Marathi

कुरियर म्हणजे काय | Courier information in marathi

Courier information in marathi : कुरियर हा शब्द तुम्ही नक्कीच ऐकला असेल. परंतु समाजामध्ये असे अनेक लोक आहेत त्यांना कुरियर बद्दल जास्त माहिती नाही. तुम्हाला माहीत असेल की भारतामध्ये फ्लिपकार्ट ॲमेझॉन यासारख्या कंपन्या त्यांचे प्रॉडक्ट लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी याच कुरियर चा वापर करतात. आजच्या या पोस्टमध्ये आपण कुरियर विषयी माहिती (Courier information in marathi) जाणून घेणार आहोत.

What is courier in marathi
कुरियर विषयी माहिती (Courier information in marathi)

कुरियर म्हणजे काय (What is courier in marathi)

कुरियर म्हणजेच टपाल सेवा. कुरियर की एक अशी सेवा आहे जी कोणालाही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कोणत्याही वस्तू पाठवण्याची अनुमती देते. कुरिअर पाठविण्यासाठी आपल्याला अनेक ऑफिस भेटतात. तेथे जाऊन आपण याबद्दल अधिक चौकशी करू शकतो. कुरियर की सेवा मोठ्या प्रमाणात माल आणि महत्त्वाची कागदपत्रे खूप वेगाने पाठवण्याची सुविधा देते. कुरियर ही सेवा लोकल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा केली जाते.

कुरिअर सर्व्हिस विकसित होण्यामध्ये तिचा वेग आणि तिची सुरक्षा महत्त्वाची भूमिका बजावते. परंतु यासाठी आपल्याला कंपनीमध्ये सामान्य डाकाच्या तुलनेने थोडी रक्कम जास्त द्यावी लागते. परंतु कुरिअर कंपन्या वजनदार सामान खूप वेगाने पोहोचवतात. जेव्हापासून ऑनलाइन खरेदीला सुरुवात झाली तेव्हापासून कुरियर सेवेची लोकप्रियता वाढत गेली. कारण ऑनलाईन विक्रेत्यांना आपल्या वस्तू ची ऑर्डर आणि वस्तू वेळेत पोहोचवण्यासाठी कुरियर सेवा खूप उपयुक्त ठरते. कुरिअर विषयी माहिती (Courier information in marathi) आता आपण जाणून घेतली.

कुरियर कसे पाठवले जाते (How to send a courier in Marathi)

  • कुरियर पाठवणे खूप सोपे असते. जर तुम्हाला याबद्दल माहिती नसेल टायटी आता आपण जाणून घेऊ.
  • सर्वात पहिल्यांदा जे सामान आपल्याला कुरियर साठी पाठवायचे आहे ते एका बॉक्समध्ये पॅक करून घ्यावे. जर काही लेटर वगैरे टाकायचे असेल तर त्या बॉक्स मध्ये टाकावे.
  • आता आपल्याला जो बॉक्स किंवा लिफाफा कुरियर ने पाठवायचा आहे, त्यावर ज्याला आपल्याला कुरियर पाठवायचे आहे त्याचा पत्ता टाकावा. त्याचा पत्ता टाकताना त्याचे नाव, त्याच्या घराचा पूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आणि मोबाईल नंबर सुद्धा टाकावा.
  • लिफाफा च्या खालच्या कोपऱ्यामध्ये आपण आपले नाव, आपला पत्ता आणि मोबाईल नंबर टाकावा.
  • आता आपल्याला जे कुरियर पाठवायचे आहे ते घेऊन शहरातील कोणत्याही कुरियर ऑफिस मध्ये जावे लागेल. जेव्हा आपण आपले कुरियर पाठवण्यासाठी ऑफिस मध्ये देऊ, तेव्हा ते आपल्याला एक Docket Number देतील. या Docket नंबर च्या आधारावर आपण आपले कुरियर कोठे गेले आहे हे पाहू शकतो.
  • हा Docket Number खूप महत्त्वाचा असतो, कारण जर आपले कुरियर त्या पत्त्यावर पोहोचले नाही तर, आपण आपला Docket Number दाखवून त्या ऑफिस मध्ये याविषयी माहिती घेऊ शकतो. त्यामुळे हा नंबर जपून ठेवावा.

भारतामध्ये कुरियर सर्विस देणाऱ्या कंपन्या (Courier services companies in India)

  • DHL
  • FEDEX
  • BLUE DART EXPRESS
  • DCART
  • DTDC
  • VRL COURIER SERVICE
  • ECOM EXPRESS PVT LTD

याशिवाय अनेक स्थानिक कुरिअर कंपन्या पूर्ण भारतामध्ये काम करत आहेत.

पोस्ट ऑफिस मधून कुरियर कसे पाठवावे?

  • दीडशेपेक्षा अधिक वर्षापासून पोस्ट ऑफिस आपल्या सेवेसाठी सदैव तयार असते. उदाहरणासाठी समजा तुम्हाला एक पत्र कुरियर म्हणून पाठवायचे आहे, त्यासाठी पुढील पद्धती आहेत :
  • सर्वात पहिल्यांदा आपल्याला जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जावे लागेल.
  • पोस्ट ऑफिस मधून आपल्याला एक लिफाफा खरेदी करावा लागेल, आणि आपल्याला जे सामान कुरियरने पाठवायचे आहे ते त्या लिफाफा मध्ये टाकावे. आणि तो लिफाफा चिकटवावा. आणि त्याच्या वरती स्पीड पोस्ट असे लिहावे.
  • लिफाफा त्याच्या डाव्या बाजूला आपल्याला ज्या व्यक्तीला ते कुरियर पाठवायचे आहे त्या व्यक्तीचे नाव, पत्ता आणि फोन नंबर लिहावा.
  • लिफाफा च्या उजव्या बाजूला आपण आपली माहिती नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर लिहावा.
  • हे सर्व झाल्यानंतर लिफाफा पोस्ट ऑफिस मधील स्पीड पोस्ट च्या काऊंटरवर जमा करावा. त्या लिफाफ्या चे वजन आणि आपल्याला ज्या ठिकाणी ते कुरिअर पोहोचवायचे आहे त्याचे अंतर पाहून ते आपल्याला किती पैसे लागतील हे सांगतील.
  • पैसे काउंटरवर जमा केल्यानंतर त्यावर ती शिपिंग चे लेबल प्रिंट करून लावले जाते.
  • त्यानंतर त्याची आपल्याला एक पावती दिली जाते यावरती ट्रेकिंग नंबर दिलेला असतो. पोस्ट ऑफिस च्या ऑफिशिअल वेबसाईट वर जाऊन आपण हा नंबर टाकून आपले कुरियर कोठे पोहोचले आहे हे पाहू शकतो.

विदेशामध्ये कुरियर पाठवणाऱ्या कंपन्या (International courier companies in India)

  • FedEx
  • DHL
  • Aramex
  • India Post
  • DTDC
  • ECOM EXPRESS
  • Delhivery
  • TNT India
  • Bombino Express

निष्कर्ष :

आजच्या या पोस्टमध्ये आपण कुरियर विषयी माहिती (Courier information in marathi) जाणून घेतली. कुरियर माहिती मराठी (Courier mahiti marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

Related Posts

Mahapur information in marathi

महापूर म्हणजे काय | Mahapur information in marathi

Mahapur information in marathi : निसर्ग ही एक अशी गोष्ट आहे जीला आपण कधीही पूर्णपणे समजून घेऊ शकत नाही. एकीकडे निसर्गाने मनुष्याला जगण्यासाठी सर्व काही दिले आहे परंतु…

Instagram information in marathi

इंस्टाग्राम विषयी माहिती | Instagram information in marathi

Instagram information in marathi : इंस्टाग्राम एक व्हिडिओ आणि फोटो शेअरिंग प्लॅटफॉर्म आहे. या सध्याच्या काळात इंस्टाग्राम चे 1.16 बिलियन युजर्स आहेत. या अमेरिकन सोशल मीडिया ऍपला 2006…

Eagle information in marathi

गरुड पक्षाविषयी माहिती | Eagle information in marathi

Eagle information in marathi : गरुड हा पक्षी शक्ती, स्वातंत्र आणि श्रेष्ठता याचे जिवंत प्रतीक म्हणून पूर्ण जगामध्ये ओळखला जातो. हा एक मोठ्या आकाराचा शिकारी पक्षी आहे जो…

Peacock information in marathi

मोर पक्षाविषयी माहिती | Peacock information in marathi

Peacock information in marathi : मोर हा पृथ्वीवरील सर्वात सुंदर पक्षांमधील एक पक्षी आहे. हा मध्यम आकाराचा एक रंगीन पक्षी आहे, जो तितर परिवाराशी (Pheasant) संबंधित आहे. मोराचे…

Indian states information in marathi

भारतातील राज्यांची माहिती | Indian states information in marathi

Indian states information in marathi : आपला भारत देश 29 घटक राज्ये आणि 7 केंद्रशासित प्रदेश मिळून बनलेला आहे. हे आपल्याला तर माहीतच आहे. पण भारतातील अनेक राज्यांची आपल्याला माहिती…

Top 10 highest tea producing states in India in marathi

भारतातील सर्वात जास्त चहा उत्पादन करणारी राज्ये | Top 10 highest tea producing states in India in marathi

Top 10 highest tea producing states in India in marathi : मित्रांनो 2021 च्या एका अहवालानुसार चहा उत्पादनांमध्ये आपला भारत देश देशानंतर दुसऱ्या क्रमांकावर येतो. आपल्या भारत देशाने…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *