Marathi

येलदरी धरण माहिती मराठी | Yeldari dam information in marathi

Yeldari dam information in marathi : मित्रांनो येलदरी हे एक महाराष्ट्रातील महत्वाचे धरण आहे.   महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धरणांच्या यादीमध्ये येलदरी या धरणाचा सातवा क्रमांक लागतो. जायकवाडी नंतर मराठवाड्यातील दुसरे सर्वात मोठे धरण म्हणून या धरणाची ओळख आहे. पावसाळ्यामध्ये हे धरण ओव्हर फ्लो झाल्यानंतर बरेच पर्यटक या ठिकाणी येत असतात. आजच्या या लेखात आपण येलदरी धरण माहिती मराठी (Yeldari dam information in marathi) जाणून घेणार आहोत

Yeldari dam information in marathi
येलदरी धरण माहिती मराठी (Yeldari dam information in marathi)

येलदरी धरण माहिती मराठी (Yeldari dam information in marathi)

धरणयेलदरी
धरणाचा उद्देशसिंचन, जलविद्युत
अडवलेल्या नद्या/ प्रवाहपूर्णा
स्थानगाव : येलदरी, तालुका : जिंतूर, जिल्हा: परभणी
बांधकाम सुरुवात1958
येलदरी धरण माहिती मराठी (Yeldari dharan mahiti marathi)

येलदरी हे धरण महाराष्ट्राच्या परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यामध्ये येलदरी या गावाजवळ आहे. हे धरण हिंगोली च्या वायव्येला हिंगोली जिंतूर या महामार्गावर येते. येलदरी हे धरण पुर्णा या नदीवर बांधण्यात आलेले आहे. पूर्ण ही गोदावरी नदीची एक प्रमुख उपनदी आहे. येलदरी धरणाच्या जलाशयाचा वापर हा प्रामुख्याने शेतीसाठी आणि वीज निर्मितीसाठी केला जातो. परंतु सध्या परभणी आणि हिंगोलीतील अनेक शहरे पिण्याच्या पाण्यासाठी या सुधारणावर अवलंबून आहे.

येलदरी धरणाच्या वरील बाजूस असणारे खडकपूर्णा धरण भरल्यावरच येलदरी धरणात पाणी सोडले जाते. मित्रांनो येलदरी या धरणाचे बांधकाम इसवी सन 1958 साली सुरू करण्यात आले व इसवी सन 1968 साली या धरणाचे बांधकाम पूर्ण झाले. एकूणच येलदरी धरण बांधण्यासाठी तब्बल दहा वर्षे इतका कालावधी लागला. त्याचबरोबर येलदरी हे धरण साधारणतः 101.54 वर्ग किलोमीटर इतक्या क्षेत्रावर पसरलेले आहे. 

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या देखरेखीखाली या धरणाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. येलदरी धरणाच्या तांत्रिक माहितीबद्दल जाणून घ्यायचे झाल्यास येलदरी या धरणाची उंची 51.2 मीटर म्हणजेच 168 फूट इतकी आहे. या धरणाची लांबी 4232 मीटर म्हणजेच 13885 फुट आहे. येलदरी या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 32.99 टीएमसी म्हणजेच 3299 दशलक्ष घनफूट इतकी आहे. येलदरी धरणातून 22.5 मेगावॉट एवढी वीज निर्मिती केली जाते. येलदरी धरणातील पाण्याचा विसर्ग हा 10477.13 घनमीटर प्रति सेकंद इतक्या वेगाने केला जातो. या धरणाला एकूण दहा दरवाजा आहेत या धरणाचे दरवाजे हे S आकाराच्या प्रकारातील आहे. येलदरी या धरणामुळे साधारणतः दहा हजार पाचशे साठ हेक्टर इतके क्षेत्र ओळीता खाली आलेले आहे. 

त्याचबरोबर येलदरी धरणाचा कालवा हा सिद्धेश्वर धरणातून निघतो. पर्यटन स्थळाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर येलदरी हे धरण परभणी जिल्ह्यातील पर्यटकांसाठी आवडते ठिकाण आहे. या धरणाच्या जवळपासचा परिसर हा निसर्ग संपन्न वातावरणाने भरून गेलेला आहे. या धरणाला भेट देण्यासाठी पावसाळ्यानंतर बरेच पर्यटक गर्दी करत असतात.  येलदरी धरणाला सकाळी नऊ ते सायंकाळी सात या वेळेत भेट देता येते. येलदरी हे धरण जिंतूर पासून 15 किलोमीटर तर परभणी पासून 57 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.

येलदरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?

येलदरी धरण परभणी जिल्ह्यात आहे.

येलदरी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?

येलदरी जलविद्युत प्रकल्प परभणी जिल्ह्यात आहे.

निष्कर्ष

तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील येलदरी धरण माहिती मराठी (Yeldari dam information in marathi) जाणून घेतलेली आहे. येलदरी (Yeldari dharan mahiti marathi) या धरणाबद्दल आम्ही सांगितलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. Yeldari dam in marathi ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

Related Posts

Top 10 richest temples in India

भारतातील 10 सर्वात श्रीमंत मंदिरे | Top 10 richest temples in India

Top 10 richest temples in India : मित्रांनो आपला भारत देश हा पुर्ण जगामध्ये आपली आध्यात्मिक संस्कृती, परंपरा, चालीरीती, श्रद्धा यामुळे ओळखला जातो. कारण आपल्या भारत देशामध्ये सर्वात…

Tourist Places of Andra Pradesh

आंध्र प्रदेश राज्यातील पर्यटन स्थळे | Tourist Places of Andra Pradesh

Tourist Places of Andra Pradesh in Marathi : आंध्र प्रदेश, दक्षिण-पूर्व किनारपट्टीवर स्थित, भारतातील समृद्ध राज्यांपैकी एक आहे. जून 2014 मध्ये भारतीय संसदेत आंध्र प्रदेश पुनर्रचना कायदा विधेयकाअंतर्गत…

Intresting facts about love in Marathi

प्रेमाविषयी काही आश्चर्यकारक रोचक तथ्य | Intresting facts about love in Marathi

Intresting facts about love in Marathi : मित्रांनो प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यामध्ये कोणाशी ना कोणाशी प्रेम करतो. प्रेमाची भावना ही अशी एक भावना आहे जी सर्वात वेगळी आणि…

Top 10 Tourist Places of Telangana

तेलंगणा राज्यातील दहा पर्यटन स्थळे माहिती मराठी | Top 10 Tourist Places of Telangana

Top 10 Tourist Places of Telangana in marathi : तेलंगणा राज्यातील दहा पर्यटन स्थळे तेलंगाना हे राज्य भारतातील प्रमुख राज्यांपैकी एक आहे. तेलंगणा हे भारतातील नवोदित 29 वे राज्य…

Naina Lal Kidwai information in marathi

नैना लाल किदवई माहिती मराठी | Naina Lal Kidwai information in marathi

Naina Lal Kidwai information in marathi : नैना लाल किदवई या व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहेत आणि त्या भारतातील HSBC बँकेचे प्रमुख आहेत. त्या फिक्कीच्या माजी अध्यक्षाही आहेत. तसेच…

Brown colour in marathi

तपकिरी रंग माहिती मराठी | Brown colour in marathi

Brown colour in marathi: तपकिरी रंग हा निस्तेज आणि अनेकदा दुर्लक्षित केलेला रंग आहे. वेगळ्या दृष्टीकोनातून, तथापि, तपकिरी हा एक अतिशय आनंददायी रंग आहे, तो इतिहास, संस्कृती आणि…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *