स्टोरेज डिवाइस म्हणजे काय | Storage device information in marathi

Storage device information in marathi : स्टोरेज डिवाइस म्हणजे काय हा प्रश्न तुमच्या मनामध्ये कधी ना कधी नक्कीच आला असेल. आणि तुम्ही याबद्दल माहिती शोधण्याचा सुद्धा नक्कीच प्रयत्न केला असेल. म्हणून तर तुम्ही इथे आलात. आजच्या या पोस्टमध्ये आपण स्टोरेज डिवाइस म्हणजे काय (Storage device information in marathi) जाणून घेणार आहोत.

जसे की याच्या नावावरून आपल्याला समजते की याचा उपयोग डाटा किंवा माहिती डिजिटल स्वरूपामध्ये साठवून ठेवण्यासाठी केला जातो. यालाच डिजिटल स्टोरेज, स्टोरेज मीडिया किंवा स्टोरेज डिवाइस या नावानेसुद्धा ओळखतात. हे काही या प्रकारचे हार्डवेअर डिव्हाइसेस असतात जे डाटा किंवा माहिती डिजिटल स्वरूपामध्ये साठवून ठेवतात. आणि ते सुद्धा काही कालावधीसाठी (Temporarily) किंवा कायमस्वरूपी (Permanently) साठी. त्यांचा मुख्य उद्देश हा डाटा स्टोअर करणे हाच असतो. चला तर मग आता आपण पाहू या स्टोरेज डिवाइस म्हणजे काय (What is storage device in marathi).

Storage device information in marathi
स्टोरेज डिवाइस म्हणजे काय (Storage device information in marathi)

स्टोरेज डिवाइस म्हणजे काय (Storage device information in marathi)

जसे की मी पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे स्टोरेज डिवाइस त्यांना म्हणतात जे डाटा किंवा माहिती आपल्या गरजेप्रमाणे म्हणजेच काही कालावधीसाठी किंवा कायमस्वरूपी साठवून ठेवतात. हे डाटा ला डिजिटल स्वरूपामध्ये साठवून ठेवतात.

स्टोरेज डिवाइस एक असा कॉम्प्युटर हार्डवेअर आहे ज्याचा वापर डाटा सुरक्षित रूपामध्ये साठवून ठेवण्यासाठी आणि गरजेनुसार त्याचा वापर करण्यासाठी केला जातो. हा माहितीला काही कालावधीसाठी किंवा कायमस्वरूपी यासाठी साठवून ठेवतो.

हे स्टोरेज डिवाइस आपण कॉम्प्युटर किंवा सर्वर मध्ये किंवा त्याच्या बाहेर सुद्धा पाहू शकतो. आणि या स्टोरेज डिवाइसला स्टोरेज मिडीयम किंवा स्टोरेज मिडिया या नावानेसुद्धा ओळखतात. कोणत्याही कॉम्प्युटर डिव्हाइस चा हा एक खूप महत्त्वपूर्ण भाग असतो. आणि ते वेगवेगळ्या आकारांमध्ये आणि प्रकारांमध्ये उपलब्ध असतात. जे त्यांच्या गरजेप्रमाणे आणि कामाप्रमाणे उपलब्ध असतात.

स्टोरेज डिवाइस चे प्रकार (Types of Storage device in Marathi)

कॉम्प्युटर मध्ये ज्या स्टोरेज डिवाइस चा वापर केला जातो ते मुख्यपणे चार प्रकारचे असतात. चला आता आपण स्टोरेज डिवाइस च्या प्रकाराविषयी माहिती जाणून घेऊया.

1) Primary Storage Device
2) Secondary Storage Device
3) Tertiary Storage Device
4) Off line Storage Device

1) Primary Storage Device

या प्रायमरी स्टोरेज डिवाइस ला मेन मेमरी असे म्हणतात.

ही ती डायरेक्ट मेमरी असते जी आपण वापरू शकतो सीपीयू द्वारे आणि तेही एका मेमरी बस च्या माध्यमातुन.

हे स्टोरेज डिवाइस Volatile असतात.

यांची मेमरी काही कालावधीसाठी असते, म्हणजेच जसे की डिवाइस स्पीच ऑफ किंवा रिबूट झाले तर संपूर्ण मेमरी डिलीट होते.

उदाहरणार्थ : RAM, ROM, Cache

2) Secondary Storage Device

हे सेकंडरी स्टोरेज डिवाइस स्टोरेज डिवाइस असतात जे की सीपीयू द्वारे वापरता येत नाहीत.
यामध्ये स्टोरेज डिवाइस कॉम्प्युटरला जोडण्यासाठी इनपुट आणि आऊटपुट चॅनेल चा वापर केला जातो. कारण हे मुख्य रूपामध्ये एक्स्टर्नल असतात.
हे Non Volatile असतात, आणि यामध्ये प्रायमरी स्टोरेज डिवाइस च्या तुलनेने स्टोरेज क्षमता जास्त असते.
या प्रकारचे स्टोरेज कायम स्वरूपासाठी असते. जोपर्यंत आपण याला काढत नाही तोपर्यंत.
यामध्ये इंटरनल आणि एक्स्टर्नल मेमरी आढळते.
उदाहरणार्थ :
हार्ड डिस्क

3) Tertiary Storage devices

हे Tertiary Storage Devices इतके जास्त महत्वपूर्ण नसतात. आणि हे जास्त करून वैयक्तिक कम्प्युटरचा भाग सुद्धा नसतात.
यामध्ये नेहमी एका Robotic Mechanism चा वापर केला जातो.
या प्रकारच्या स्टोरेज डिवाइस मध्ये रोबोटिक फंक्शन चा वापर केला जातो.
यामध्ये वारंवार मानवाच्या हस्तक्षेपाची गरज पडत नाही, कारण ते स्वयंचलित काम करण्यामध्ये सक्षम असतात.
परंतु ही स्टोरी सिस्टीम खूप स्लो असते.
उदाहरणार्थ :
मॅग्नेटिक टेप
ऑप्टिकल डिस्क

4) Off-line Storage Devices

या ऑफलाइन स्टोरेज डिवाइस Disconnected Storage असेसुद्धा म्हणतात.
हा एक कॉम्प्युटर चा असा डाटा स्टोरेज असतो जो प्रोसेसिंग युनिट च्या नियंत्रणामध्ये नसतो.
याला कोणत्याही व्यक्ती द्वारे जोडावे लागते. कारण कॉम्प्युटर त्याशिवाय याला ऍक्सेस करू शकत नाही.

उदाहरणार्थ :
फ्लॉपी डिस्क
यूएसबी फ्लॅश ड्राइव्ह
मेमरी कार्ड

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

क्लाऊड स्टोरेज म्हणजे काय (what is cloud storage in marathi)

क्लाऊड स्टोरेज चा अर्थ आहे आपण आपला डेटा म्हणजेच एखादा फोटो असेल किंवा एखादे डॉक्युमेंट असेल तर ते आपल्या डिवाइस मध्ये ठेवण्याऐवजी ते एखाद्या सर्वरवर साठवून ठेवणे, ज्याला कोठूनही ऑनलाईन पाहता येईल.

निष्कर्ष

आजच्या या पोस्टमध्ये आपण स्टोरेज डिवाइस म्हणजे काय (Storage device information in marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल सर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

Leave a Comment