Mahapur information in marathi : निसर्ग ही एक अशी गोष्ट आहे जीला आपण कधीही पूर्णपणे समजून घेऊ शकत नाही. एकीकडे निसर्गाने मनुष्याला जगण्यासाठी सर्व काही दिले आहे परंतु दुसरीकडे त्याच्या मनात आले तर मनुष्याचे संपूर्ण जीवन उद्ध्वस्त करू शकतो. निसर्गाच्या या संकटाला नैसर्गिक आपत्ती (Natural Disaster) असे म्हणतात. आजच्या या पोस्टमध्ये आपण महापुरा विषयी माहिती (Flood information in marathi) जाणून घेणार आहोत.
तसं तर पृथ्वीवर अनेक प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती येतात. त्यामधील एक नैसर्गिक आपत्ती म्हणजे महापूर (Flood). महापूर एक अशी आपत्ती आहे जी कधीही येऊ शकते. आणि जर महापुराने एक वेगळे रूप धारण केले तर संपूर्ण पृथ्वी सुद्धा नष्ट होऊ शकते. मग अशा वेळी आपल्यासमोर प्रश्न येतो की महापूर काय आहे, महापूर कसा असतो, आणि महापुरा पासून आपण कसे वाचावे. आजच्या या पोस्टमध्ये आपण महापूर विषयी माहिती (Flood information in marathi) जाणून घेऊ या.
Contents
- 1 महापूर म्हणजे काय (What is Mahapur in marathi)
- 2 महापूर येण्याची कारणे काय आहेत ? Mahapur information in marathi
- 3 महापुरा मुळे काय नुकसान होते?
- 4 भारतातील महापूर प्रभावित क्षेत्रे कोणती आहेत (Flood affected areas in india)
- 5 महापुराचा धोका कमी करण्यासाठी काय उपाय आहेत?
- 6 महापूर आल्यास त्या परिस्थितीमध्ये काय करावे?
- 7 निष्कर्ष :
महापूर म्हणजे काय (What is Mahapur in marathi)
जास्त पावसामुळे किंवा जलाशयांमध्ये पाण्याची वाढ झाल्यामुळे भूभागावर मोठ्या प्रमाणात पाणी जमा होते. आणि यामुळे मानवी जीवन विस्कळीत होते यालाच महापूर असे म्हणतात. यामुळे मनुष्य राहात असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी गोळा होते.
महापूर येण्याच्या अगोदर हवामान आपल्याला या प्रकारचे काही संकेत देत असतो. ज्यामुळे आपल्याला समजून जाते की आता महापूर येणार आहे. अशावेळी हवामान विभागामार्फत सुद्धा सूचना दिल्या जातात, आणि रहिवाशांना तिथून बाहेर पडण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा वेळ दिला जातो. कधीकधी समुद्रामध्ये चक्री वादळ आल्याने त्याच्या उंच लाटांमुळे सूचना देण्याअगोदरच महापूर येतो. या प्रकारच्या महापूराला Flash Flood म्हणतात. याचे रूप अत्यंत विनाशकारी असते.
Flash Flood अनेक वेळा त्सुनामी मुळे येते. यामुळे अनेक लोक त्सुनामी ला महापुराचा एक प्रकार मानतात. साधारणपणे त्सुनामी समुद्री वादळ किंवा समुद्री लाटा असतात, ज्या काही फूट लांब आणि काही किलोमीटर रुंद असतात. आणि त्सुनामी नेहमी भूकंपामुळे येते. त्सुनामी मध्ये लाटांचा वेग 420 किलोमीटर प्रति तास किंवा त्यापेक्षाही जास्त असतो. इतक्या जास्त वेगाने जेव्हा त्सुनामीच्या लाटा येऊन किनाऱ्याला धडकतात तेव्हा त्या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर महापूर येतो. आणि महापूर आल्यानंतर मनुष्याला पळण्यासाठी सुद्धा वेळ मिळत नाही.
महापूर येण्याची कारणे काय आहेत ? Mahapur information in marathi
महापूर एक नैसर्गिक आपत्ती आहे. साधारणपणे ही निसर्ग असंतुलित जेव्हा होईल तेव्हा येऊ शकते. परंतू महापूर येण्यामागे मनुष्याचा खूप मोठा हात आहे असे सांगितले जाते. माणूस आज ज्याप्रमाणे निसर्गाचा ऱ्हास करत आहे त्याप्रमाणे आपत्ती येण्याच्या संभावना वाढत चालल्या आहेत. महापूर पुढील कारणे असू शकतात :
- साधारणपणे जास्त पाऊस पडल्यानंतर महापूर येऊ शकतो हे सर्वात मोठे कारण आहे. सलग काही दिवस मुसळधार पाऊस पडल्यामुळे नद्यांना भरून पाणी येते. आणि अन्य ठिकाणी सुद्धा पाणी साचून राहते, ज्यामुळे महापुराची स्थिती निर्माण होते.
- रस्ते तयार करताना अनेक वेळा पाणी निचरा होण्याचे व्यवस्थापन केले जात नाही, त्यामुळे सुद्धा अनेक वेळेला महापूर येऊ शकतो.
- अचानक एखादा मोठा जमिनीचा बांध फुटला किंवा, समुद्राचा एखादा मोठा तर तुटल्याने सुद्धा महापुराची स्थिती निर्माण होते.
- जर तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली तर, बर्फाळ प्रदेशातील बर्फ वितळतो आणि त्यामुळे सुद्धा पुराची परिस्थिती निर्माण होते.
- समुद्रामध्ये अचानक भूकंप आल्याने अनेक वेळा समुद्राच्या लाटा खूप उंचावर जातात आणि यामुळे सुद्धा महापूर येऊ शकतो.
- समुद्रामध्ये कोणतेही मोठे वादळ किंवा चक्रीवादळाने सुद्धा महापूर येऊ शकतो.
- जर अचानक ढगफुटी झाली तर सुद्धा महापूर येऊ शकतो.
- जर नदी मधील पाण्याची पातळी वाढू लागली तर शेजारील गावांमध्ये महापूराची परिस्थिती निर्माण होऊ शकते.
महापुरा मुळे काय नुकसान होते?
महापूर एक नैसर्गिक आपत्ती आहे जी एकदा आली तरीही मनुष्य आणि प्राण्यांचा जीवनामध्ये अनेक प्रकारचे नुकसान करून जाते. महापूर येऊन गेल्यानंतर त्याचा प्रभाव आपल्याला अनेक दिवस दिसून येतो.
महापुरा मध्ये बुडल्याने अनेक लोकांचा, प्राण्यांचा आणि अन्य जीव जंतूंचा मृत्यू होतो. महापुरामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत होते.
महापूर आल्याने घरे, विजेचे खांब, झाडे-झुडपे इत्यादी नष्ट होतात. अनेक जुनी घरे महापुरामुळे पडतात.
महापूर आल्यामुळे संपूर्ण दूषित पाणी सर्व जलसंसाधनना मिळते. यामुळे विहीर, कुंपण नलिका यामधील पाणी प्रदूषित होते. पाणी प्रदूषित झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होते.
महापूर आल्यामुळे शेतामधील सर्व पिके नष्ट होतात. किंवा खराब होतात.
महापूर आल्यामुळे मातीवर सुद्धा परिणाम दिसून येतो. अनेक ठिकाणी समुद्राची वाळू दिसून येते. जास्त प्रमाणात खारट पाण्यामुळे जमिनीची उत्पादनक्षमता कमी होते.
महापूर येऊन गेल्यानंतर मलेरिया, अतिसार यासारखे अनेक विषाणू रोग पसरू लागतात.
भारतातील महापूर प्रभावित क्षेत्रे कोणती आहेत (Flood affected areas in india)
- दक्षिण भारतातील केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश महापूर प्रभावित क्षेत्रे आहेत.
- मध्य भारतातील उत्तर प्रदेश, बिहार, आणि दिल्ली सुद्धा महापौर प्रभावित क्षेत्रे आहेत.
- पूर्व भारतामध्ये बंगालच्या खाडीला लागून असलेले ओडीसा, आसाम आणि पश्चिम बंगाल येथेसुद्धा समुद्रामध्ये वादळ आल्यामुळे अनेक वेळा महापूर येतो.
- पश्चिम भारतातील गुजरात, महाराष्ट्र, दिव दमन यांना सुद्धा अरबी समुद्र जवळ असल्याने महापुराचा फटका बसतो.
- उत्तर भारतामध्ये हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेश मध्ये जास्त पावसामुळे आणि ढगफुटीमुळे महापूर येण्याची शक्यता असते.
महापुराचा धोका कमी करण्यासाठी काय उपाय आहेत?
- महापूर प्रभावित क्षेत्रामध्ये कोणत्याही मोठ्या विकास कार्याला परवानगी देऊ नये.
- नद्यांच्या किनाऱ्यावरील जमिनीवर मानवी वस्त्यांना अतिक्रमणा साठी बंदी असावी.
- महापूर प्रभावित क्षेत्रांमधील घरांची निर्मिती मजबूत असावी.
- नद्यांच्या वरील क्षेत्रामध्ये अनेक जलाशय बनवता येऊ शकतात.
महापूर आल्यास त्या परिस्थितीमध्ये काय करावे?
- महापूर आल्यानंतर त्यामध्ये पोहण्याचा कधीच प्रयत्न करू नये. कारण पाण्याच्या प्रवाहामध्ये आपण बुडू शकतो. जोपर्यंत पाण्याचा वेग कमी होत नाही तोपर्यंत आपण ज्या ठिकाणी आहोत त्याच ठिकाणी थांबावे.
- जर महापूर वेगाने असेल तर गाडी पळवण्याचा कधीही प्रयत्न करू नये. कारण तीव्र गतीने येणारे पाणी आपल्या गाडीला सुद्धा खेचून घेऊन जाते.
- महापुराच्या स्थितीमध्ये वीज किंवा गॅस कनेक्शन ला कधीही हात लावू नये. शक्यतो ते बंद ठेवावे.
- महापूर आल्यानंतर आपण कोणत्याही उंच ठिकाणी जसे की आपल्या गावातील कोणताही डोंगर किंवा किल्ल्यावर जावे. जर तुम्ही घरामध्ये अडकला असाल तर आपल्या घराच्या छतावर जावावे.
- घरामध्ये महापुराचे पाणी थांबू नये म्हणून घरामधील सर्व मोरी आणि ड्रेनेज पाईप च्या जाळ्या काढून टाकाव्यात.
- जर मी घरामध्ये अडकला असाल तर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (National Disaster Management Authority) यांच्या हेल्पलाईन नंबर वर फोन करून मदत मागू शकता. आपण राज्य सरकार आणि इंडियन आर्मी यांच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करून सुद्धा मदत मागू शकतात.
- घराच्या छतावर एखादा झेंडा किंवा एखाद्या काठीला कपडा बांधून आपण प्रशासनाला हेलिकॉप्टर साठी मदत मागू शकता.
- महापूर आल्यानंतर पाण्यापासून दूर रहावे. आपल्या आसपास स्वच्छता ठेवावी. कारण पाण्यामध्ये असलेल्या बॅक्टेरिया मुळे आपल्याला गंभीर आजार होऊ शकतात.
निष्कर्ष :
मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण महापुरा विषयी माहिती (Flood information in marathi) जाणून घेतली. महापूर माहिती मराठी (Mahapur information in marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.