सापांची माहिती मराठी | Snake information in marathi

Snake information in marathi : साप हा या धर्तीवर डायनासोरच्या पूर्वीपासून आहे. इतक्या काळामध्ये आपण सापांविषयी अनेक गोष्टी जाणून घेतल्या आहेत. परंतु सापांविषयी जगामध्ये आजही काही रहस्यमय गोष्टी आहेत. आजच्या या पोस्टमध्ये आपण सापांची माहिती मराठी (Snake information in marathi) जाणून घेणार आहोत.

Snake information in marathi
सापांची माहिती मराठी (Snake information in marathi)

सापांची माहिती मराठी (Snake information in marathi)

नाव साप
वर्गसरपटणारा प्राणी
आयुर्मान 3 ते 5 वर्षे
सापांची माहिती मराठी (Snake information in marathi)

1) साप हा या धरतीवर 130 मिलियन वर्षापेक्षा आधी म्हणजेच डायनासोर च्या आधी पासून आहे.

2) जगामध्ये सापाच्या जवळजवळ 2500 पेक्षा जास्त प्रजाती आहेत. या मधील फक्त वीस टक्के प्रजाती या विषारी आहेत.

3) जगातील दोन लहान देश आइसलँड तथा अंटार्टिका मध्ये साप आढळत नाहीत. कारण या देशांमध्ये सर्वात जास्त थंडी आढळते.

4) जगभरामध्ये दरवर्षी सापा द्वारे एक लाख लोक मरतात.

5) भारतामध्ये हा आकडा प्रत्येक वर्षी जवळजवळ 2.50 लाख लोकांना साप चावतो. ज्यामधील जवळ जवळ पन्नास हजार लोकांचा मृत्यू होतो. परंतु सरासरी आकडा हा 20 हजाराचा आहे.

6) जगातील कोणताही साप आपण त्याला त्रास दिल्याशिवाय चावत नाही. साप चावण्याच्या जास्त करून घटना या त्याच्यावर नजरचुकीने पाय पडल्यामुळे होतात.

7) जगातील सर्वात लांब साप पायथन रेतिकुलटेस हा होता जो जवळजवळ तीस फूट लांब होता.

8) साप कधीही कोणत्याही गोष्टीला चावून खात नाही. तो सरळ गिळतो. जगभरामध्ये साप लहान किडे, पक्षी, उंदीर आणि आपल्यापेक्षा छोट्या सापांना खातो.

9) आफ्रिकेमध्ये अनेक अजगर आढळतात. हे अजगर छोटी गाय सुद्धा गिळू शकतात. नॅशनल जिओग्राफिक च्या अनुसार साप एका वेळी आपल्या स्वतःपेक्षा 70 ते 100 पटीने मोठ्या शिकार्‍याला गिळू शकतात.

10) साप आपल्या जबड्याचा खालचा भाग जमिनीला लावून जमिनीमध्ये चालणाऱ्या तरंगांची हालचाल समजून घेतो. ज्यामुळे भूकंप, त्सुनामी अशा विनाशकारी तूफान विषयी त्याला आधी माहीती होते.

साप विषयी माहिती (Snake information in marathi)

11) पाण्यामध्ये राहणारे साप आपल्या त्वचेद्वारे श्वास श्वास घेऊ शकतात. ज्यामुळे ते शिकाऱ्याच्या शोधामध्ये पाण्यामध्ये उशिरापर्यंत राहू शकतात. सापांना पाण्याचीसुद्धा जास्त गरज नसते. ते आपल्या शिकार पासूनच पाणी प्राप्त करतात. काही साप खूप दिवसापर्यंत भुकेलेले सुद्धा राहू शकतात. जसे की किंग कोब्रा काहीही न खाता काही महिने जिवंत राहू शकतो.

12) साप आपल्या नाका पासूनच नाही तर जिभे पासून सुद्धा श्वास घेऊ शकतो. तो आपल्या जीभेने आपल्या आसपासचे वातावरण कसे आहे हे सुद्धा जाणून घेऊ शकतो.

13) साप वर्षांमध्ये कमीतकमी तीन वेळेस आपल्या शरीरावरील कातडी काढून टाकतो.

14) दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळणाऱ्या हॉर्नड वाइपर या सापाच्या डोक्यावर दोन शिंग असतात.

15) जगातील 70 टक्के सापांच्या प्रजाती या अंडी देतात. बाकीचे 30 टक्के प्रजाती पिल्लांना जन्म देतात.

16) सापाला कोणताच आवाज ऐकू येत नाही. साप हा बहिरा असतो. हवे मध्ये निर्माण होणाऱ्या ध्वनी तरंगांचा सापावर काही प्रभाव पडत नाही. पुंगी चा आवाज ऐकून साप येणे हा लोकांचा एक भ्रम आहे.

17) वाघासारख्या भयंकर प्राण्याला सुद्धा आपण थोडीशी ट्रेनिंग देऊन त्याला काहीही शिकवू शकतो. परंतु आपण सापाला कधीही काहीच शिकवू शकत नाही. का गं सापाच्या डोक्यामध्ये इतर सजीवांप्रमाणे सेरीब्रल हेमिस्पियर नसते. मेंदूचा हाच भाग शिकण्याच्या क्रियेवर नियंत्रण करू शकतो.

18) हिरवा ॲनाकोंडा सर्वात लांब साप नाही. परंतु हा सर्वात वजनदार साप असतो. हा साप 550 पौंड पर्यंत असू शकतो.

19) ब्राझील मध्ये स्थित आयलँड, सापांची सर्वात जास्त संख्या असणारी जागा आहे. येथे प्रत्येक वर्ग मीटर मध्ये पाच साप राहतात. म्हणजेच आपल्या सिंगल बेड च्या जागी 10 साप आणि डबल बेड च्या ठिकाणी वीस साप राहू शकतात. तेही विषारी गोल्डन विट वायपर.

20) किंग कोब्रा हा विषारी सापांमध्ये सर्वात लांब साप असतो. साधारणपणे याची लांबी 18 फुटापर्यंत असते. याचं विश इतकं खतरनाक असतं की, याच्या 7 मिली मात्रेमध्ये 20 माणसे आणि 1 हत्ती मरु शकतो.

सापाविषयी काही रोचक तथ्य (Facts about Snake in marathi)

21) आफ्रिकेमध्ये आढळणारा ब्लॅक मांबा स्नेक (Black Mamba Snake) हा साक्षात यमराज म्हणून ओळखला जाणारा साप आहे. कारण याच्या चावण्याने जवळजवळ 95 टक्के लोकांचा मृत्यू होतो.

22) जर कधी आपल्या मागे साप लागला असेल तर, कधीही एकाच रेषेत धावू नका. असे धावल्याने तो आपल्यापर्यंत लगेच पोहोचू शकेल.

23) साप कधीही एखाद्या व्यक्तीचा पाठलाग करून त्याला चावत नाही. कारण सापाचा जास्तीत जास्त धावण्याचा वेग सात किलोमीटर प्रति तास असतो.

24) एखाद्या मृत सापाचे डोके सुद्धा आपल्याला चावू शकते. म्हणजेच त्याच्या मृत्यूच्या एक तासानंतर सुद्धा त्याच्या डोक्यामध्ये प्राण असतो.

25) जगभरामध्ये विषारी सापांच्या जवळ-जवळ 725 प्रजाती आहेत. त्यामधील 250 प्रजाती फक्त एका वेळी चावल्याने मानवाचा मृत्यू होऊ शकतो.

26) जगातील सर्वात विषारी पाच साप हे आहेत: अंतर्देशीय टाईपान, पूर्वी ब्राउन साप, तटीय टाईपान, वाघ साप आणि काळा वाघ साप.

27) काही सापांमध्ये 200 पेक्षा जास्त दात असतात. परंतु ते त्याचा वापर चावण्यासाठी करत नाहीत.

28) स्वतःच्या चुकीने साप जर कधी स्वतःला चावला तर त्याचा सुद्धा मृत्यू होऊ शकतो.

29) सर्वात दुर्लभ आणि लुप्त होणारा साप सेंट लूसिया रेसर हा आहे. या प्रजातीचे फक्त 18 ते 100 साप आहेत.

30) प्रजाती नुसार साप चार ते पंचवीस वर्षापर्यंत जिवंत राहू शकतात.

साप विषयी माहिती (Sap mahiti marathi)

31) वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार माणूस सापांना भीत असल्यामुळेच जास्त करून साप आपल्याला चावतो.

32) मानवाला सापाची जी भीती वाटते त्याला Ophiophobia म्हणतात.

33) सापाचे शरीर जितके उष्ण असेल तितकेच तो आपल्या शिकार ला सहजपणे पचवू शकतो. साधारणपणे सापाला आपले भोजन पचवण्यासाठी तीन ते पाच दिवस लागतात.

34) ॲनाकोंडा सारख्या सापाला आपले भोजन पचवण्यासाठी अनेक आठवडे किंवा महिने सुद्धा लागू शकतात. जगामध्ये ॲनाकोंडा सापाची पचनक्रिया सर्वात हळू आहे.

35) तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, ॲनाकोंडा साप माणसाची सुद्धा शिकार करू शकतो. माणसाबरोबर असतो हरीण, कोल्हा यांना सुद्धा गिळू शकतो.

36) साप हा मांसाहारी प्राण्यांच्या श्रेणीमध्ये येणारा जीव आहे. त्याच्या डोळ्यावर पापण्या नसतात.

37) सापाची त्वचा ही चमकदार आणि सुखी असते.

38) साप आपले डोळे उघडे ठेवून झोपतो.

39) किंग कोब्रा या सापाला सर्वात बुद्धिमान साप म्हणून ओळखतात.

40) साप आपले तोंड दीडशे डिग्री पर्यंत उघडू शकतो.

सापांची माहिती मराठी (Snake information in marathi)

41) Inland Taipan या सापाच्या विषामध्ये एकावेळेस 80 लोकांना मारण्याची क्षमता असते.

42) साप चावल्यामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांच्या संख्येपेक्षा साप चावण्याच्या भीतीने मरणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे.

43) सापाच्या हवेमध्ये उडणार्‍या प्रजाती सुद्धा आढळतात. जे एक दुसऱ्या झाडावर उडी मारू शकतात.

44) साप हा जीव माणसाप्रमाणे उलट्या सुद्धा करू शकतो. साप नेहमी त्याला धोका जाणवू लागल्यास उलट्या करतो. ज्यामुळे त्याच्या शरीराचे वजन कमी होते आणि तो वेगाने धावू शकतो.

45) Leptotyphlops Carle हा जगातील सर्वात लहान साप आहे. ज्याचा आकार साधारणपणे चार ते पाच इंच असतो.

46) माझा साप नर सापाच्या तुलनेने मोठा असतो.

47) सापाच्या शरीराचे तापमान वातावरणाच्या तापमानानुसार वाढते किंवा कमी होते.

48) जगामध्ये सापाच्या अशाही अनेक प्रजाती आहेत ज्यांना दोन डोकी असतात.

49) साप जगाच्या कानाकोपऱ्यात आढळतात परंतु सापांना थंड अजिबात आवडत नाही.

50) सापाचा जबडा हा लवचिक असतो त्यामुळे तो कितीही मोठी शिकार सहजपणे आपल्या शरीरामध्ये गिळू शकतो.

FAQ

सापाचे प्रकार

नाग, मण्यार, घोणस, फुरसे, अजगर, तस्कर, कवड्या, पानदिवड, धामण, गवत्या, धुळ नागीन, डुरक्‍या घोणस, मांडोळ, कुकरी, पिवळ्या ठिपक्‍यांचा कवड्या,

विषारी सापांची नावे

नाग, मण्यार, घोणस व फुरसे हे चार विषारी साप आहेत.

साप घरात येऊ नये म्हणून उपाय

सापाला दूर ठेवण्यासाठी केरोसिनचाही वापर केला जातो. रॉकेलमध्ये कापड भिजवून ते कापड घराच्या कोपऱ्यांमध्ये ठेवा. तसंच घराच्या आजूबाजूला देखील तुम्ही रॉकेल शिंपडू शकता. रॉकेलचा वास सापांना सहन होत नसल्याने ते घरामध्ये येणार नाहीत.

बिनविषारी साप

भारतात एकूण 272 सापांच्या जाती आढळतात त्यातील बहुतांशी म्हणजे 212 जाती बिनविषारी आहेत. अजगर, धामण, तस्कर, गवत्या, दिवड, नानेटी, धुळ नागीण, पहाडी तस्कर हे काही बिनविषारी साप आहेत.

सापाच्या जाती किती आहेत?

देवरस यांच्या मतानुसार भारतात बिनविषारी सापांच्या 164 जाती व विषारी सापांच्या 52 जाती अशा एकूण 216 जाती आहेत.

साप किती वर्षे जगतो?

साप साधारणपणे 3 ते 5 वर्षे जगतो.

साप कशाने श्वास घेतो?

साप जीभेने वास घेतो.

घरात साप निघरातघणे शुभ की अशुभ

घरात साप आढळणे, अत्यंत शुभ मानले जाते. याचा अर्थ आपल्याला धनलाभाचे योग निर्माण होणार आहेत.

सापाला कान असतात का?

सापांचे कान सामान्य प्राण्यांसारखे नसतात. सापांना बाहेरून स्पष्टपणे न दिसणारे शरीराच्या अंतर्गत कान असतात.

साप चावल्यावर मुंगूस कोणती वनस्पती खातो?

सापाचे विष मुंगुसास भिनले, तर मुंगुस एका विशिष्ट प्रकारच्या (मुंगूसवेल) झाडाची मुळे खाते व यामुळे या विषाचा काही परिणाम होत नाही, अशीही एक समजूत आहे.

निष्कर्ष

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण सापांची माहिती मराठी (Snake information in marathi) जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. साप विषयी माहिती (Snake information in marathi) जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Comment