पेंग्विन विषयी माहिती | Penguin information in marathi

Penguin information in marathi : पेंग्विन पक्षी आहे परंतु तो उडू शकत नाही. याला तुम्ही अनेक वेळेला डिस्कवरी चैनल वर नक्कीच पाहिले असेल. आणि तुम्हाला याबद्दल जाणून घ्यायची इच्छा नक्कीच झाली असेल. आजच्या या पोस्टमध्ये आपण पेंग्विन विषयी माहिती (Penguin information in marathi) जाणून घेणार आहोत. 

Penguin information in marathi
पेंग्विन विषयी माहिती (Penguin information in marathi)

पेंग्विन विषयी माहिती (Penguin information in marathi):

1) पेंग्विन एक पक्षी आहे परंतु तो हवेमध्ये उडू शकत नाही. 

2) पेंग्विन पक्षाच्या जवळजवळ 17 प्रजाती आहेत परंतु त्यामधील 13 प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. 

3) पेंग्विन पक्षी दक्षिण आफ्रिका, अंटार्टिका, चिली, न्युझीलँड, अर्जेंटिना आणि ऑस्ट्रेलिया मध्ये आढळतो. 

4) पेंग्विन पक्षी बर्फाळ प्रदेशात सुद्धा आढळतो. 

5) पेंग्विन पक्षी कमीत कमी वीस मिनिटे आपला श्वास रोखून धरू शकतो. 

6) दरवर्षी 25 एप्रिल हा दिवस जागतिक पेंग्विन दिवस (World penguin day) म्हणून साजरा केला जातो. 

7) पेंग्विन या पक्षाला दात नसतात. परंतु तो आपली शिकार खाण्यासाठी आपल्या चोचीचा उपयोग करतो. 

8) पेंग्विन एक मांसाहारी पक्षी आहे. आणि हा पक्षी आपले संपूर्ण अन्न समुद्रापासून मिळवतो. 

9) पेंग्विन पक्षी सामान्यपणे आपल्या आहारात झिंगा, खेकडे आणि मासे खातो. आणि तो आपल्या आहारासोबत दगड सुद्धा खातो. कारण दगड त्याच्या अन्नाला पचण्यासाठी मदत करतात. 

10) पेंग्विन पक्षी पाण्यामध्ये पोहु सुद्धा शकतो. पेंग्विन पक्षी पाण्यामध्ये जवळजवळ 900 फूट खोल पर्यंत पोहू शकतो. 

पेंग्विन पक्षी माहिती मराठी (Penguin pakshi mahiti marathi)

11) एक वयस्क पेंग्विन डुबकी लावून एका वेळेस 30 मासे पकडू शकतो. 

12) पेंग्विन पक्षी समुद्राचे खारे पाणी सुद्धा पिऊ शकतो. कारण त्याच्याजवळ एक विशेष प्रकारची ग्रंथी असते. जी त्याच्या रक्तप्रवाह मधून मीठ गाळण्याचे काम करते. 

13) पेंग्विन पक्षाचे पंख दरवर्षी एका वेळेस नष्ट होतात. त्याला नवीन पंख येण्यास काही वेळ सुद्धा लागतो. तोपर्यंत हे पक्षी आपला वेळ जमिनीवर आणि बर्फावर घालवतात. 

14) पेंग्विन पक्षी पाण्यामध्ये पंधरा किलोमीटर प्रति तास या वेगाने पोहू शकतो. 

15) पेंग्विन पक्षाचे पांढरे आणि काळ्या रंगाचे केस असतात. 

16) पेंग्विन पक्षी आपले अर्धे जीवन पाण्यामध्ये घालवतो. 

17) पेंग्विन पक्षी हा एक अंडी देणारा पक्षी आहे. 

18) पेंग्विन पक्षी आपल्या पायाच्या मदतीने चालतो. आणि बर्फामध्ये तो आपल्या पोटाच्या मदतीने घसरतो. 

19) पेंग्विन पक्षाची सर्वात मोठी प्रजाती एम्परर पेंग्विन आहे. आणि त्याची उंची तीन फूट असते. त्याचे वजन जवळजवळ 35 किलोपर्यंत असते. 

20) पेंग्विन पक्षाची सर्वात लहान प्रजाती लिटल ब्ल्यू पेंग्विन आहे. ज्याची उंची 16 इंच आणि वजन एक किलोपर्यंत असते. 

पेंग्विन विषयी माहिती (Penguin information in marathi)

21) पेंग्विन साधारणपणे 15 ते 20 वर्षांपर्यंत जगतो. 

22) पेंग्विन हा पक्षी जवळजवळ चाळीस मिलियन वर्षापासून आहे. 

23) पेंग्विन हा पक्षी ताजे पाणी मिळवण्यासाठी कधी कधी बर्फ सुद्धा खातो. 

24) पेंग्विन पक्षाच्या समूहाला colonies किंवा rookery म्हणतात. 

25) पेंग्विन पक्षाची पाहण्याची क्षमता जमिनीच्या तुलनेने पाण्यामध्ये जास्त असते. असंही मानलं जातं की पेंग्विन पक्षी पृथ्वीवर जास्त लांब नंतर पाहू शकत नाही. 

26) पेंग्विन पक्षाच्या काही प्रजाती राहण्यासाठी घरटे बांधतात. त्यासाठी ते लहान-लहान दगडांचा वापर करतात.  

27) पेंग्विन पक्षी एक दुसऱ्याला बोलवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढतो. 

28) पेंग्विन पक्षाचा आकार आणि वजन याच्या तुलनेने इतर पक्षांपेक्षा पेंग्विन पक्षाची अंडी खूप लहान असतात. 

29) पेंग्विन पक्षी माणसांना कधीच भित नाहीत. कारण ते माणसांमध्ये स्वतःला जास्त सुरक्षित मानतात. 

30) पेंग्विन दिसायला खुप सुंदर दिसतो. परंतु तो एक चिंतेचा विषय बनत चालला आहे, कारण त्यांची संख्या हळूहळू कमी होत चालली आहे. 

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ):

पेंग्विन काय खातो?

पेंग्विन पक्षी सामान्यपणे आपल्या आहारात झिंगा, खेकडे आणि मासे खातो. आणि तो आपल्या आहारासोबत दगड सुद्धा खातो. कारण दगड त्याच्या अन्नाला पचण्यासाठी मदत करतात. 

पेंग्विन पक्षाचे वैज्ञानिक नाव काय आहे?

स्फेनिस्किडे

पेंग्विन पक्षाचा जीवनकाळ किती असतो?

15 ते 20 वर्ष

निष्कर्ष :

आजच्या या पोस्टमध्ये आपण पेंग्विन विषयी माहिती (Penguin information in marathi) जाणून घेतली. पेंग्विन पक्षी माहिती मराठी (Penguin pakshi mahiti marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा. 

Leave a Comment