भारतातील 10 सर्वात श्रीमंत मंदिरे | Top 10 richest temples in India

Top 10 richest temples in India : मित्रांनो आपला भारत देश हा पुर्ण जगामध्ये आपली आध्यात्मिक संस्कृती, परंपरा, चालीरीती, श्रद्धा यामुळे ओळखला जातो. कारण आपल्या भारत देशामध्ये सर्वात जास्त श्रद्धाळू लोक आहेत. आपल्या भारत देशातील लोकांची देवाबद्दल जी श्रद्धा आहे ती म्हणजे लोक त्यासाठी काहीही करू शकतात.

याच प्रमाणे आपल्या भारत देशामध्ये अनेक मंदिरे आहेत. आणि ज्या मधील काही मंदिरे सर्वात श्रीमंत मंदिरे म्हणून ओळखली जातात. कारण येथे येणारे भाविक त्या मंदिरासाठी दान म्हणून काही देणगी देत असतात. आणि ही देणगी अनेक मंदिरांमध्ये लाखो रुपयांमध्ये गोळा होते. आजच्या या पोस्टमध्ये आपण भारतातील 10 सर्वात श्रीमंत मंदिरे (Top 10 richest temples in India) जाणून घेणार आहोत.

Top 10 richest temples in India
भारतातील 10 सर्वात श्रीमंत मंदिरे (Top 10 richest temples in India)

भारतातील 10 सर्वात श्रीमंत मंदिरे (Top 10 richest temples in India)

10) सोमनाथ मंदिर

सोमनाथ मंदिर हे भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये दहाव्या क्रमांकावर येते. सोमनाथ मंदिर हे भारताच्या गुजरात राज्यामध्ये स्थित आहे. हे म्हणजे गुजरात राज्याच्या पश्चिम किनार्‍यावर म्हणजेच वेरावळ बंदराजवळ प्रभास पाटण मध्ये आहे. गुजरात मधील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून या मंदिराला ओळखले जाते.
भगवान शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी हे पहिले मंदिर आहे असे मानले जाते. 

हे मंदिर भगवान शंकराला समर्पित आहे. परकिय आक्रमणांनी हे मंदिर सतरा वेळा तोडले आणि लुटले गेले होते परंतु तरीही हे मंदिर आज भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरामध्ये दहाव्या क्रमांकावर आहे. सोमनाथ मंदिर हे स्थापत्यकलेचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. हे मंदिर पाहण्यासाठी दरवर्षी लाखो लोक येथे येतात. सोमनाथ मंदिरामध्ये आज सुद्धा मोठ्या प्रमाणावर सोने राखुन ठेवलेले आहे.

9) काशी विश्वनाथ मंदिर

काशी विश्वनाथ मंदिर हे भारताच्या उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये स्थित आहे. भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये काशी विश्वनाथ मंदिर हे नवव्या क्रमांकावर येते. हे मंदिर वाराणसी या शहरांमध्ये गंगा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. वाराणसी हे हिंदू धर्माचे एक पवित्र तिर्थ स्थळ आणि पर्यटन स्थळ आहे असे मानले जाते. हे पर्यटन स्थळ फक्त भारतीय लोकांनाच नाही तर परदेशातील लोकांना सुद्धा आपल्याकडे आकर्षित करते. 

काशी विश्वनाथ मंदिराची सुद्धा अनेक वेळा लूट करण्यात आली होती. दर वर्षी या मंदिराच्या दानपेटी मध्ये चार ते पाच करोड रुपये जमा होतात. काशी विश्वनाथ मंदिराची नेटवर्थ ही पाच ते सहा करोड रुपये आहे असे सांगितले जाते. 

 

8) जगन्नाथ मंदिर

जगन्नाथ मंदिर हे भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये आठव्या क्रमांकावर येते. हे मंदिर भारतातील उडीसा राज्यामध्ये पुरी शहरामध्ये स्थित आहे. हिंदू धर्माच्या मानाच्या सर्वात प्रसिद्ध चार 10 धाम तीर्थक्षेत्रांपैकी जगन्नाथ मंदिर हे एक तीर्थक्षेत्र आहे. या मंदिराचा विस्तार हा तीस एकर मध्ये पसरलेला आहे. जगन्नाथ मंदिरामध्ये दर्शनासाठी दररोज 30 हजार पेक्षा जास्त लोक येतात. 

याबरोबरच अनेक वेळा उत्सवांमध्ये या मंदिरामधील मुर्त्या या 209 किलो सोन्याने साजवल्या जातात. यामुळे या मुर्त्या खूप सुंदर दिसतात. 2010 मध्ये या मंदिराचे बँकेमध्ये 150 करोड रुपये होते.

 

7) मीनाक्षी मंदिर

मीनाक्षी मंदिर हे भारताच्या तमिळनाडू राज्यामध्ये स्थित आहे. भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये मीनाक्षी मंदिर हे सातव्या क्रमांकावर येते. मीनाक्षी मंदिर हे तमिळनाडूच्या मदुराई या शहरांमध्ये स्थित आहे. दररोज वीस ते तीस हजार भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. 

मिनाक्षी तिरूकल्याण या मंदिरामध्ये दरवर्षी एप्रिल महिन्यामध्ये दहा दिवसांचा एक मोठा उत्सव भरवला जातो. या उत्सवासाठी दहा लाखापेक्षा जास्त लोक येत असतात. मिनाक्षी मंदिराला दरवर्षी सहा कोटी पेक्षा जास्त डोनेशन दिले जाते.

 

6) गोल्डन टेम्पल

भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये गोल्डन टेम्पल हे सहाव्या क्रमांकावर येते. गोल्डन टेम्पल हे शीख धर्मातील सर्वात मोठे गुरुद्वार आहे. हे गुरुद्वार हरविंदर साहब गुरुद्वार या नावाने सुद्धा ओळखले जाते. भारतातील पंजाब राज्य मधील अमृतसर येथे हे मंदिर स्थित आहे. 

या मंदिराला स्वातंत्र्याचे प्रतिक म्हणून सुद्धा ओळखले जाते. गोल्डन टेम्पल पाहण्यासाठी दररोज 40 हजार पेक्षा जास्त लोक येतात. गोल्डन टेम्पल मध्ये दररोज येणाऱ्या भाविकांसाठी लंगरचा  प्रसाद दिला जातो. गोल्डन टेम्पल या मंदिराचे वार्षिक उत्पन्न शंभर करोड पेक्षा जास्त आहे.

 

5) सिद्धिविनायक मंदिर

सिद्धिविनायक मंदिर हे भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये पाचव्या क्रमांकावर येते. अनेक लोकांना या मंदिराबद्दल माहीत असेल. कारण हे मंदिर मुंबई शहरामध्ये स्थित आहे. सिद्धीविनायक मंदिरांमध्ये असलेली गणेशाची मूर्ती ही दोनशे वर्षे पेक्षा जुनी आहे असे मानले जाते. सिद्धिविनायक मंदिरामध्ये दररोज दोन लाखापेक्षा जास्त लोक दर्शनासाठी येत असतात. 

या मंदिरामध्ये गणपतीच्या मूर्तीवर जे डोम बसवलेले आहे ते साधारणपणे चार किलो शुद्ध सोन्याने बनवलेले आहे. या सिद्धिविनायक मंदिराचे वार्षिक उत्पन्न 50 ते 125 करोड रुपये इतकी आहे असे सांगितले जाते.

 

4) वैष्णवी देवी माता मंदिर

वैष्णवी देवी माता मंदिर हे जम्मू मधील कटरा या शहरांमध्ये स्थित आहे. भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये हे मंदिर चौथ्या क्रमांकावर येते. हिमालयाच्या पर्वतामध्ये असलेले हे मंदिर हिंदू धर्मातील एक प्रसिद्ध मंदिर आहे. वैष्णवी देवी लाच दुर्गा देवीचा एक अवतार समजला जातो. 

वैष्णवी देवी माता मंदिराचे दर्शन घेण्यासाठी आपल्याला कटरा या गावापासून पंधरा किलोमीटर अंतर घाट पायी चालावा लागतो. इतका लांब घाट चढून सुद्धा दरवर्षी 80 लाख भाविक येथे येत असतात. वैष्णवी देवी माता मंदिराचे वार्षिक उत्पन्न आहे 500 करोड पेक्षा जास्त आहे.

 

3) साईबाबा मंदिर

भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये साईबाबा मंदिर हे तिसर्‍या क्रमांकावर येते. महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यामधील शिर्डी या गावांमध्ये हे साईबाबा मंदिर स्थित आहे. साईबाबांनी या छोट्या गावाला आपल्या भक्तांसाठी पवित्र तीर्थ क्षेत्रात रूपांतर केले आहे. निस्वार्थ प्रेम आणि गरिबांच्या समरपणामुळे त्यांना खूप आदर मिळाला आहे. आणि त्यामुळेच त्यांची पूजा केली जाते.
साईबाबा मंदिराचे दर्शन घेण्यासाठी सर्व धर्माचे भाविक येत असतात.

साईबाबा मंदिरामध्ये बत्तीस करोड रूपयांचे सोने आणि चांदी आहे. ज्या सिंहासनावर साईबाबा विराजमान आहेत ते सिंहासन 94 किलो शुद्ध सोन्याने बनवलेले आहे. साईबाबा मंदिराचे वार्षिक उत्पन्न आहे 360 करोड रुपये आहे.

 

2) तिरुपती व्यंकटेश्वर मंदिर

तिरूपती तिरूमला वेंकटेश्वर मंदिर हे भारतातील आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये स्थित आहे. भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये तिरुपती व्यंकटेश्वर मंदिर दुसऱ्या क्रमांकावर येते. आंध्रप्रदेश राज्यातील तिरुपती या शहरातील तिरुमला या हिल्स जवळ हे मंदिर स्थित आहे. हे मंदिर वेंकटेश्वर यांना समर्पित आहे. वेंकटेश्वर हे भगवान विष्णूचे रूप आहे. 

या मंदिराला भूलोक वैकुंठ असेसुद्धा म्हटले जाते. या मंदिरामध्ये असलेल्या व्यंकटेश्वरा च्या मुर्तीला 1000 किलो सोन्याने सजवले जाते. तिरुपती व्यंकटेश्वर या मंदिरामध्ये दररोज दर्शनासाठी 50 हजार पेक्षा जास्त लोक येत असतात. या मंदिरामध्ये फक्त लाडू विकून 75 करोड रुपये पेक्षा जास्त पैसे गोळा होतात. या मंदिराला एका वर्षामध्ये जवळजवळ सहाशे पन्नास करोड रुपये डोनेशन मिळते.

 

1) पद्मनाभस्वामी मंदिर

भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये पद्मनाभस्वामी मंदिर हे पहिल्या क्रमांकावर येते. हे मंदिर भारतातील केरळ राज्यांमध्ये स्थित आहे. केरळ राज्यातील तिरुअनंतपुरम या शहरांमध्ये हे मंदिर स्थित आहे. हे मंदिर भगवान विष्णू यांना समर्पित आहे. या मंदिरामध्ये भगवान विष्णूची संपूर्ण सोन्याची मूर्ती आहे.  या मूर्तीची किंमत ही 500 करोड रुपये आहे असे सांगितले जाते. 

पद्मनाभस्वामी या मंदिराला भारतातील सर्वात चमत्कारीक मंदिर म्हणून सुद्धा ओळखले जाते. पद्मनाभस्वामी मंदिराचे वार्षिक उत्पन 90 हजार करोड रुपये इतके आहे.

आजच्या या पोस्टमध्ये आपण भारतातील 10 सर्वात श्रीमंत मंदिरे (Top 10 richest temples in India) यांची जाणून घेतली.

 

निष्कर्ष

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण भारतातील 10 सर्वात श्रीमंत मंदिरे (Top 10 richest temples in India) यांची जाणून घेतली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

Leave a Comment