऊनलोड करावे लागेल.
  • त्यानंतर स्नॅपचॅट ॲप ओपन करावे लागेल आणि त्यामधील न्यू स्नॅपचॅट अकाऊंट साठी साइन अप करावे लागेल.
  • त्यानंतर आपण आपले नाव टाकून Sign Up आणि Accept वर क्लिक करावे.
  • त्यानंतर आपल्याला आपली जन्मतारीख टाकावी लागेल.
  • त्यानंतर ते आपल्याला एक युजरनेम निवडायला सांगेल. मग आपण त्यामधून एक युजरनेम निवडू शकतो.
  • त्यानंतर आपल्याला स्नॅपचॅट अकाउंट साठी एक पासवर्ड ठेवायला सांगेल. आणि त्यानंतर आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकावा लागेल.
  • हे केल्यानंतर आपल्याला आपल्या मोबाईल नंबर वर ती एक कन्फर्मेशन कोड येईल. तो आपल्याला त्या ठिकाणी टाकावा लागेल.
  • आता आपले स्नॅपचॅट अकाउंट पूर्ण झालेले दिसेल. आता आपण आपले युजरनेम आणि पासवर्ड टाकून स्नॅपचॅट लॉग इन करू शकतो.

स्नॅपचॅट विषयी काही रोचक तथ्य (Snapchat facts in marathi)

1) मे 2012 पर्यंत स्नॅपचॅट ॲप वर प्रति सेकंदाला 25 फोटो शेअर केले जात होते. नोव्हेंबर 2012 पर्यंत स्नॅपचॅट वापरकर्त्यांनी आयओएस ॲप वर एक अब्ज पेक्षा जास्त फोटो शेअर केले होते. तेव्हा जर रोज वीस लाख फोटो शेअर केले जात होते.

2) 29 ऑक्टोंबर 2012 मध्ये स्नॅपचॅट ॲपने अँड्रॉइडसाठी ॲप लॉन्च केले होते.

3) जून 2013 मध्ये स्नॅपचॅट आवृत्ती 5.0 आली होती ज्याला बँको असे नाव दिले गेले होते, जे आयओएस साठी प्रसिद्ध झाले.

4) स्नॅपचॅटच्या प्रकाशित आकडेवारीनुसार, मे 2015 पर्यंत ॲपचे वापरकर्ते दररोज 2 अब्ज व्हिडिओ शेअर करत होते, जे नोव्हेंबरपर्यंत 6 अब्जांपर्यंत पोहोचले.

5) फेब्रुवारी 2017 मध्ये स्नॅपचॅटचे दररोज 160 दशलक्ष सक्रिय वापरकर्ते होते.

6) डिसेंबर 2019 मध्ये स्नॅपचॅट ऍपने त्या वर्षातील पाच सर्वात जास्त डाऊनलोड केलेल्या ॲपमध्ये स्नॅपचॅट असल्याची घोषणा केली.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

1) स्नॅपचॅट कोणत्या देशाचे आहे?
उत्तर : अमेरिका

2) स्नॅपचॅट ॲप फ्री आहे का?
उत्तर : हो.  स्नॅपचॅट हे एक फ्री ॲप आहे.

3) स्नॅपचॅट ॲप किती भाषांमध्ये उपलब्ध आहे?
उत्तर : 37 भाषांमध्ये.

4) स्नॅपचॅट हे ॲप कोणी बनवले आहे?
उत्तर : Evan Spiegel, Bobby Murphy आणि Reggie Brown.

निष्कर्ष

आजच्या या पोस्टमध्ये आपण स्नॅपचॅट ॲप विषयी माहिती (Snapchat information in marathi) जाणून घेतली. स्नॅपचॅट माहिती मराठी (Snapchat mahiti marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Comment