Parrot information in marathi : जगातील सुंदर पक्षांमध्ये पोपटाला गणले जाते. जगातील सर्वात लोकप्रिय पाळीव पक्षी म्हणून सुद्धा ओळखले जाते. हा मुख्यतः उष्णकटिबंधीय वातावरणामध्ये आढळतो. हा पक्षी बुद्धिमान पक्षी सुद्धा आहे. तो कोणाचीही नक्कल अगदी सहजपणे करू शकतो. आजच्या या पोस्टमध्ये आपण पोपट या पक्ष्याविषयी माहिती (Parrot information in marathi) जाणून घेणार आहोत.
Contents
पोपट या पक्ष्याविषयी माहिती (Parrot information in marathi)
सामान्य नाव (Common Name): पोपट (Parrot)
वैज्ञानिक नाव (Scientific Name): Psittaciformes
प्रजातींची संख्या : 393
समूह : Pandemonium
पोपट पक्षाविषयी काही रोचक तथ्य (Facts about parrot in marathi)
1) पोपट पक्षी एक विश्वासघाती पक्षी म्हणून ओळखला जातो. कारण आपण याला कितीही काळापर्यंत पाळीव ठेवले तरीही, जेव्हा आपण त्याला पिंजऱ्याच्या बाहेर सोडतो तेव्हा तो मालकाकडे पलटून बघत सुद्धा नाही.
2) पोपट हा एकमेव असा पक्षी आहे जो पायाचा उपयोग करून आपल्या चोची पर्यंत अन्न नेऊ शकतो.
3) पोपट पक्षी आपल्या प्रमाणे त्यांच्या पिल्लांची नावे ठेवतो. आणि ती नावे जीवन भरासाठी असतात.
4) जगातील सर्वात मोठा पोपट दक्षिण अमेरिका मध्ये आढळतो. ज्याचं नाव Hyacinth Macaw Parrot आहे. ज्याची लांबी जवळजवळ 1 मीटर आहे.
5) जगातील सर्वात वजनदार पोपट न्यूझीलंडमध्ये आढळतो. ज्याचं नाव काकापो (Kakapo) आहे. ज्याचे वजन दोन ते चार किलो ग्रॅम असते.
6) जगातील सर्वात लहान पोपट Buff Faced Pygmy Parrot आहे असे. जो इंडोनेशिया आणि पापुआ न्यू गिनी मध्ये आढळतो. ज्याचे वजन फक्त 11.5 ग्रॅम असते.
7) काकापो हा जगातील एकमेव असा पोपट आहे जो उडू शकत नाही. हे त्याच्या मोठ्या शरीरामुळे शक्य नाही.
8) जगातील सर्वात जास्त शिकलेला पोपट ह Puck नावाचा पोपट आहे. हा शब्दकोशातील 1728 शब्द वाचू शकतो. जे एक विश्व रेकॉर्ड आहे.
9) जगभरामध्ये पोपट पक्षाच्या जवळजवळ 393 प्रजाती आढळतात.
10) पोपट हा पक्षी दक्षिण आणि मध्य अमेरिका, आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया सहित सर्व उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये आढळतो. (information on parrot in marathi)
पोपट पक्षी माहिती मराठी (Popat pakshi mahiti marathi):
11) मादा पोपटाला Hen आणि नर पोपटाला Cock म्हणतात. आणि पोपटाच्या पिलाला Chick म्हणतात.
12) भारतामध्ये पोपट या पक्षाच्या जवळजवळ 12 प्रजाती आढळतात.
13) कुत्रा आणि मांजर यानंतर सर्वात जास्त पाळीव जीव पोपट आहे. कारण हा पक्षी बुद्धिमान आणि रंगीबेरंगी असतो.
14) वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की सर्वात पहिला पोपट जवळजवळ 50 मिलियन वर्ष पूर्वी आढळला होता.
15) प्रजाती नुसार पोपट या पक्षाचा जीवन काळ 10 ते 95 वर्षाच्या मध्ये असतो.
16) इंडोनेशियामध्ये आढळणारी Goffin’s cockatoo parrot ही पोपटाची प्रजाती गणितीय उत्तरे सुद्धा सोडवू शकते.
17) पोपट हा पक्षी एक सामाजिक पक्षी आहे जो नेहमी 10 ते 30 पक्ष्यांच्या समूहामध्ये राहतो.
18) पोपट पक्षी सर्वाहारी आहे. म्हणजेच तो मांस आणि वनस्पती दोन्ही खाऊ शकतो. त्याच्या आहारामध्ये बिया, फळे, कळ्या आणि अन्य जीव सुद्धा सामील असतात. बिया हे त्यांचे आवडते अन्न आहे. आणि कठोर बीया उघडण्यासाठी पोपटाची चोच मजबूत असते.
19) काही खाद्यपदार्थ पोपटाला आजारी पडू शकतात. किंवा त्याच्या मृत्यूचे कारण सुद्धा बनू शकतात. या खाद्यपदार्थांमध्ये सफरचंदाच्या बिया, कांदा आणि चॉकलेट इत्यादी सामील आहेत.
20) पोपटाची चोच Keratin ने बनलेली असते. जसे की मनुष्याचे केस आणि नखे. त्यामुळे ती तुटल्यानंतर सुद्धा पर्यंत वाढते. आणि नेहमी त्यांची चोच ही खराब होत असते.
पोपट या पक्ष्याविषयी माहिती (Parrot information in marathi):
21) पोपट पक्षाची दृष्टी खूप तेज असते. त्याचे डोळे मेंदू मध्ये उंच ठिकाणी असल्यामुळे तो डोके हलवू शकतो व आपल्या आजूबाजूला आणि आपल्या चोचीच्या बरोबर खाली सहजपणे पाहू शकतो.
22) पोपटाचा हवेत उडण्याचा वेग पंधरा ते पंचवीस मैल प्रतितास म्हणजेच 24 ते 40 किलोमीटर प्रति तास असतो.
23) पोपट साधारणपणे एका वेळेस दोन ते आठ पांढऱ्या रंगाची अंडी देतो. पोपटाच्या अधिकांश प्रजाती मध्ये अंडी सांभाळण्याचे काम मादी करते. प्रजाती नुसार त्याचा कालावधी 17 ते 35 दिवसांचा असतो.
24) पाम कॉकटोस (Palm cockatoos) प्रजातीच्या पोपटाचा प्रजनन दर सर्वात कमी असतो. ही प्रजाती प्रत्येक दुसऱ्या वर्षी फक्त एक अंडी देते.
25) जेव्हा पोपटाला पिल्ले होतात तेव्हा इतर पक्षांप्रमाणे त्यांचे डोळे उघडे असतात. परंतु त्यांना पंख नसतात. दोन ते तीन आठवड्यांनंतर पंख येण्यास सुरुवात होते.
26) अधिकांश नर आणि मादी पोपटाला ओळखणे सोपे नसते.
27) हा पक्षी इतर पक्ष्यांप्रमाणे घरटे बनवत नाही. हा झाडावरती राहतो.
28) जगातील मोंक पाराकीट (monk parakeet parrot) ही एकमेव पोपटाची प्रजाती घरटे बनवते.
29) काकापो हा 95 वर्ष सरासरी जीवन काळ जगणारा जगातील सर्वात लांब वेळ जिवंत राहणारा पोपटआहे.
30) जितक्या वेगाने वाघ धावू शकतो इतक्या वेगाने पोपट हवेत उडू शकतो. (information on parrot in marathi)
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ):
पोपट समानार्थी शब्द काय आहे?
पोपटाची नावे
निष्कर्ष:
आजच्या या पोस्टमध्ये आपण पोपट या पक्ष्याविषयी माहिती (Parrot information in marathi) जाणून घेतली. पोपट पक्षी माहिती मराठी (Popat pakshi mahiti marathi) ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.