मराठी कोडी व उत्तरे 2023 | marathi kodi

Marathi Kodi : लहान मुले नेहमी मला कोड सांगा असा हट्ट करताना पाहतो. परंतु तेव्हा आपल्याला जास्त मराठी कोडी माहित नसतात त्यामुळे आपण त्यांना सांगू शकत नाही. तुमच्या याच प्रश्नच उत्तर आपण आजच्या या पोस्ट मध्ये पाहणार आहोत. आज आपण मराठी कोडी व उत्तरे 2023 (marathi kodi) जाणून घेणार आहोत. आशा करतो परत जेव्हा कोणी मला कोड सांगा अस म्हणेल तेव्हा तुम्ही त्यांना हि कोडी नक्कीच सांगू शकाल.

मराठी कोडी व उत्तरे 2023 (marathi kodi)
मराठी कोडी व उत्तरे 2023 (marathi kodi)

Contents

मराठी कोडी व उत्तरे 2023 (marathi kodi)

ती माय माउली जग तिच्यावर जगते, घामाचा ती वास घेते, मोत्याची ती रास देते?

 जमीन

अशी कोणती गोष्ट आहे जी चोर चोरी करू शकत नाही?

ज्ञान

अशी कोणती गोष्ट आहे जी गरीब लोक फेकून देतात आणि श्रीमंत लोक खिशात ठेवतात?

वाहणारे नाक

पाटील बुवा राम राम, दाढी मिशा लांब लांब?

कणीस

तिघे जण वाढायला बारा जण जेवायला?

घड्याळ

रात्री जागतो, दिवसा झोपतो, नेहमी झाडाला उलट लटकलेला असतो, ओळखा पाहू मी कोण?

वटवाघूळ

गोल आहे पण बॉल नाही, शेपटी आहे पण प्राणी नाही, सारी मुले माझी शेपटी धरून खेळतात, पण तरीसुद्धा मी रडत नाही, ओळखा पाहू मी कोण?

फुगा

मी तरुण असतो तेव्हा उंच असतो आणि जेव्हा मी म्हातारा होतो तेव्हा मी ठेंगणा होतो, ओळखा पाहू मी कोण?

मेणबत्ती किंवा पेन्सिल

तुम्ही मला पाण्यात पाहू शकता पण मी कधीही ओली होऊ शकत नाही, ओळखा पाहू मी कोण?

प्रतिबिंब

मी उडू शकतो पण मला पंख नाहीत, मी रडू शकतो पण मला डोळे नाहीत, मी जिथे जातो तिथे अंधार माझ्या मागे येतो, ओळखा पाहू मी कोण?

ढग

जो माणूस ते निर्माण करतो ते तो वापरत नाही, जो माणूस त्याला खरेदी करतो त्याला त्याची गरज नसते, जो माणूस त्याचा वापर करतो त्याला ते माहीत नसते, ओळखा पाहू मी कोण?

एक ताबूत

असे काय आहे जे आपल्याकडे असताना आपण दुसऱ्याला सांगू शकतो पण आपण इतरांना सांगितल्यावर ते आपले राहत नाही?

गुपित

असा कोण आहे ज्याच्याकडे झोपण्यासाठी पलंग नाही, राहण्यासाठी महाल नाही आणि विशेष म्हणजे त्याच्याकडे एक रुपया सुद्धा नाही, तरीही तो राजा आहे.

सिंह

तुम्ही दहा रुपयांमध्ये अशी कोणती वस्तू खरेदी कराल ज्यामुळे तुमची खोली पूर्ण भरेल?

दहा रुपयाची अगरबत्ती घेईन आणि त्याच्या सुगंधाने संपूर्ण खोली भरून जाईल.

कोकणातून येतो, देश विदेशात जातो. मोठेही याला बघून होतात लहान, असा याचा महिमा महान. पिवळा, केशरी रंगाचा, हा तर आहे फळांचा राजा. ओळखा कोण?

आंबा

ऊन बघता मी येतो, सावली पाहता मी लाजतो,
वाऱ्याचे स्पर्श होताच मी नाहीसा होतो. सांगा मी कोण?

घाम

अशी कोणती जागा आहे जिकडे रस्ता आहे पण गाडी नाही जंगल आहे पण झाड नाही, आणि शहर आहे पण पाणी नाही

नकाशा

रामाच्या वडीलांना एकून चार मुले आहेत. पहिल्याचं नाव 25 पैसे. दुसऱ्याचं नाव 50 पैसे. चौथ्याचं नाव 100 पैसे. मग तिसऱ्याचं नाव काय असेल?

रामा

रात्री 3 ठिकाणी आग  लागली आहे. 1- मंदिर 2- शाळा 3- दवाखाना सांगा सर्व प्रथम अँबुलन्स कोणती आग विझवेल?

अँबुलन्स आग विझवित नाही.

एका माणसाचे पाच अक्षरी नाव काय ? जे नाव उलटे आणि सरळ वाचले तर सारखेच येते.

नवजीवन

50+ मराठी कोडी व उत्तरे (marathi kodi)

दोन अक्षरी नाव आहे
नेहमी सर्दी असते नाकावर
कागद माझा रुमाल आहे
माझे नाव काय आहे ते सांगा

पेन 

अशी कोणती गोष्ट आहे
जी बनवण्यासाठी बराच वेळ लागतो
परंतु तो खंडित होण्यास काही क्षण लागत नाही.

विश्वास 

चार बोटे आणि एक अंगठा
तरीही माझ्या नसांमध्ये रक्त नाही
सर्वजण बेजान म्हणतात मला
तरी नेहमी उपयोगी मी राही
सांगा पाहू मी कोण??

हातमोजे 

वाचण्यात आणि लिहिण्यात
दोन्ही ठिकाणी असते माझे काम
मी नाही कागद मी नाही पेन
सांगा काय आहे माझं नाव?

चश्मा 

मी काळी आहे पण कोकिळ नाही,
लांब आहे पण काठी नाही,
दोरी नाही पण बांधली जाते
माझे नाव सांग.

वेणी 

आपण दिवसभर असे काहीतरी करता,
उचलतो आणि ठेवतो..
आपण त्याशिवाय कोठेही जाऊ शकत नाही.
सांगा काय आहे हे??

पाऊल 

उंचावरून पडली एक घार
तिला केले मारून ठार
आतील मास खाऊ पटापट
गोड रक्त पिऊ गटागट
ओळखा पाहू मी कोण?

नारळ 

लाईट गेली माझी आठवण झाली
असो मी लहान किंवा मोठी
माझ्या डोळ्यातुन नेहमी गळते पाणी
सांग मी आहे तरी कोण

मेणबत्ती 

रस्ता आहे परंतु गाड्या नाहीत
घरे आहेत परंतु माणसे नाहीत
जंगल आहे पण तू प्राणी नाहीत
ओळखा पाहू मी कोण

नकाशा 

दगड फोडता चांदी चकाकली
चांदीच्या आडात मिळाले पाणी
सगळे म्हणाले ही परमेश्वराचीच करणी
ओळखा पाहू मी कोण

नारळ 

बारीक असते लांब पण असते तरीही मी काठी नाही
दोन तोंडे आहेत मला तरीही मी गांडूळ नाही
श्वास घेते मी पण तुम्ही नाही
ओळखा पाहू मी आहे तरी कोण

बासरी 

तो वेडा नाही तरीही कागद फाडतो
तो पोलिस नाही तरीही तो खाकी घालतो
मंदिर नाही तरीही घंटा तो वाजवतो
सांगा पाहू मी कोण?

वाहक 

उन्हाळ्यात माझ्या पासून दूर तुम्ही पळता
हिवाळ्यात माझ्या जवळ तुम्ही येता
माझ्यामुळेच आकाशात दिसतात तुम्हाला सात रंग
सांगा पाहू मी कोण

ऊन 

नेहमीच असतो मी तुमच्या घरी
तरी काहींनाच मी आवडतो
एकावर एक कपडे मी घालतो
तरीही डोळ्यात पाणी तुमच्या येते
सांगा पाहू मी आहे तरी कोण

कांदा 

लाल मी आहे पण तो रंग नाही
कृष्ण मी आहे पण देव मी नाही
आड आहे पण पाणी त्यात नाही
वाणी आहे पण दुकान माझं नाही
सांगा पाहू मी कोण

लालकृष्ण आडवाणी 

एका कैद्याला तुरुंगातून पळून जाण्याची संधी दिली जाते
परंतु त्यासाठी तीन पैकी एका खोलीतून जायचे असते
पहिल्या खोलीत भयानक आग असते
दुसऱ्या खोलीत विस्फोटक आहेत
दुसऱ्या खोलीत एक्स सिंह आहे जो एका वर्षापासून भूकेला आहे

तिसऱ्या खोलीतून एका वर्षापासून भुकेला सिंह जिवंत असणार नाही.

एक रहस्य बॉक्स पाहिला,
ज्याला नाही कव्हर
किंवा लॉक केलेला नाही..
खाली किंवा कोपरा बंद केलेला नाही,
त्यामध्ये चांदी आणि सोने आहे. कोण पाहू??

अंडी 

येथे एक फूल फुलले आहे,
येथे एक फूल फुलले आहे
आम्ही एक विचित्र आश्चर्य पाहिले,
पानांवर पाने.

फुलकोबी 

तुम्ही एका माकडा सोबत त्याच्या घरात गेलात
तिथे त्याचा संपूर्ण परिवार केळी खात होता
तर त्या घरातील सगळ्यात हुशार कोण

तुम्ही 

एका काळ्याकुट्ट राजाची
अद्भुत मी राणी
हळूहळू पिणार मी पाणी
सांगा पाहू मी कोण

दिवा 

निष्कर्ष

आजच्या या पोस्ट मध्ये आपण मराठी कोडी व उत्तरे 2023 (marathi kodi) या विषयी माहिती जाणून घेतली. आशा करतो परत जेव्हा कोणी मला कोड सांगा अस म्हणेल तेव्हा तुम्ही त्यांना हि कोडी नक्कीच सांगू शकाल. जर तुम्हाला हि माहिती आवडली जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुम्ही ही माहिती तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

Leave a Comment